स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-5


41. 'कमळ' या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ?
A. नलिनी
B. सरोज
C. कुमुद
D. चंपक


Click for answer

D. चंपक

42. 'सात दिवसातून एकदा निघणारे' या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

A. दैनिक
B. साप्ताहिक
C. वार्षिक
D. पाक्षिक


Click for answer

B. साप्ताहिक

43. 'देही' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

A. विदेही
B. देहवास
C. स्वदेही
D. कुदेही


Click for answer

A. विदेही

44. 'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल' या ओळीत 'पहाट' दर्शक शब्द कोणता?

A. रात्र
B. गर्भ
C. उद्या
D. उष:काल


Click for answer

D. उष:काल

45. 'मितव्ययी' ह्या शब्दसमूहाचा अर्थ काय ?

A. मोजकाच आहार घेणारा
B. मोजकीच बाजू घेणारा
C. मोजकाच खर्च करणारा
D. मोजकेच बोलणारा


Click for answer

C. मोजकाच खर्च करणारा

46. खालील शब्दाचे योग्य लेखन कोणते ?

A. शार्दुल वीक्रीडित
B. शार्दुल विक्रीडीत
C. शार्दुल वीक्रीडीत
D. शार्दुल विक्रीडित


Click for answer

D. शार्दुल विक्रीडित

47. 'राम वनात जातो' या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत ?

A. सात
B. अकरा
C. बारा
D. चौदा


Click for answer

D. चौदा

48. 'देवालय' या संधीचा विग्रह कसा कराल ?

A. देवा + अलय
B. देवा + आलय
C. देव + आलय
D. देव् + आलय


Click for answer

C. देव + आलय

49. 'दगड' हा शब्द ________________ आहे.

A. तत्सम
B. तद्‌भव
C. देशी
D. विदेशी


Click for answer

C. देशी

50. ट,ठ,ड,ढ,ण हे वर्ण _______________ आहेत.

A. तालव्य
B. अनुनासिक
C. दन्त्य
D. मूर्धन्य


Click for answer

D. मूर्धन्य