स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-4


31. 'ढळला रे ढळला दिन सखया, संध्या भिवविती हृदया' या काव्यपंक्तीतील 'दिन ढळला' या शब्दाचा ध्वन्यार्थ सांगा.
A. दिवस मावळला
B. सूर्य बुडाला
C. आयुष्य संपत आले
D. दिवस संपला


Click for answer

C. आयुष्य संपत आले

32. 'मी निबंध लिहित असतो' या विधानातील काळाचा प्रकार कोणता ?

A. साधा वर्तमानकाळ
B. अपूर्ण वर्तमानकाळ
C. रिती वर्तमानकाळ
D. पूर्ण वर्तमानकाळ


Click for answer

C. रिती वर्तमानकाळ

33. खालील पर्यायी उत्तरांतील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते आहे ?

A. लोकमान्य टिळक म्हणत, की 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे.'
B. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार.
C. तो इतका खेळला, की त्याचे अंग दुखू लागले.
D. माझा पहिला नंबर आला, की मी पेढे वाटीन.


Click for answer

B. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार.

34. 'पळाला म्हणून तो बचावला' या वाक्यातील 'म्हणून' हे कोणते अव्यय आहे ?

A. स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय
B. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
C. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
D. संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय


Click for answer

B. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

35. 'हळद लागणे' ह्या घटनेचा पुढील कोणत्या घटनेशी संबंध आहे ?

A. विवाह
B. बाळाचा जन्म
C. वैधव्य
D. गृहप्रवेश


Click for answer

A. विवाह

36. 'मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी' या वाक्याचा प्रकार ओळखा.

A. आज्ञार्थी
B. संकेतार्थी
C. विध्यर्थी
D. प्रश्नार्थी


Click for answer

C. विध्यर्थी

37. 'मुलांनी अभ्यास करावा' या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.

A. मुलांनो अभ्यास करा
B. मुले अभ्यास करतात
C. मुलांनी अभ्यास केला
D. मुले अभ्यास करत नाहीत


Click for answer

A. मुलांनो अभ्यास करा

38. पर्यायी उत्तरांतील क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय कोणते ?

A. मोठ्याने
B. व्यक्तिश:
C. खालून
D. ह्यावरून


Click for answer

C. खालून

39. देशी शब्द ओळखा.

A. चिमणी
B. कोवळा
C. काम
D. घाम


Click for answer

A. चिमणी

40. 'काय उकडले हो काल रात्री !' या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.

A. काल रात्री उकडत होते का?
B. काल रात्री मनस्वी उकडले.
C. काल रात्री उकडले वाटते.
D. काल रात्री बऱ्यापैकी उकडत होते.


Click for answer

B. काल रात्री मनस्वी उकडले.