चालू घडामोडी 19 मार्च 2018

  • लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक असा दर्जा देण्याची शिफारस केंद्राकडे करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. कर्नाटक मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
  • कर्नाटक अल्पसंख्याक कायदा 2 (डी) अंतर्गत ही शिफारस करण्यात येणार आहे. लिंगायत आणि विरशैव लिंगायत धर्माची शिफारस करण्याचा निर्णयही झाला. लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून राज्यभरात आंदोलने होत आहेत.
  • स्थलांतरितांना वाहून नेणारी एक संशयित बोट बुडाल्यानंतर पूर्व एजियन भागात एका ग्रीक बेटाजवळच्या समुद्रातून 14 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
  • पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बियंत सिंग यांच्या 19Marchहत्या प्रकरणात चंदीगडमधील जिल्हा न्यायालयाने जगतार सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 31 ऑगस्ट 1995 रोजी चंदीगडमध्ये सचिवालयाबाहेर बॉम्बस्फोट घडवून बियंत सिंग यांची हत्या करण्यात आली होती. या स्फोटात मुख्यमंत्र्यांसह 17 जणांचा मृत्यू झाला होता. पंजाब पोलीस दलातील दिलावर सिंगने मानवी बॉम्ब बनून स्वत:ला स्फोटात उडवून घेतले होते. चंदीगड सत्र न्यायालयाने जगतार सिंगला दोषी ठरवले.
  • या प्रकरणात खटला 1995 सालीच सुरु झाला होता.