इंदूरच्या अमी कमानी हिने आशियाई स्नूकर स्पर्धेत विजेतेपद जिंकले. अशी कामगिरी केलेली ती भारताची पहिलीच महिला ठरली.
तिने अंतिम फेरीत थायलंडच्या सिरीपापोर्न नुआनथाखामजान हिला 3-0 असे हरविले.
आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाची ध्वजधारक हा बहुमान अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला देण्यात आला आहे.
पत्नीने केलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या वेगवान गोलंदाज महंमद शमीला थोडासा दिलासा मिळाला आहे. मॅच फिक्सिंगसंदर्भात बीसीसीआयने केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक समितीच्या चौकशीत तो निर्दोष ठरला. त्यामुळे वेतनश्रेणीच्या 'ब' गटात त्याचा समावेश करण्यात आला. पर्यायाने आयपीएल खेळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
फणसाला नुकतेच केरळच्या राज्यफळाचा मान मिळाला आहे. या राज्यात होणारे फणसाचे उत्पादन आणि निर्यात यावरुन हा मान बहाल करण्यात आला आहे.
केरळमध्ये दरवर्षी ३० ते ६० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते. हे उत्पादन संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करुन कोणतीही कटकनाशके न वापरता केलेले असते.
फणसाला राज्याचे फळ म्हणून मान देणारे केरळ हे पहिले राज्य

भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तारूढ असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (रालोआ) गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) फारकत घेतली आहे. या महिन्यात रालोआ सोडणारा हा दुसरा पक्ष ठरला आहे.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पात जगातील सर्वात उंच पूल चिनाब नदीवर बांधण्यात येत असून त्याचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.
उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प केला जात आहे
तांत्रिक अडचणींमुळे मागे पडलेल्या पुलाच्या कामाला 2007 पासून प्रत्यक्षात वेग आला. जुलै 2019 पर्यंत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. रेल लिंक प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण होणार असून त्याआधीच चिनाब नदीवरील पूल सेवेत येणार आहे. पुलाची लांबी 1315 मीटर असून पुलाची उंची 350 मीटर आहे. 1315 मीटर लांबीपैकी 700 मीटर लांबीचे काम पूर्ण.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी अखिलाडुवृत्तीचा कडेलोट करीत चेंडू कुरतडण्यापर्यंत कहर केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा नियमाबह्य कॅमेरॉन बँक्रॉफ्ट केल्याची कबुली कर्णधार स्टीव स्मिथ याने दिली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षक टीम पेन कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.