चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -16 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. 'व्होग' या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय महिलेचा समावेश केला आहे ?
A. प्रियांका जोशी
B. सायली म्हात्रे
C. संजीवनी पाटील
D. शितल फड
Click for answer
A. प्रियांका जोशी
फोर्ब्स या जगप्रसिद्ध नियतकालिकाने 'अंडर 30, सायन्स अँड हेल्थकेअर' या अंकामध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या तरुणांच्या (30 वर्षांखालील) यादीमध्ये प्रियांकाचा समावेश करुन त्यांच्या संशोधनात्मक कार्याचा गौरव केला होता. विज्ञान क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाच्या तरुण चेहऱ्यांपैकी एक असा प्रियांकाचा फोर्ब्स मासिकाने गौरव केला.
अल्झायमर्स आजारावरील संशोधनामध्ये सध्या केंब्रिज विद्यापीठामध्ये रिसर्च फेलो म्हणून कार्यरत असलेल्या प्रियांकाने आघाडी घेतली आहे. प्रियांकाने मेंदुविषयक आजारांसंदर्भात तयार केलेली 'मॉलिक्यूल लायब्ररी' हे असामान्य संशोधन म्हणून वाखाणण्यात आले आहे.
त्यानंतर आता 'व्होग' या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये केला.
प्रियांका जोशी या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभागाची माजी विद्यार्थिनी आहेत.
2. 'काली' या चित्राची 26.4 कोटी रूपयेला विक्री करण्यात आली. ह्या चित्राचे चित्रकार कोण आहेत ?
A. अवनींद्रनाथ टागोर
B. तैयब मेहता
C. अमृता शेरगिल
D. जामिनी रॉय
Click for answer
B. तैयब मेहता
लिलावामध्ये विकल्या गेलेले प्रख्यात आधुनिक चित्रकार तैयब मेहता यांचे हे सर्वात महागडी चित्र ठरले आहे. 2017 मध्ये त्यांचे आणखी एक अनटायटल्ड पेंटिंग नावाचे चित्र 22.99 कोटींना विकले गेले होते. तर 2002 मध्ये 'सेलिब्रेशन' नावाचे आणखी एक चित्र 1.5 कोटींना विकले गेले होते.
या चित्रात मनुष्याची द्विधा मनस्थिती रेखाटलेली आहे. चांगले-वाईट आणि विनाश यामधील स्थिती या चित्रातून रेखाटण्यात आली आहे.
3. भारतामध्ये 1970 च्या दशकात पाककलेसाठी लागणारी उत्पादने नॉनस्टीक टेक्नोलॉजीतून आणून क्रांती करणारा निर्लेप उद्योग समूह कोणत्या उद्योग समूहाने विकत घेतला आहे ?
A. अवंता उद्योग समूह
B. क्रॉम्प्टन इलेक्ट्रिकल्स
C. बजाज इलेक्ट्रिकल्स
D. ABB
Click for answer
C. बजाज इलेक्ट्रिकल्स
सुमारे 80 कोटी रुपयांत हा करार झाला आहे. यात निर्लेप कंपनी, ब्रँड यांची मालकी आणि देणीही बजाजकडे आली आहेत. 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या निर्लेपचा स्वयंपाकाच्या भांड्यांत नॉनस्टिक तंत्रज्ञान अवलंबणाऱ्या पहिल्या कंपन्यांत समावेश होता.
निर्लेप उद्योग समुहाचे सर्वेसर्वा राम भोगले.
दोन्ही उद्योगोंमधील व्यवहारानुसार 80 टक्के समभाग बजाज इलेक्ट्रीक्ल्सकडे तर 20 टक्के समभाग निर्लेपच्या मालकाकडे राहणार.
4. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ग्राहक किंमत निर्देशांकासाठीचे प्रमाणभूत वर्ष बदलून ते 2010=100 वरुन _______________________ केले आहे.
A. 2005=100
B. 2012=100
C. 2015=100
D. 2017=100
Click for answer
B. 2012=100
या वर्षाच्या मे महिन्यासाठी 2012=100 या प्रमाणभूत वर्षावर आधारीत ग्राहक किंमत निर्देशांक (ग्रामीण, शहरी एकत्रित) प्रकाशित करण्यात येत असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय मे 2018 साठी अखिल भारतीय ग्रामीण, नागरी आणि एकत्रित ग्राहक अन्नधान्य किंमत निर्देशांकही जारी करण्यात आला आहे.
5. देशातील 56 क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे किती बँकांमध्ये एकत्रीकरण करण्यात येणार आहे ?
A. 1
B. 18
C. 28
D. 38
Click for answer
D. 38
देशात 196 ग्रामीण बँका होत्या. मात्र, अनेक बँका तोट्यात चालत असल्याने त्यांच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाली. 2011-12 मध्ये त्यांची संख्या 82 वर आणण्यात आली. 82 पैकी काही बँका बंद पडल्या. सध्या त्यांची संख्या 56 आहे. केंद्रीय मंत्रालय आता या बँकांचे पुन्हा एकत्रीकरण करून 38 करण्याच्या विचारात आहे.
देशात ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण करून 38 ग्रामीण बँका ठेवण्यात येणार असल्या तरी त्यात महाराष्ट्रातील या दोन ग्रामीण बँकांचा समावेश नाही.
भारत सरकारचे 50 टक्के, राज्य सरकार 15 टक्के तर पुरस्कृत बँकेचे 35 टक्के भांडवल ग्रामीण बँकेत गुंतविलेले असते.
6. जल संसाधनाच्या प्रभावी व्यवस्थापन क्षेत्रातली कामगिरी सुधारण्यासाठी आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून खालीलपैकी कोण 'समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक' जारी करणार आहे ?
A. नीती आयोग
B. जलस्त्रोत मंत्रालय
C. नियोजन आयोग
D. पाणी फाउंडेशन
Click for answer
A. नीती आयोग
जल संसाधनांची मर्यादित उपलब्धता आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता जल संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी योग्य उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी या निर्देशांकाचा उपयोग करता येणार आहे. राज्यांकडून प्रतिसाद मागविल्यानंतर आणि तज्ञांशी सल्लामसलत करुन विस्तृत अभ्यासाअंती याला अंतिम रुप देण्यात आले आहे.
जल संसाधनाच्या उत्तम व्यवस्थापनासाठी सुयोग्य उपाय आखण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्देशांक, राज्यांना आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि खात्यांना उपयुक्त माहिती पुरवेल
7. नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक अहवालात कोणत्या राज्याला 2016-17 या संदर्भ वर्षात प्रथम क्रमांक देण्यात आला आहे ?
A. आंध्रप्रदेश
B. सिक्कीम
C. गुजरात
D. महाराष्ट्र
Click for answer
C. गुजरात
जल संसाधनाच्या उत्तम व्यवस्थापनासाठी सुयोग्य उपाय आखण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्देशांक, राज्यांना आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि खात्यांना उपयुक्त माहिती पुरवेल.
2016-17 या संदर्भ वर्षात गुजरातला प्रथम क्रमांक त्यानंतर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांना क्रमांक देण्यात आले आहेत.
8. युरोपीय समुदाय चित्रपट महोत्सवाचे यजमानपद यावर्षी कोणत्या आशियाई देशाकडे आहे ?
A. भारत
B. बांगलादेश
C. श्रीलंका
D. मालदीव
Click for answer
A. भारत युरोपीय
समुदाय चित्रपट महोत्सवाचे आयोजन यंदा भारतात होत असून 18 जूनला नवी दिल्लीतल्या सिरीफोर्ट ऑडीटोरियममध्ये या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात 23 युरोपीय देशांमध्ये 24 चित्रपट रसिकांना बघायला मिळतील. या महोत्सवांतर्गत देशभरात महत्त्वाच्या 11 शहरांमध्ये युरोपीय चित्रपट दाखवले जातील. यात पुणे आणि गोव्याचाही समावेश आहे. चित्रपट क्षेत्रातले नामवंत प्रेक्षक आणि विद्यार्थ्यांना या महोत्सवादरम्यान विविध प्रसिद्ध युरोपियन निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
9. 'अरुण 3' हा कोणत्या देशातला जलविद्युत प्रकल्प आहे ?
A. भारत
B. नेपाळ
C. भूतान
D. थायलंड
Click for answer
B. नेपाळ
नेपाळमध्ये भारताच्या मदतीने उभारण्यात येत असलेल्या मुख्य जलविद्युत प्रकल्पामध्ये अलीकडेच एक बॉम्बस्फोट झाला. अशा प्रकल्पामध्ये महिन्याभरात झालेला हा दुसरा स्फोट आहे. राजधानी काठमांडूपासून 500 किलोमीटरवरील तुमलिंगतार येथील "अरुण 3' या प्रकल्पामध्ये एका अनोळखी गटाने "आयईडी'च्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणला होता.
"अरुण 3' प्रकल्पासाठी भारत सरकारच्या सतलज जलविद्युत निगमबरोबर 25 नोव्हेंबर 2014 रोजी करार करण्यात आला आहे.
10. शांघाय सहकार्य संघटना कोणत्या मध्ये अस्तित्वात आली ?
A. 2001
B. 2005
C. 2010
D. 2017
Click for answer
A. 2001
ही संघटना निर्माण कऱण्यामध्ये रशिया आणि चीनने प्रमुख भूमिका बजावली होती. या दोन देशांखेरीज मध्य आशियातील ताझकिस्तान, उझबेकिस्तान, कैरगिस्तान आणि कझागिस्तान या देशांनी ही संघटना स्थापन केली. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात "नाटो' या लष्करी संघटनेसमोर ठाम प्रतिक्रिया देण्याच्या मूळ उद्देशाने या संघटनेची निर्मिती झाली.
या संघटनेने संयुक्त प्रयत्नांतून 500 हून अधिक दहशतवादी हल्ले परतवले आहेत. तसेच 600 हून अधिक दहशतवाद्यांचे हस्तांतरण केले आहे.
नुकतीच शांघाय सहकार्य संघटनेची बैठक चीनमधील किंगडोह येथे पार पडली. रशिया, चीन, मध्य आशियातील चार देशांनी स्थापन केलेल्या या संघटनेचे महत्त्व भारतासाठी मोठे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिखर बैठकीस उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती.
Newer Post
Older Post
Home