विज्ञान प्रश्नसंच -10


विज्ञान -तंत्रज्ञान घटकावर आधारित.

1. डायलिसीस यंत्रणा खालीलपैकी कोणत्या विकारांच्या रुग्णांसाठी वापरतात?

A. ह्रदयविकार
B. मूत्रपिंड विकार
C. यकृत विकार
D. श्वसनाचे आजार


Click for answer

B. मूत्रपिंड विकार

2. भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूच्या गळतीमुळे घडून आली?

A. कार्बन मोनॉक्साइड
B. फॉस्जिन
C. मेथिल आयसोसायनेट
D. क्लोरीन


Click for answer

C. मेथिल आयसोसायनेट

3. सामान्यतः घरातील सर्व विद्युत उपकरणे कोणत्या प्रकारच्या जोडणीने जोडलेले असतात?

A. एकसर जोडणी
B. समांतर जोडणी
C. एकसर किंवा समांतर जोडणी
D. वरीलपैकी एकही नाही


Click for answer

B. समांतर जोडणी

4. खालीलपैकी कोणती भाषा संगणक भाषा नाही?

A. कोबोल
B. HTML
C. नेटस्केप
D. व्हिज्युअल बेसिक


Click for answer

C. नेटस्केप

5. खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व रक्त गोठण्याकरिता आवश्यक आहे?

A. ए जीवनसत्त्व
B. के जीवनसत्त्व
C. बी12 जीवनसत्त्व
D. डी जीवनसत्त्व


Click for answer

B. के जीवनसत्त्व

6. जैविकशास्त्राच्या कोणत्या शाखेत पेशींचा अभ्यास करतात ?

A. हिस्टॉलॉजी
B. फिजिऑलॉजी
C. सायकॉलॉजी
D. सायटॉलॉजी


Click for answer

D. सायटॉलॉजी

7. ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरण शोषून घेतात?

A. अवरक्त किरण
B. जंबुलातित किरण
C. क्ष- किरण
D. दृश्य किरण


Click for answer

B. जंबुलातित किरण

8. खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही?

A. ग्राफाईट
B. निकेल
C. लोखंड
D. कोबाल्ट


Click for answer

A. ग्राफाईट

9. हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात?

A. धमनी
B. धमनिका
C. शीर
D. मज्जारज्जू


Click for answer

C. शीर

10. ध्वनीतरंग खालीलपैकी कशातून जात नाहीत ?

A. घन पदार्थ
B. द्रव पदार्थ
C. हवा
D. निर्वात पोकळी


Click for answer

D. निर्वात पोकळी