विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील 60 विद्यापीठांना ऑटोनॉमी अर्थात स्वायत्तता प्रदान केली आहे.
आता या विद्यापीठांना कोणताही निर्णय घेण्यासाठी यूजीसीवर अवलंबून राहावे लागणार नाही. नवे कोर्स आणि फिस निश्चितीसह अनेक निर्णय घेण्याचे विद्यापीठांना अधिकार मिळणार आहेत.
केंद्रीय विद्यापीठ :जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ, तेलंगणाचे इंग्लिश आणि फॉरेन लँगवेज विद्यापीठ यांचा समावेश आहे.
स्टेट यूनिव्हर्सिटी :सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता, अलगप्पा विद्यापीठी (तामिळनाडू), नाल्सर यूनिव्हर्सिटी ऑफ लॉ (तेलंगना), आंध्र विद्यापीठ (विशाखापट्टनम), नॅशनल लॉ यूनिव्हर्सिटी (दिल्ली) यांच्यासह 21 विद्यापीठ.
खासगी विद्यापीठ :सोनीपत येथील ओपी जिंदल यूनिव्हर्सिटी, गुजरातमधील पंडित दीन दयाल पेट्रोलियम यूनिव्हर्सिटी यांचा समावेश आहे.
सरकारने चार वर्षांनंतर संसदेत मान्य केले की, इराकमध्ये बेपत्ता झालेले 39 भारतीय जीवंत नाहीत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत याबाबत निवेदन दिले आहे. या मुद्द्यावर राजकारणही होत आहे.
या प्रकरणातील जिवंतपणे परतलेला एकमेव भारतीय: -हरजित मसीह.
फोटो शेअरिंग अॅप्लिकेशन इन्स्टाग्रॉमने भारतात पहिल्यांदा इन्स्टाग्राम पुरस्काराची घोषणा केली आहे. विराट कोहलीला सर्वात व्यग्र सेलिब्रिटी (मोस्ट एंगेज्ड सेलिब्रिटी) म्हणून निवडण्यात आले.
भारताच्या नवज्योत कौरने एशियन कुस्ती स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली. दुसरीकडे या स्पर्धेत साक्षी मलिक 62 किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरली
भारतीय संघ आयबीएसएफच्या जागतिक स्पर्धेत विश्वविजेता ठरला. भारताने पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा स्नूकर टीम वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव केला. वर्ल्ड चॅम्पियन पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांनी फायनलमध्ये उल्लेखनीय खेळी करताना वर्ल्डकप मिळवून दिला.
जगातील एकमेव पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू
केन्यातील ओआय पेजेटा अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी ही दुखद वार्ता जगाला दिली. सुदान असे नाव असलेला हा गेंडा 45 वर्षांचा होता. तसेच तो पृथ्वीतलावरील एकमेव मेल व्हाइट ऱ्हायनो (पांढरा गेंडा) होता.