स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-1


1. खालील वाक्याच्या शेवटी योग्य वाक्यप्रचाराचा पर्याय शोधा.
जाऊबाईंनी मोलकरीणीला धाकट्या भाऊजींचे कोणतेही काम न करण्याची _________________.
A. विनवणी केली होती
B. प्रार्थना केली होती
C. पट्टी पढविली होती
D. तिलांजली दिली होती


Click for answer

C. पट्टी पढविली होती

2. 'मीठभाकर' या समाहार व्दंद समासाचा विग्रह कसा आहे ?

A. मीठ किंवा भाकरी
B. मीठ घालून केलेली भाकरी
C. मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ
D. भाकरी आणि मीठ


Click for answer

C. मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ

3. शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा.- ज्याला कशाचीही उपमा देत येत नाही

A. अनुरूप
B. प्रतिरूप
C. अनुपम
D. विरूप


Click for answer

C. अनुपम

4. खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा.- 'ये रे बोरा, पड माझ्या तोंडा'

A. माझ्या तोंडात बोर पडले
B. अतिशय आळशी असणे
C. अतिशय धूर्त असणे
D. तोंडात बोर असावे


Click for answer

B. अतिशय आळशी असणे

5. 'अमुक झाले तर अमुक होईल' असे काल्पनिक विधान करावयाचे असेल तर भूतकाळी आणि भविष्यकाळी कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी लागते ?

A. स्वार्थी
B. संकेतार्थी
C. आज्ञार्थी
D. विध्यर्थी


Click for answer

B. संकेतार्थी

6. 'चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

A. चांदीच्या विटेचे चमचे बनविणे
B. चमच्याने दूध पाजणे
C. गर्भश्रीमंत असणे
D. मौल्यवान वस्तू वापरणे


Click for answer

C. गर्भश्रीमंत असणे

7. 'पिकते तेथे विकत नाही' या म्हणीचा अचूक पर्याय कोणता ?

A. मिळते त्यावर संतोष मानणे
B. निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते
C. कुठेही काहीही विकले जात नाही
D. कुठेही काहीही पिकते


Click for answer

B. निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते

8. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार पर्यायी उत्तरांतील कोणता ?-'च'

A. हेतुवाचक
B. तुलनावाचक
C. संबंधवाचक
D. कैवल्यवाचक


Click for answer

D. कैवल्यवाचक

9. खालील शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?- 'यथामति'

A. तद्‌भव
B. तत्सम
C. देशी
D. परकीय


Click for answer

D. परकीय

10. आधुनिक मराठीचे कवितेचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते ?

A. केशवसुत
B. बा.सी.मर्ढेकर
C. कुसुमाग्रज
D. संत ज्ञानेश्वर


Click for answer

A. केशवसुत