चालू घडामोडी
इतिहास प्रश्नसंच-11
इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.
1. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन घेण्यात आले ?
A. दिल्ली
B. कोलकाता
C. मुंबई
D. वर्धा
Click for answer
C. मुंबई
7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते
2. ऑगस्ट 1942 मध्ये मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
A. महात्मा गांधी
B. पंडित जवाहरलाल नेहरू
C. मौलाना अब्दुल कलाम आझाद
D. सरदार वल्लभभाई पटेल
Click for answer
C. मौलाना अब्दुल कलाम आझाद
3. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात खालील पैकी कोणी मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला ?
A. महात्मा गांधी
B. पंडित जवाहरलाल नेहरू
C. मौलाना अब्दुल कलाम आझाद
D. सरदार वल्लभभाई पटेल
Click for answer
B. पंडित जवाहरलाल नेहरू
4. ऑगस्ट1942 च्या मुंबईच्या राष्ट्रीय सभेचे अधिवेशनात खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ?
A. महात्मा गांधी
B. मौलाना अब्दुल कलाम आझाद
C. सरदार वल्लभभाई पटेल
D. पंडित जवाहरलाल नेहरू
Click for answer
महात्मा गांधी
5. गांधीजींनी “करा किंवा मरा”(Do or Die) हे स्फूर्तीदायक आवाहन कोणत्या ठिकाणाहून केले ?
A. मुंबई
B. दिल्ली
C. लाहोर
D. मद्रास
Click for answer
A. मुंबई
6. 1942 च्या भुमिगत चळवळीत सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कोणाच्या ‘आझाद दस्ता’ या गटाने मोठे कार्य केले होते?
A. अच्युतराव पटवर्धन
B. अरुणा असफअली
C. भाई कोतवाल
D. युसुफ मेहेरअली
Click for answer
C. भाई कोतवाल
7. 1942 च्या भूमिगत चळवळीत नागपूरच्या जनरल आवारी यांच्या कोणत्या गटाने कित्येक महिने सरकारला सळो की पळो करून सोडले होते?
A. लाल सेना
B. प्रति सेना
C. आझाद सेना
D. तिरंगा सेना
Click for answer
A. लाल सेना
8. लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीयांना घटना तयार करण्याचा अधिकार देण्यासंबंधीची प्रसिद्ध ' ऑगस्ट घोषणा ' कधी केली होती ?
A. 8 ऑगस्ट 1940
B. 8 ऑगस्ट 1941
C. 8 ऑगस्ट 1942
D. 8 ऑगस्ट 1945
Click for answer
A. 8 ऑगस्ट 1940
9. दुसरे महायुद्ध कधी सुरु झाले ?
A. 3 सप्टेंबर 1938
B. 3 सप्टेंबर 1939
C. 3 सप्टेंबर 1940
D. 3 सप्टेंबर 1941
Click for answer
B. 3 सप्टेंबर 1939
10. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ?
A. मार्गारेट थॅचर
B. विस्टन चर्चिल
C. क्लेमेंट ऍटली
D. चेंबरलिन
Click for answer
B. विस्टन चर्चिल
Newer Post
Older Post
Home