चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -12 व 13 मे 2018


एप्रिल-मे 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. भारतातली ई-कॉमर्समधली सगळ्यात मोठी कंपनी फ्लिपकार्ट मधला किती टक्के हिस्सा अमेरिकी जायंट कंपनी वॉलमार्ट हिला 16 अब्ज डॉलर्सना (सुमारे एक लाख कोटी रुपये) विकत आहे ?

A. 100 टक्के
B. 77 टक्के
C. 49 टक्के
D. 25 टक्के


Click for answer

B. 77 टक्के

याखेरीज वॉलमार्ट आणखी दोन अब्ज डॉलर्स किंवा 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक फ्लिपकार्टमध्ये करणार आहे. फ्लिपकार्ट विकत घेण्यासाठी वॉलमार्टची प्रतिस्पर्धी कंपनी असलेली अॅमेझॉनही स्पर्धेत होती. परंतु फ्लिपकार्टनं वॉलमार्टला पसंती दिली. तज्ज्ञांच्या मते ई-कॉमर्स क्षेत्रामधलं दुसरी कंपनी ताब्यात घेण्याच्या बाबतीत हे जगातलं सगळ्याच मोठं डील आहे.

2. वॉलमार्ट या रिटेल कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ?

A. जेम्स सदरलैंड
B. डग मॅकमिलन
C. जैक डोर्सी
D. बिन्नी बंसल


Click for answer

B. डग मॅकमिलन

3. मलेशियाचे पंतप्रधान म्हणून कोणी नुकतीच शपथ घेतली ?

A. ट्रान डाई क्वांग
B. रानील विक्रमसिंघे
C. महाथीर मोहम्मद
D. जोको विडोडो


Click for answer

C. महाथीर मोहम्मद

निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर जगातील सर्वात वयोवृद्ध नेते महाथीर मोहम्मद (92) यांनी गुरुवारी मलेशियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राजे सुलतान मोहम्मद पाचवे यांनी महाथीर मोहम्मद यांना पंतप्रधानपदाची अधिकृतपणे शपथ दिली. यापूर्वी महाथीर यांनी जवळपास 22 वर्षे मलेशियाचे पंतप्रधानपद भूषविले होते.

4. कोणत्या देशाचे 104 वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी गुरुवारी स्वित्झर्लंडमध्ये स्वेच्छामरण स्विकारत देहत्याग केला ?

A. स्वित्झर्लंड
B. ऑस्ट्रेलिया
C. कॅनडा
D. जर्मनी


Click for answer

B. ऑस्ट्रेलिया

स्वेच्छामरणासाठीच ते ऑस्ट्रेलियावरुन स्वित्झर्लंडमध्ये आले. इतर अनेक देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही मरणाचा स्वीकार हा गुन्हा मानला जातो. स्वित्झर्लंडमध्ये 1940 पासून वैद्यकीय साह्याने इच्छा मरणाचा अधिकार आहे.

5. जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्या‍पीठाला कोणाचे नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे ?

A. कवयित्री बहिणाबाई चौधरी
B. मधुकरराव चौधरी
C. संत मुक्ताबाई
D. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे


Click for answer

A. कवयित्री बहिणाबाई चौधरी

6. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय)ने 2016-17 चा सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे ?

A. महेंद्रसिंग धोणी आणि विराट कोहली
B. डायना एडलजी आणि पंकज रॉय
C. अंशुमन गायकवाड आणि सुधा शाह
D. झुलन गोस्वामी आणि विरेंदर सेहवाग


Click for answer

B. डायना एडलजी आणि पंकज रॉय

डायना यांनी महिला क्रिकेटसाठी अत्यंत मोलाचे योगदान देताना 20 कसोटी सामने आणि 34 एकदिवसीय सामने खेळले. त्यांच्या 17 वर्षांच्या कारकीर्दीत या दोन्ही प्रकारात त्यांनी अनुक्रमे 63 आणि 46 बळी मिळवले.

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या प्रशासक समितीवर डायना यांची नियुक्ती केलेली असल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर होत असल्याबाबत मतभेद व्यक्त होत आहेत.

डायना एडलजी आणि पंकज रॉय यांना 2016-17 या वर्षांसाठी तर माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड आणि महिला संघाच्या माजी कर्णधार सुधा शाह यांना 2017-18 या वर्षांसाठी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याशिवाय अब्बास अली बेग, दिवंगत कसोटीपटू नरेन ताम्हणे, आणि दिवंगत कसोटीपटू बुधी कुंदरन यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

7. कोणत्या कंपनीने अंतराळ कायद्याअंतर्गत शहरी हवाई वाहतूक सेवा देण्याचे मॉडेल संदर्भात नासासोबत करार केला आहे ?

A. ओला
B. गुगल
C. अॅपल
D. उबर


Click for answer

D.उबर(Uber)

याबाबतीत उबरने सरकारी यंत्रणेसोबतही काम केले आहे. ‘उबर एअर’ पायलट योजनेत लॉस एंजिलसदेखील भागीदार असणार आहे. याआधी डलास फोर्ट-वर्थ, टेक्सास आणि दुबई देखील यात सहभागी झाले आहेत. 2020 पर्यंत अमेरिकेतील काही शहरांत उबर हवाई विमान सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करणार आहे.

8. 11 मे आणि 13 मे रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने केलेल्या यशस्वीअणूस्फोट चाचण्यांना यावर्षी किती वर्षे पूर्ण झाली ?

A. 10 वर्षे
B. 15 वर्षे
C. 20 वर्षे
D. 25 वर्षे


Click for answer

20 वर्षे

11 मे 1998 रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने केलेल्या अणूस्फोट चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. 11 मे च्या दुपारी 3.45 च्या सुमारास तीन त्यानंतर दोन दिवसांनी 13 मे रोजी दोन अशा एकूण पाचही अणूस्फोटाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या.

9. कोणत्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार त्या राज्यातील अनुसूचित जाती व जमातीमधले जे विद्यार्थी युपीएससीचीपूर्व परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना एक लाख रुपये तर त्या राज्याच्या लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना 50 हजार रुपये बक्षीसापोटी मिळणार आहेत ?

A. मध्यप्रदेश
B. बिहार
C. दिल्ली
D. तामिळनाडू


Click for answer

B. बिहार

बिहार सरकारच्या अनुसूचित जाती व जमाती कल्याण खात्यानं हा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळानं मंगळवारी मंजूर केला आहे.

10. वर्णद्वेषाच्या रागातून भारतीय इंजिनियर श्रीनिवास कुचिभोतला यांची गोळया झाडून हत्या करणाऱ्या अॅडम प्युरिंटॉनसा अमेरिकन न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मागच्या वर्षी अमेरिकेतील कोणत्या शहरात ही घटना घडली होती ?

A. न्यूयॉर्क
B. सिएटेल
C. कन्सास
D. वॉशिंग्टन डी.सी.


Click for answer

C. कन्सास