अनाथांची आई डॉ. सिंधुताई सपकाळ आणि ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला बळवंत आपटे यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारीशक्ती’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दरवर्षी महिला दिनी हा राष्ट्रीय ‘नारीशक्ती पुरस्कार दिला जातो.
वर्ष 2017 च्या पुरस्कारासाठी देशभरातील अनेक मान्यवर महिलांसह महाराष्ट्रातील दोन महिलांचा सन्मान होणार आहे.
भाजपने त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेश अध्यक्ष विप्लवकुमार देव यांच्या नावाची घोषणा केली. तर जिष्णु देव बर्मन यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. आदिवासी समाजातून आलेले जिष्णु देव हे राज्यातील जनजाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
गेल्याच आठवड्यात 'रॉयटर्स'च्या अंदाजात ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 6.9 टक्क्यांवर राहील, असे सूतोवाच करण्यात आले होते. जागतिक रेटिंग एजन्सी 'मूडीज'च्या मते 2018,2019 मध्ये देशाच्या विकासाचा दर 7.6 टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
'मूडीज'च्या मते नोटाबंदीच्या निर्णायाचा देशाच्या विकासावर विपरित परिणाम झाला होता. मात्र, आता परिस्थिती कमालीची बदलली आहे.
आगामी आर्थिक वर्षात 'जीडीपी'चा दर 7.6 टक्के तर, २०१९ मध्ये 7.5 टक्के राहील, असा अंदाजही 'मूडीज'ने वर्तवला आहे.
फोर्ब्जने अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून 110 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगात पहिल्या स्थानावर आहेत.
या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगात19व्या तर भारतात पहिल्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी अंबानी 20व्या स्थानावर होते. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचे मूल्य 40.1 अब्ज डॉलर्स असल्याचे फोर्ब्जनं म्हटले आहे.
अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स तर गुंतवणूक गुरू अशी ओळख असलेले वॉरन बफेट तिसऱ्या स्थानावर असून बर्नार्ड अरनॉल्ट चौथ्या व फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग पाचव्या स्थानावर आहेत.
फोर्ब्जच्या यादीत 3.1 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ही या यादीत आहेत. पतंजली सीईओ हे ही आचार्य बालकृष्ण 6.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक असून ते फोर्ब्जच्या यादीत आहेत.
फोर्ब्जच्या यादीत अनेक भारतीय उद्योगपती असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे-
हिंदुजा कुटुंबिय ,अझीम प्रेमजी ,लक्ष्मी मित्तल , शिव नाडर ,दिलीप संघवी , कुमार बिर्ला , उदय कोटक, राधाकृष्ण धामानी , सायरस पुनावाला , सावित्री जिंदाल व कुटुंब , सुनील मित्तल व कुटुंब , पतंजलीचे आचार्य बालकृष्ण , विक्रम लाल , नुसली वाडिया, बेणू गोपाळ बांगर, विवेक चंद सेहगल , कलानिधी मारन, सुभाष चंद्रा , पंकज पटेल , एमए युसूफ अली , अजय पिरामल , निरज, मधुर व शेखर बजाज