लोकसभेचे माजी अध्यक्ष, दिवंगत पी. ए. संगमा यांचे पुत्र कोनराड संगमा यांनी मेघालयचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मेघालयात भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेसेतर पक्षांना एनपीपी नेते कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्यात यश मिळविल्याने मेघालयात प्रथमच एनडीएचं सरकार विराजमान झालं आहे.
सर्वात मोठा पक्ष काँग्रेस- 21 जागा
राज्यपाल गंगाप्रसाद
"क्वॅकक्वॅरेली सायमंड' या संस्थेने 2018मधील जागतिक पातळीवरील उत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) सलग सहाव्या वर्षी बाजी मारली आहे.
जगातील 950 उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये "एमआयटी' यंदाही प्रथम क्रमांकावर झळकत आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिली चारही विद्यापीठे अमेरिकेतील आहेत. दुसरा क्रमांक स्टॅनफर्ड विद्यापीठाने पटकाविला असून, तिसऱ्या व चौथ्या जागेवर अनुक्रमे हारवर्ड विद्यापीठ व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्था आहेत.
भारतातील नऊ विद्यापीठांना या यादीत स्थान मिळाले आहे.
आयआयटी दिल्ली 172 . आयआयटी मुंबई 179, आयआयएस्सी बंगळूर 190, तर आयआयटी मद्रास 264 वा क्रमांक .
अपंगांच्या हक्कांसाठी झगडणारा भारताचा वैश्विक चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले सामाजिक कार्यकर्ते जावेद अबिदी यांचे निधन झाले.
त्यांनी अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी 'डिसअॅबिलिटी राइट ग्रुप' (डिआरजी)ची स्थापना केली होती.
'राइट्स फॉर पर्सन विथ डिसअॅबिलिटी बिल 2014' हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी 2015 मध्ये दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर अपंगांचा कँडल मार्च काढला होता.
उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये जन्मलेल्या जावेद अबिदी यांना स्पिनिया बिफिडा झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे वयाच्या 15 वर्षापासूनच त्यांना व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला. स्वत: अपंग असल्याने अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
कृष्ण कुमारी कोलही या पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला खासदार बनल्या आहेत.
विशेष म्हणजे कृष्णा कुमारी या हिंदू दलित असून बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून त्या निवडून आल्या आहेत.
पाकिस्तानच्या सिनेटवर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या हिंदू महिला खासदार ठरल्या आहेत.
जगभरात बालविवाहांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून मागच्या दशकात ही संख्या वेगाने कमी झाल्याचे युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
2.5 कोटी बालविवाहांवर प्रतिबंध घालण्यात यश आल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे.
हे प्रमाण कमी होण्यामध्ये दक्षिण आशियातील देशांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.
आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीवरुन पुण्यातील गहुंजे मैदानाच्या खेळपट्टीचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना सहा महिन्यांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.