चालू घडामोडी 23 फेब्रुवारी 2018
ओपनसिग्नल या मोबाइल अॅनालिटिक्स कंपनीने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार देशात 4जीचा वेग हा सर्वाधिक कमी आहे.
हा वेग पाकिस्तान, अल्जेरिया, कझाकस्तान आणि ट्युनिशिया या देशांपेक्षाही कमी आहे.
6 खंडातील जवळपास 88 देशांतील 4-जी डाऊनलोड स्पीडची चाचणी केली यात भारत देश खूपच मागे असल्याचं समोर आलं आहे.
भारतात 4जीचा वेग सरासरी 6 mbps इतका आहे. अनेकदा तो यापेक्षाही कमी असतो. तर पाकिस्तानमध्ये मात्र हा वेग भारतापेक्षा दुप्पटीहून अधिक म्हणजे 14 mbps इतका आहे.
4-जी डाऊनलोडच्या बाबतीत सिंगापूर, नेदरलँड, नॉर्वे हे आघाडीवर आहेत.
गेल्यावर्षी ‘ओक्ला’ संस्थेनं देखील मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात 109 व्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं होतं.