चालू घडामोडी
भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-1
भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.
1. घटक राज्याचा राज्यपाल कोणाकडून नेमला जातो ?
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. उपराष्ट्रपती
D. मुख्यमंत्री
Click for answer
B. राष्ट्रपती
2. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले ?
A. डॉ. राधाकृष्णन
B. डॉ. राजेंद्र प्रसाद
C. डॉ. बी. आर.आंबेडकर
D. पं. जवाहरलाल नेहरू
Click for answer
B. डॉ. राजेंद्र प्रसाद
3. भारत हे गणराज्य आहे कारण __________________________.
A. भारतात संसदीय शासनपद्धती आहे.
B. भारत पूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र आहे.
C. भारताने लोकशाही शासनाचा स्वीकार केला आहे.
D. भारतात राष्ट्रप्रमुख भारतीय जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो.
Click for answer
D. भारतात राष्ट्रप्रमुख भारतीय जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो.
4. राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी खालील पैकी काय बरोबर आहे ?
A. त्यांच्याबाबतीत न्यायालयात दाद मागता येत नाही.
B. ती न्याय प्रविष्ट होऊ शकतात.
C. काही मार्गदर्शक तत्त्वेच फक्त न्याय प्रविष्ट होऊ शकतात.
D. वरीलपैकी एकही नाही
Click for answer
A. त्यांच्याबाबतीत न्यायालयात दाद मागता येत नाही.
5. राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्य नियुक्त केले जातात ?
A. आठ
B. दहा
C. बारा
D. वीस
Click for answer
C. बारा
6. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे ?
A. राष्ट्रपती
B. राज्यपाल
C. पंतप्रधान
D. सरन्यायाधीश
Click for answer
A. राष्ट्रपती
7. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये राज्यघटनेतील संपत्तीचा मुलभूत अधिकार वगळण्यात आला ?
A. बेचाळीसाव्या
B. चव्वेचाळीसाव्या
C. एकोणचाळीसाव्या
D. एकसष्टाव्या
Click for answer
B. चव्वेचाळीसाव्या
8. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात कल्याणकारी राज्याची संकल्पना विशद करण्यात आली आहे ?
A. प्रस्तावना
B. मूलभूत हक्क
C. मूलभूत कर्तव्ये
D. राजनीतीची मार्गदर्शक तत्त्वे
Click for answer
D. राजनीतीची मार्गदर्शक तत्त्वे
9. भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्वासंदर्भात कोणती तरतूद आहे?
A. एकेरी नागरीकत्व
B. दुहेरी नागरिकत्व
C. संमिश्र नागरिकत्व
D. बहु नागरिकत्व
Click for answer
A. एकेरी नागरीकत्व
10. राज्यघटनेचे 'कलम 360' हे पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
A. राष्ट्रीय आणीबाणीच्या अंमलबजावणीशी
B. घटक राज्यातील आणीबाणीच्या अंमलबजावणीशी
C. आर्थिक आणीबाणीच्या अंमलबजावणीशी
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Click for answer
C. आर्थिक आणीबाणीच्या अंमलबजावणीशी
Newer Post
Older Post
Home