कृष्णा गोदावरीचे खोरे आणि बंगालच्या उपसागराच्या तळाशी मिथेन वायूचे मोठे साठे सापडल्याची घोषणा राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने केली.
हे वायूचे साठे समुद्र तळाशी केवळ तीन मीटर खोलीवर असल्याने वायू बुडबुड्यांच्या स्वरुपात सातशे मीटर खोलवरपर्यंत वर येत असल्याचे या संस्थेच्या संशोधकांना आढळून आले आहे.
समुद्राच्या पाण्याच्या अंतरंगाचे छायाचित्रण करण्याचे तंत्रज्ञान एनआयओने विकसित केले आहे. त्या आधारे घेतलेल्या छायाचित्रांत सातशे मीटर खोलीवर काही बुडबुडे दिसले. त्या बुडबुड्यांच्या स्त्रोतांचा शोध घेताना मिथेन वायूचा शोध लागला आहे.
जीडीपी वाढीच्या दरात भारताने चीनला टाकले मागे; डिसेंबरच्या तिमाहीत दर 7.2 टक्क्यांवर
मल्याळम मासिक गृहलक्ष्मीच्या कवर पेजवर मॉडल व लेखिका गिलु जोसेफ एक एका नवजात बालकाला स्तनपान करताना दिसली आहे, यावर मतमतांतरे नोंदवली जात आहेत.
तामिळनाडू , कर्नाटकमध्ये बलात्कार आणि हत्याच्या घटनांनी दहशत निर्माण करणाऱ्या ‘सायको शंकर’ने मंगळवारी तुरुंगात आत्महत्या केली. शिक्षा भोगत असताना सायको शंकरने दोन वेळा तुरुंगातून पलायन केले होते.
तामिळनाडू, कर्नाटकमध्ये 2008 ते 2009 या कालावधीत एम जयशंकर या सायको किलरने दहशतच निर्माण केली होती.
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी सीबीएसईने दिलासा दिला आहे. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना आता अंतर्गत आणि सीबीएसई बोर्ड परीक्षा मिळून ३३ टक्के गुण प्राप्त करावे लागतील. पूर्वी दोन्ही परीक्षांत ३३-३३ टक्के गुण घ्यावे लागत होते.