चालू घडामोडी
स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-12
1. मुलांनो अभ्यास करा. - या वाक्याचा प्रकार ओळखा.
A. होकारार्थी
B. आज्ञार्थी
C. संकेतार्थी
D. प्रश्नार्थी
Click for answer
B. आज्ञार्थी
2. दिलेल्या पर्यायांमध्ये 'बाग' ह्या शब्दाचे अनेकवचन शोधा.
A. बागे
B. बागा
C. बाग
D. बागी
Click for answer
B. बागा
3. दिलेल्या पर्यायांमध्ये 'लिंबू' ह्या शब्दाचे अनेकवचन शोधा.
A. लिंबू
B. लिंबु
C. लिंब
D. लिंबे
Click for answer
D. लिंबे
4. 'पुस्तक' ह्या शब्दाचे वचन ओळखा.
A. एकवचन
B. बहुवचन
C. अनेकवचन
D. यापैकी नाही
Click for answer
A. एकवचन
5. 'दुभत्या गाईच्या लाथा गोड ' - या म्हणीचा अर्थ सांगा.
A. भरपूर दूध मिळणे.
B. वाईट संगतीत चांगले घडणे
C. पुण्यवान माणसाच्या लाथा
D. फायदेशीर गोष्टींसाठी त्रास सहन करणे.
Click for answer
D. फायदेशीर गोष्टींसाठी त्रास सहन करणे.
6. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द शोधा.
______ म्हणजे बांधून पहा, लग्न म्हणजे करून पहा.
A. इमारत
B. वाडा
C. किल्ला
D. घर
Click for answer
D. घर
7. 'उपकाराची जाण न ठेवणारा ' - या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.
A. उपकारी
B. अपकारी
C. कृतज्ञ
D. कृतघ्न
Click for answer
D. कृतघ्न
8. 'सत्य, असत्य व बुध्दीला स्मरून '- या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.
A. स्मरणशक्ती
B. अर्धसत्य
C. सदसदविवेकबुद्धी
D. ईश्वरसाक्ष
Click for answer
C. सदसदविवेकबुद्धी
9. डॉक्टर म्हणाले, "_______ साठी जगू नका, जगण्यासाठी खा. " - या वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
A. जगण्या
B. मरण्या
C. खाण्या
D. जेवणा
Click for answer
C. खाण्या
10. "जर तू आधी सांगितले असतेस तर मी तुझ्याबरोबर मुंबईला आलो असतो."- या वाक्याचा प्रकार सांगा.
A. होकारार्थी
B. आज्ञार्थी
C. संकेतार्थी
D. प्रश्नार्थी
Click for answer
C. संकेतार्थी
Newer Post
Older Post
Home