चालू घडामोडी 24 मार्च 2018

  • इसिस(ISIS)या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी पॅरिस (फ्रान्स)येथे हल्ला केला. दक्षिण फ्रान्समधील कार्कसॉन शहरात चार पोलिसांवर या दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडण्यात आल्या.
  • दिल्ली उच्च न्यायालयाने आप च्या सर्व अपात्र आमदारांची आमदारकी कायम ठेवली आहे. तसेच यापूर्वी देण्यात आलेला निवडणुक आयोगाचा आदेश रद्द करत पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
  • भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड आणि इसरो यांच्यात लिथियम-इऑन बॅटरीच्या उत्पादनासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यात आला. बंगळुरु येथे इसरोचे अध्यक्ष डॉ. के.सिवन आणि भेलचे अध्यक्ष अतुल सोबती यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
  • भारताची "चांद्रयान-2' मोहीम पुढे ढकलण्यात आली असून आता ती येत्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार, ही मोहीम पुढील महिन्यात सुरू होणार होती.
  • नवी दिल्लीत फिक्कीने पाचवी भारत मका परिषद आयोजित केली होती.
  • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री :=राधा मोहन सिंह
  • 24 मार्च- जागतिक क्षय रोगदिन
  • भारत क्षयरोगमुक्त व्हावा यासाठी केंद्र सरकार मिशन म्हणून काम करत आहे. क्षयरोगमुक्त जगासाठी 2030 हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर भारताने 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  • 24March
  • 14 एप्रिलपासून देशभर 'ग्रामस्वराज्य अभियान' सुरू करण्यात आले आहे.
  • जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत रामलीला मैदानात बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.
  • हुतात्मा, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च भारत सरकार उचलणार आहे.
  • यापूर्वी हुतात्मा, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च म्हणून दरमहा 10 हजार रुपये देण्याची मर्यादा होती. मात्र, आता ही मर्यादा रद्द करण्याचे आदेशच संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
  • लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेतही भाजप हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
  • शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 12 जागा जिंकल्याने आता त्यांचे राज्यसभेतील संख्याबळ 69 झाले आहे.