स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-10


1. वयोमानानुसार सर्व इच्छा-आकांक्षांचा त्याग करणे हे योग्य ठरते. - या वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी एक शब्द निवडा.
A. इच्छामुक्त
B. निरिच्छ
C. आसक्त
D. अधाशी


Click for answer

B. निरिच्छ
2. खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा.
'पूर्वी कधी पाहिले नाही असे '

A. अप्रतिम
B. अपरूक
C. अपूर्व
D. अद्वितीय


Click for answer

C. अपूर्व
3. खालीलपैकी कोणता शब्द परभाषेतून मराठीत आला ?

A. चिंच
B. बटाटा
C. आंबा
D. फणस


Click for answer

B. बटाटा
4. खाली दिलेल्या शब्दांपैकी 'लक्ष्मी' चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता ?

A. कमला
B. तनया
C. इंदिरा
D. वैष्णवी


Click for answer

B. तनया
5. खाली दिलेल्या शब्दांपैकी 'समीरण' चा अर्थ नसलेला शब्द कोणता ?

A. अनिल
B. मारूत
C. पवन
D. केसरी


Click for answer

D. केसरी
6. खाली दिलेल्या शब्दांपैकी 'समुद्र चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता ?

A. समीरण
B. सिंधू
C. अर्णव
D. रत्नाकर


Click for answer

A. समीरण
7. 'अरिष्ट' या शब्दाचा अर्थ सांगा.

A. शत्रूला चांगले असे ते
B. पेचप्रसंग
C. पंचायत
D. संकट


Click for answer

D. संकट
8. 'अकलेचा कांदा' या शब्दाचा अर्थ सांगा.

A. अतिशय विद्वान माणूस
B. अतिशय मूर्ख माणूस
C. अतिशय श्रीमंत माणूस
D. अतिशय चैनी माणूस


Click for answer

B. अतिशय मूर्ख माणूस
9. 'चर्पट पंजरी' या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगा.

A. दुर्मिळ योग
B. लांबत जाणारे काम
C. अर्थहीन पाठांतर
D. वायफळ बडबड


Click for answer

D. वायफळ बडबड
10. 'आमरण' या शब्दाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान संपूर्ण बरोबर आहे ?

A. 'आमरण' हा तत्सम शब्द आहे.
B. 'आमरण' हा तत्सम आणि उपसर्गघटीत शब्द आहे.
C. 'आमरण' हा तत्सम उपसर्गघटीत आणि समासघटीत शब्द आहे.
D. वरील तिन्ही विधाने चूक आहेत.


Click for answer

C. 'आमरण' हा तत्सम उपसर्गघटीत आणि समासघटीत शब्द आहे.