चालू घडामोडी 1 मार्च 2018

  • देशात आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात पळ काढणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने फ्युगिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स बिल' (‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयका’)ला मंजुरी दिली.
  • या विधेयकामुळे मोठे आर्थिक गैरव्यवहार करून पळून जाणाऱ्या उद्योजकांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहे. 'बेनामी मालमत्तांसह आर्थिक गैरव्यवहार करून देशातून बाहेर जाणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. शिवाय, अशा व्यक्तींची देशाबाहेर असलेली संपत्तीही जप्त करण्याचा अधिकार या विधेयकामुळे मिळणार आहे.
  • तथापि, परदेशातील संपत्तीवर कारवाई करण्यासाठी त्या देशाचे सहकार्य आवश्‍यक असेल.
  • पी. चिदंबरम केंद्रात अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडिया या कंपनीत परदेशी गुंतवणूकीत मंजूरी देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात कार्ती चिदंबरम यांना अटक झालीअसून कोर्टाने त्यांना 6 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
  • डिजिटल रेशन कार्ड (शिधा पत्रिका) करून ते आधार क्रमांकाशी लिंक केल्यामुळे सरकारला सुमारे 2.75 कोटी बनावट आणि बोगस रेशन कार्ड पकडण्यास मदत झाली आहे. सबसिडीवरील धान्य घेण्यासाठी या रेशन कार्डचा वापर होत.
  • रेशन कार्डचे डिजिटलीकरण करण्याची प्रक्रिया जानेवारी 2013 मध्ये सुरू झाली होती.
  • खासदारांच्या भत्त्यांमध्ये 40 हजारांच्या वाढीला कॅबिनेटची मंजुरी. त्यानुसार, खासदारांच्या मतदारसंघ भत्ता, फर्निचर भत्ता आणि संपर्क खर्चांच्या भत्त्यात मोठी वाढ होईल. खासदारांना आता प्रति महिना 45 हजार रूपये ऐवजी 70 हजार रूपये मिळतील. त्याचपद्धतीने कार्यालय भत्ता 45 हजार रूपयांवरून 60 हजार करण्यात आला आहे. या दोन भत्त्यांशिवाय एकरकमी फर्निचर भत्त्याला सध्याच्या 75 हजार रूपयांवरून एक लाखपर्यंत वाढवला आहे.
  • खासदारांच्या या भत्त्यांमध्ये दर पाच वर्षांनी वाढ होईल.
  • पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. ईडी आणि सीबीआयतर्फे ही कारवाई सुरु आहे. ईडीने आत्तापर्यंत मेहुल चोक्सीच्या 1217 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. मुंबईतील 15 फ्लॅट आणि 17 कार्यालये, कोलकाता येथील शॉपिंग मॉल आणि अलिबाग येथील ४ एकर जागेवर उभारण्यात आलेले फार्महाऊस याचा यात समावेश आहे.
  • 1March
  • चर्चेतील पंजाब नॅशनल बॅंकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता
  • कांची कामकोटी पीठाचे प्रमुख शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन झाले.
  • जयेंद्र सरस्वती हे या पीठाचे 69 वे शंकराचार्य होते.