स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-11


1. खालीलपैकी उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द कोणता ?
A. कानन
B. स्वल्प
C. उपवन
D. निष्पाप


Click for answer
D. निष्पाप
2. कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ?

A. संबोधन
B. पंचमी
C. प्रथमा
D. द्वितीया


Click for answer
D. द्वितीया
3. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
तो औरंगाबादहून पुण्याला आला.

A. प्रथमा
B. चतुर्थी
C. संबोधन
D. पंचमी


Click for answer
D. पंचमी
4. गुरूजी मुलांना शिकवितात.
वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

A. प्रथमा
B. द्वितीया
C. तृतीया
D. चतुर्थी


Click for answer
B. द्वितीया
5. मुले आंबा खातात.
वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

A. प्रथमा
B. षष्ठी
C. संबोधन
D. सप्तमी


Click for answer
A. प्रथमा
6. उमेशने पेरू खाल्ला.
वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

A. प्रथमा
B. तृतीया
C. पंचमी
D. सप्तमी


Click for answer
B. तृतीया
7. मला मळमळते.
वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

A. द्वितीया
B. चतुर्थी
C. षष्ठी
D. संबोधन


Click for answer
A. द्वितीया
8. तो खेळत आहे. - या वाक्यातील वर्तमानकाळाचा प्रकार कोणता ?

A. पूर्ण
B. अपूर्ण
C. रीती
D. चालू पूर्ण


Click for answer
B. अपूर्ण
9. 'चोराच्या मनात चांदणे असणे.' - या म्हणीचा अर्थ सांगा.

A. रुखरुख लागणे.
B. अपराध्यास वाईट वाटणे.
C. चोरास भिती वाटणे.
D. चोरून चांदणे पाहणे.


Click for answer
B. अपराध्यास वाईट वाटणे.
10. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द शोधा.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय _______ येत नाही.

A. मोठेपण
B. देवपण
C. सौंदर्य
D. दगडपण


Click for answer
B. देवपण