20 मार्च -जागतिक चिमणी दिन
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.
जागतिक बँकेचे भारताचे संचालक :- जुनैद अहमद
इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांना इसिसने मारल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली . यामध्ये अनेकजण पंजाब राज्यातील आहेत. 2014 मध्ये मोसुलमधून काही भारतीयांचे अपहरण झालं होतं.
दहशतवाद्यांशी लढताना अंगावर 9 गोळ्या झेलूनही मृत्यूच्या दाढेतून परतलेले सीआरपीएफ कमांडंट चेतन चिता हे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) चेतन चीता या कमांडिंग ऑफिसरना कीर्तिचक्र पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. काश्मीरच्याच हाजिन क्षेत्रात गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांशी लढताना चेतन चिता हे गंभीररीत्या जखमी झाले होते. या कारवाईत त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या.
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि अण्णाद्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे निधन झाले.
प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात (एनआरसीपी) 14 राज्यांतील 32 नद्यांचा समावेश करण्यात आला असून, यात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे.
अमेरिकेत सोमवारपासून बेपत्ता असलेले नोबेल पुरस्कार विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ एई-ईची नेगिशी इलिनॉय राज्याच्या उत्तरेकडील ग्रामीण भागात वाट चुकून भरकटलेले सापडले. त्यांच्या पत्नीचा मृतदेहही तेथून जवळच आढळून आला.
सन 2010 मध्ये नोबेल मिळालेले 83 वर्षांचे नेगिशी इंडियाना राज्यात पर्ड्यू विद्यापीठात प्राध्यापक आहेत. या दाम्पत्याचे कॅम्पसजवळच येथे घर आहे.