चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -27 ते 31 मे 2018


मे 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात येणारे आंतरराष्ट्रीय योग संमेलन यंदा कोठे घेण्यात येणार आहे ?

A. नवी दिल्ली
B. पणजी
C. दिसपूर
D. भुवनेश्वर


Click for answer

B. पणजी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात येणारे आंतरराष्ट्रीय योग संमेलन यंदा पणजी लगतच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहे. प्रथमच हे संमेलन गोव्यात भरवण्यात येत आहे.

2. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते कोणत्या खात्याचे मंत्री होते ?

A. महसूल
B. कृषी
C. शालेय शिक्षण , वैद्यकीय शिक्षण
D. गृहनिर्माण


Click for answer

B. कृषी

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात पांडुरंग पुंडलिक फुंडकर उर्फ भाऊसाहेब फुंडकर हे कृषीमंत्री होते. विधानपरिषदेचे ते विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. ते नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेचे सदस्य होते. त्याचबरोबर अकोला लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. खामगाव विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले होते.

3. 2018 ची इंडियन प्रिमियर लीग ही Twenty-20 क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ?

A. चेन्नई सुपर किंग्ज
B. सनरायझर्स हैदराबाद
C. मुंबई इंडियन्स
D. राजस्थान रॉयल्स


Click for answer

A. चेन्नई सुपर किंग्ज

दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला.

4. प्रख्यात चित्रकार, सिनेनिर्माते-दिग्दर्शक-अभिनेता प्रकाश भेंडे यांनी त्यांच्या पत्त्नी उमा भेंडे यांच्या सोबतचे सहजीवन आणि चित्रपटविश्वातील कटु-गोड अनुभव कोणत्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकातून मांडल्या आहेत ?

A. तो आणि ती
B. एक झाड दोन पक्षी
C. गंध फुलांचा गेला सांगून
D. नाते जडले दोन जीवांचे


Click for answer

C. गंध फुलांचा गेला सांगून

मुळच्या कोल्हापूरकर असलेल्या उमा भेंडे यांचे मूळ नाव अनुसया साक्रीकर होते. पण लता मंगेशकर यांनी त्यांचे नामकरण उमा असे केले. प्रकाश भेंडे हे व्यवसायाने एक चित्रकार आहेत. पण अभिनयाच्या वेडापायी तेही चित्रपटविश्वात रमले.

5. 'द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस' हे अलीकडच्या काळातील चर्चित पुस्तक पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयचे माजी प्रमुख असलेल्या कोणी लिहिले आहे ?

A. ले. जन. हमीद गुल
B. हाशिम कुरेशी
C. मोहम्मद असद दुर्रानी
D. जी. एम. सद


Click for answer

C. मोहम्मद असद दुर्रानीन

आयएसआयचे माजी प्रमुख मोहम्मद असद दुर्रानी यांनी ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ या पुस्तकातून भारत-पाकिस्तान संबंधाबाबत महत्वाचे खुलासे करताना काही गोष्टींची कबुली सुद्धा दिली आहे.न

1965 आणि 1971 या दोन युद्धात भारताकडून झालेला पराभव हे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे सर्वात मोठे अपयश असल्याचे दुर्रानी यांनी म्हटले आहे.

6. _____________ आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे अलीकडेच मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले.

A. पाकिजा
B. उमराव जान
C. ताजमहल
D. मुग़ल-ए-आज़म


Click for answer

A. पाकिजा

7. तंबाखू निषेध दिवस कधी साजरा केला जातो ?

A. 28 मे
B. 29 मे
C. 30 मे
D. 31 मे


Click for answer

D. 31 मे

WHO ने तंबाखू आणि धुम्रपानाच्या इतर उत्तन्नामुळे होणारे आजार व मृत्यूची आकडेवारी लक्षात घेऊन यावर्षीची थीम 'टोबॅको अॅण्ड कार्डियावस्क्युलर डिसीज' म्हणजेच 'तंबाखू आणि ह्रदय रोग' ठेवली आहे. आकडेवाडीनुसार, जगभरात दररोज 70 लाख लोक आणि भारतात दररोज 2739 लोकांचा मृत्यू हा तंबाखू आणि इतर धुम्रपान करणाऱ्या उत्पादनामुळे कर्करोग आणि इतर आजार होऊन होतो.

जर योग्य खबरदारी घेतली नाही तर 2020 पर्यंत तंबाखूच्या पदार्थामुळे दरवर्षी मरण पावणाऱ्यांची संख्या सुमारे 911 कोटी असेल. इंटरनॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोजेक्‍टकडून (आयटीसीपी) हा इशारा देण्यात आला आहे. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी 25 टक्के मृत्यू महिलांचा होतो.

8. अलीकडेच झालेल्या कोणत्या विधानसभेच्या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले ?

A. पालघर
B. पलूस-कडेगाव
C. माळशिरस
D. अक्कलकोट


Click for answer

B. पलूस-कडेगाव

काँग्रेसने पतंगराव यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली. पुढील विधानसभा निवडणुकांना जेमतेम एका वर्षाचा कालावधी असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कदम यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे विश्वजीत कदम यांची बिनविरोध निवड झाली.

9. रामदेव बाबा यांनी नुकतेच पतंजलीचं नवं मेसेजिंग अॅप लॉन्च केलं. त्याचे नाव काय आहे ?

A. कीप
B. किंभो
C. वन नोट
D. किक


Click for answer

B. किंभो

Kimbho (किंभो) असं या मेसेजिंग अॅपचं नाव आहे. Kimbho ची टॅगलाइन ‘अब भारत बोलेगा’ अशी ठेवण्यात आली आहे.

10. कॉंग्रेस नेत्या उर्मिला सिंह यांचे आज मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या कोणत्या राज्याच्या माजी राज्यपाल होत्या ?

A. महाराष्ट्र
B. उत्तरप्रदेश
C. हिमाचल प्रदेश
D. केरळ


Click for answer

C. हिमाचल प्रदेश

त्यांनी काही काळ मध्यप्रदेशच्या मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (एनसीटीसी) अध्यक्षा म्हणूनही त्यांनी कार्य केले. त्यांची 2010 मध्य हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.