चालू घडामोडी 21 फेब्रुवारी 2018

मोबाईल क्रमांक राहणार 10 अंकांचेच !
  • फक्त मशिन टू मशिन (M2M) याअंतर्गत येणाऱ्या उपकरणांमध्येच म्हणजे इलेक्ट्रिक मीटर्स, स्वाइप मशिन्स आणि कार यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डचे नंबर 13 अंकांचे असतील. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलणार नाहीत. त्यांचे मोबाईल क्रमांक 10 अंकीच राहतील.
  • राजधानी दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मारहाण झाल्याच्या आरोपामुळे चर्चेत आलेले सत्ताधारी 'आप'पक्षाचे दोन आमदार- अमानतुल्ला खान आणि प्रकाश जरवाल
  • दाक्षिणात्य अभिनेता कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. मदुराईच्या ओथाकडाई मैदानात कमल हसनने आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली.
  • कमल हसनच्या नवीन पक्षाचं नाव ‘मक्कल निधी मय्यम’ असं आहे. 21Feb
  • एका ताऱ्याभोवती सहा हातांनी केलेली गुंफण असं हसन यांच्या नवीन पक्षांचं चिन्ह असणार आहे.
  • दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
  • इशरत जहाँ चकमक प्रकरणातून गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी पी पांडे यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषमुक्त केले.
  • पांडे हे सध्या जामिनावर बाहेर असून 2013 मध्ये त्यांना सीबीआयने अटक केली होती.
  • फेब्रुवारी 2015 मध्ये ते जामिनावर गेल्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले.
  • ते 1980 च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी आहेत.
  • कृष्णा लाल कोहली ठरल्या पाकिस्तानातील निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या दलित महिला.
  • पाकिस्तान संसदेच्या निवडणूकांमध्ये कोहली सहभागी झाल्या आहेत.
  • किशू बाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहली यांना सिनेटसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)2017-18 साठीच्या व्याजदरात कपात केली आहे. गेल्या वर्षी हा व्याजदर 8.65 टक्के इतका होता तो आता 8.55 टक्के इतका असणार आहे.
  • ईपीएफओने 2016-17 साठी 8.65 टक्के व्याजदर निश्चित केला होता. जो 2015-16 मध्ये 8.80 टक्के इतका होता.
  • अब्जाधीश नीरव मोदी याच्यानंतर रोटोमॅक पेन कंपनीचा प्रवर्तक विक्रम कोठारी कर्ज बुडवून विदेशात पळून गेला आहे. कानपूरस्थित रोटोमॅक कंपनी.
  • कोठारी याने मुंबईस्थित युनियन बॅंक ऑफ इंडियाकडून 485 कोटी रुपये आणि कोलकतास्थित अलाहाबाद बॅंकेकडून 352 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.