चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -1 मे 2018


एप्रिल 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या कोणत्या सत्याग्रहाचे हे शतकपूर्ती वर्ष आहे ?

A. चंपारण्य सत्याग्रह
B. अहमदाबाद मिल कामगार सत्याग्रह
C. सविनय कायदेभंग चळवळ
D. असहकार आंदोलन


Click for answer

A. चंपारण्य सत्याग्रह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोतिहारी येथे अलीकडेच राष्ट्रीय स्वच्छाग्रही परिषदेला संबोधित केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चंपारण्यात सुरू केलेल्या सत्याग्रह कार्यक्रमाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

2. इस्रोने आयआरएनएसएस-1आय या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कधी केले ?

A. 12 एप्रिल 2018
B. 18 एप्रिल 2018
C. 22 एप्रिल 2018
D. 28 एप्रिल 2018


Click for answer

A. 12 एप्रिल 2018

श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरुन 425 किलो वजनाचा हा उपग्रह पीएसएलव्ही-सी4एल या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अंतराळात प्रक्षेपित केला.
आयआरएनएसएस-1आय उपग्रह आयआरएनएसएस-1ए या दिशादर्शक उपग्रहाची जागा घेणार आहे. आयआरएनएसएस-1ए या दिशादर्शक उपग्रहात बिघाड झाल्याने हा उपग्रह पाठवण्यात आला आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून मच्छिमारांना समुद्रात जाण्याआधी वातावरणाची योग्य माहिती मिळेल.

मच्छिमारांना दिशादर्शक असा हा उपग्रह ठरणार आहे. दिशादर्शनच्या सात उपग्रहांची एक साखळी आहे. आयआरएनएसएस-1आय अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर या उपग्रहांच्या समूहामध्ये दाखल होईल.

3. खालीलपैकी कोणाची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. डॉ. नंदकिशोर चिखले
B. डॉ. के.पी. विश्वनाथा
C. डॉ. संजय देशमुख
D. डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर


Click for answer

D. डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर

रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.

4. दिवसा 100 टक्के नवीकरणीय उर्जेवर चालणारे देशातली पहिले स्मार्ट सिटी बनण्याचा मान कोणत्या शहराने मिळविला ?

A. पद्दुचेरी
B. दीव
C. सातारा
D. गांधीनगर


Click for answer

B. दीव

गेल्यावर्षीपर्यंत दीव, गुजरातकडून 73 टक्के उर्जा घेत होते. यासंदर्भात, दीवमधे 50 हेक्टर, खडकाळ जमिनीवर 9 मेगावॅट सौर पार्क उभारण्याबरोबरच 79 सरकारी इमारतींवर सौर पॅनेल उभारुन त्याद्वारे वार्षिक 1.3 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येते.

सौर क्षमता आणखी वाढविण्यासाठी दीवने आपल्या रहिवाश्यांना घराच्या छपरावर 1 ते 5 मेगावॅट सौर पॅनेल बसवण्याकरिता 10 हजार ते 50 हजार अनुदान देऊ केले आहे. कमी खर्चातल्या सौर ऊर्जेमुळे घरगुती वीज दरात गेल्यावर्षी 10 टक्के तर यावर्षी 15 टक्के कपात झाली आहे.

5. तुर्भे-रायपूर तांदूळ (टीआरआर1), तुर्भे-कोकण कोलम (टीकेकेआर13) अशा तांदळाच्या नव्या दोन संकरित जाती आणि चवळीचे तुर्भे-चवळी 901 (टीसी-901) हे वाण खालीलपैकी कोणी विकसित केले आहे ?

A. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
B. गोविन्द बल्लभ पन्त कृषि एवं प्रौद्योगिकी विश्वविद्यालय, पंतनगर
C. भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई
D. जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय, जबलपूर


Click for answer

C. भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई

6. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या निर्णयानुसार, सर्व मालांच्या आंतर राज्य वाहतुकीसाठी कधीपासून ई-वे बिल व्यवस्था बंधनकारक करण्यात आली आहे ?

A. 1 मार्च 2018
B. 1 एप्रिल 2018
C. 1 मे 2018
D. 1 जानेवारी 2018


Click for answer

B. 1 एप्रिल 2018

जीएसटीएनने माहिती विज्ञान केंद्राच्‍या सहाय्याने वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत संपूर्ण देशभरात ई-वे बिल यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. https://ewaybillgst.gov.in. हे याचे संकेतस्थळ आहे.

7. 5 एप्रिल 2018 रोजी कोणाच्या जयंतीनिमित्त 'समता दिन' साजरा केला गेला ?

A. चौधरी चरणसिंग
B. चौधरी देवीलाल
C. लाल बहादूर शास्त्री
D. बाबू जगजीवन राम


Click for answer

D. बाबू जगजीवन राम

8. 24 एप्रिल 2018 रोजी कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा शुभारंभ केला ?

A. प्रतापगड(उत्तरप्रदेश)
B. मंडला(मध्यप्रदेश)
C. कुरुभात (छत्तीसगड)
D. नवी दिल्ली


Click for answer

B. मंडला(मध्यप्रदेश)

9. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ?

A. सुनील शर्मा
B. कविंदर गुप्ता
C. सत शर्मा
D. डी. के. मन्याल


Click for answer

B. कविंदर गुप्ता

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी गुप्ता जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष होते.

10. जम्मू काश्मीरचे राज्यपाल कोण आहेत ?

A. राम नाईक
B. एन. एन. वोहरा
C. मृदुला सिन्हा
D. पद्मनाभ बालकृष्ण आचार्य


Click for answer

B. एन. एन. वोहरा