चालू घडामोडी 22 फेब्रुवारी 2018

  • भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान उडवणाऱ्या फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

  • 22Feb

  • जून 2016 मध्ये अवनी आणि भावना कंठ, मोहना सिंह यांना भारतीय हवाई दलाच्या लढाऊ स्क्वाड्रनमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले होते.
  • भारतीय वायूदलातील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी मिग -21 हे लढाऊ विमान उडवत भारतीय संरक्षण दलात एक नवा इतिहास रचला आहे.
  • 19 फेब्रुवारीला गुजरातच्या जामनगर येथील हवाई तळावरुन अवनी यांनी ‘फाइटर एअरक्राफ्ट मिग -21 बिसन’च्या साथीने आकाशात झेप घेतली. जवळपास 30 मिनिटांच्या या उड्डाणानंतर अवनी यांच्या फायटर एअरक्राफ्टने पुन्हा भूतलावर लँडिंग केलं.
  • महत्वाची माहिती चोरण्याच्या उद्देशाने अनेक हॅकर्स डेटा चोरी करतात. याच सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदर्भात अमेरिकेतील अकमै टेक्नोलॉजी या कंपनीने नुकतेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातील अहवालानुसार सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत सातव्या स्थानी आहे.
  • अकमै टेक्नोलॉजीने नुकताच जाहीर केलेल्या ‘स्टेट ऑफ द इंटरनेट’ अहवालामध्ये सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
  • मागील वर्षी भारतात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांपैकी 40 टक्के म्हणजेच 53 हजारहून अधिक सायबर हल्ले हे आर्थिक क्षेत्रांशीसंबंधीत बेवसाईट्स आणि अॅप्लिकेशन्सवर झाले आहेत.
  • सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा न्यायाधीशांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 8 फेब्रुवारी रोजी भूसंपादनावरुन न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर बुधवारी न्या. कुरियन जोसेफ यांच्या खंडपीठाने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
  • इंदौर विकास प्राधिकरणाच्या भूसंपादनावरुन हा निर्णय देण्यात आला होता. शासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरु केल्याच्या पाच वर्षांच्या आत जमीन मालकाने मोबदला स्वीकारण्यास विलंब केला असेल तर भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते.
  • सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला दुसरे खंडपीठ कसे काय आव्हान देऊ शकते, या मुद्द्यावर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली.
  • आयआयटी मुंबईतील इंजिनीअर्सच्या स्टार्टअपमध्ये,कारनॉट टेक्नॉलॉजीस या कंपनीमध्ये महिंद्र अँड महिंद्र कंपनीने सहा कोटी रुपयांची गुंतवणूक करून 22.9 टक्के हिस्सा विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. आधीची कारनॉट कंपनी स्मार्ट कार सोल्युशन्सवर काम करत होती जी आता कारसेन्स या नावानं ओळखली जाते.
  • कारसेन्स ही स्मार्ट कार सोल्युशन देणारी सेवा त्यांनी दाखल केली आहे.
  • विशेष म्हणजे कारनॉट हा स्टार्टअप आयआयटी मुंबईमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी 2015 मध्ये लाँच केला. पुष्कर लिमये, रोहन वडगावकर, प्रथमेश जोशी व उर्मिल शाह अशी या इंजिनीअर्सची नावं असून कारसेन्स हे आताच उत्पादनाचं नाव आहे. कारसेन्सचं उत्पादन करणं, विक्री करणं, सेवा पुरवणं आणि वाहनांची व उत्पादनाची कार्यक्षमता तपासणं ही सगळी कामं केली जातात.
  • कारसेन्स हे स्मार्ट कार डिव्हाइस असून कारमध्ये ऑन बोर्ड डायग्नोस्टिक या पोर्टला लावलं जातं, व ते ग्राहकाच्या स्मार्टफोनशी अॅपनं जोडलेलं असतं. सर्विसिंगच्या सूचना, सुरक्षेचे उपाय, देखभालीच्या सूचना, जीपीएस ट्रॅकिंग, अपघाताचा अॅलर्ट, वाहनाची कार्यक्षमता, इंधनाचा वापर, सफरीची माहिती, वेगानं गाडी चालवल्यास सूचना. रस्त्यावर मध्येच कसली गरज पडली तर मदत अशी बहुआयामी कामगिरी कारसेन्स करतं.