चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -1 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने प्रकाशित केलेल्या सुधारित अंदाजानुसार या वर्षी भारताची अर्थव्यवस्था किती टक्क्यांच्या दराने वाढेल ?
A. 6.3
B. 7.1
C. 7.3
D. 7.5
Click for answer
C. 7.3
भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट करण्यात आल्याचे मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने म्हटले आहे. या वर्षी भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी वाढेल असा सुधारीत अंदाज मूडीजनं वर्तवला आहे.
2. आंतरराष्ट्रीय हवाई परवाना नियमांच्या निकषांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले टोनी फर्नाडिस कोणत्या विमान वाहतूक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ?
A. एअर आशिया
B. जेट एयरवेज
C. एअर इंडिया
D. इंडिगो एअरलाईन्स
Click for answer
A. एअर आशिया
एअर आशिया समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नाडिस व इतरांवर आंतरराष्ट्रीय हवाई परवाना नियमांच्या निकषांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एअर आशिया ही जगातील सर्वात स्वस्त हवाई कंपनी आहे. या कंपनीच्या दिल्ली, मुंबई व बेंगळुरू येथील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. एअर आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नाडिस यांनी सरकारी सेवकांशी साटेलोटे करून परवाने मिळवले व नियमाचे उल्लंघन केले, नियामक धोरणे बाजूला ठेवण्यास भाग पाडले असा आरोप आहे.
3. रिझव्र्ह बँकेच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
A. सुधा बालकृष्णन
B. चंदा कोचर
C. अरुंधती भट्टाचार्य
D. उषा अनंतसुब्रमण्यम
Click for answer
A. सुधा बालकृष्णन
‘एनएसडीएल’च्या उपाध्यक्षा सुधा बालकृष्णन यांची रिझव्र्ह बँकेच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.रिझव्र्ह बँकेच्या वित्तीय कामगिरीचे नेतृत्व या पदाकडे असेल. त्याचबरोबर बँकेचा ताळेबंदाची जबाबदारीही सुधा यांच्याकडे असेल. सुधा बालकृष्ण या ‘एनएसडीएल’ या देशातील पहिल्या मोठय़ा डिपॉझिटरी सेवा कंपनीच्या पहिल्या ज्येष्ठ महिला अधिकारी राहिल्या आहेत. रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळातील सुधा या आता 12 व्या संचालक असतील. पुढील तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल.
4. देशातल्या पहिल्याच महिला हमाल म्हणून बातमीत आलेल्या मंजू देवी कोणत्या रेल्वे स्थानकाशी निगडीत आहेत ?
A. दादर, मुंबई
B. जयपूर
C. लखनौ
D. हजरत निजामदुद्दिन, नवी दिल्ली
Click for answer
B. जयपूर
त्या देशातल्या पहिल्याच महिला हमाल आहेत. जयपूर रेल्वे स्थानकावर त्या काम करतात. मंजू देवीच्या पतीचं 10वर्षांपूर्वी निधन झालं. मंजूचे पती महादेवदेखील हमाली करायचे. पदरात तीन मुलं होती. घरातला कर्ता पुरुष गेल्यावर मात्र पोटापाण्याचा प्रश्न मंजू देवींसमोर उभा राहिला. त्यांनी पतीच्या लायसन्स नंबरवर हमाली करायचा निर्णय घेतला
5. क्रेडिट स्विस इंडिया मार्केट फंड हा कोणत्या परदेशी बँकेने भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वाहिलेला गुंतवणूक फंड सुरू केला आहे ?
A. HSBC
B. बँक ऑफ लंडन
C. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना
D. बँक ऑफ सिंगापूर
Click for answer
C. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना
चीनमधल्या सरकारी बँकेने फक्त भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वाहिलेला गुंतवणूक फंड दाखल केला आहे. चिनी गुंतवणूकदारांना दोन अंकी परतावा मिळवण्यासाठी भारतीय बाजारपेठ आकर्षक असल्याचं सांगत चिनी बँकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवल्याचं मानण्यात येत आहे. क्रेडिट स्विस इंडिया मार्केट फंड या नावानं इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनानं हा फंड दाखल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांची अनौपचारीक भेट घेतल्याला पंधरा दिवस होत नाहीत तोच हा निर्णय समोर आला होता.
6. कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीची गुगल क्लाऊड इंडियाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. नितीन बावनकुळे
B. सत्या नादेला
C. नवनीत देशपांडे
D. रिचा कर
Click for answer
A. नितीन बावनकुळे
जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगलने त्यांच्या ‘गुगल क्लाऊड’बिझिनेसचे भारतातील प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. बावनकुळे यांनी सहा वर्षे कंपनीचा भारतातील कारभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. गुगल क्लाऊडच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने बावनकुळे आता थेट व्यवस्थापकीय संचालक (आशिया- पॅसिफिक) रिक हार्शमन यांना अहवाल सादर करतील.
7. विकास गौडा या खेळाडूने 15 वर्षांच्या कारकिर्दीनंतर अलिकडेच निवृत्ती जाहीर केली. हा खेळाडू कोणत्या क्रीडाप्रकाराशी संबंधित आहे ?
A. हॉकी
B. नेमबाजी
C. बॉक्सिंग
D. थाळीफेकी
Click for answer
C. थाळीफेकी
थाळीफेकीतील दिग्गज खेळाडू विकास गौडा याने 15 वर्षांच्या करिअरला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रकुलमध्ये थाळीफेकीत पदक जिंकणारा तो एकमेव पुरुष खेळाडू होता.
8. देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसच्या स्वतंत्र संचालकपदाचा अलीकडेच राजीनामा दिल्याने चर्चेत आलेले व्यक्तिमत्त्व कोणते ?
A. नंदन निलकेणी
B. इंद्रा नुयी
C. सुधा मूर्ती
D. रवी व्यंकटेशन
Click for answer
D. रवी व्यंकटेशन
9. संजिता चानू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. कुस्ती
B. वेटलिफ्टिंग
C. बॉक्सिंग
D. नेमबाजी
Click for answer
B. वेटलिफ्टिंग
गोल्ड कोस्ट येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर संजिता चानू ही उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. उत्तेजकांच्या यादीत असलेले द्रव्य संजिताच्या शरीरात आढळले असून तिच्यावर आजीवन बंदीची शक्यता वर्तवली जात आहे
10. नासकॉम या संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
A. रिशाद प्रेमजी
B. अझीझ प्रेमजी
C. नंदन निलकेणी
D. रवी व्यंकटेशन
Click for answer
A. रिशाद प्रेमजी
माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नासकॉम या संघटनेच्या अध्यक्षपदी विप्रोचे मुख्य धोरणात्मक अधिकारी रिशाद प्रेमजी यांची निवड २०१८-१९ सालासाठी करण्यात आली आहे. डब्ल्यूएनएस समूहाचे मुख्याधिकारी केशव मुरुगेश यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
Newer Post
Older Post
Home