2008च्या आरूषी हत्याकांडप्रकरणी सुप्रीम कोर्टाने तलवार दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला नोकर हेमराजच्या पत्नीने आव्हान दिले आहे. तिने दाखल केलेल्या याचिकेनंतर तलावार दाम्पत्याला सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. हेमराजची पत्नी खुमकला बंजाडेने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले.
26 नोव्हेंबर 2013 ला सीबीआय न्यायालयाने तलवार दाम्पत्याला आरूषी हत्याकांड आणि नोकर हेमराजची हत्या केल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र 12 ऑक्टोबर 2017 मध्ये अलाहाबाद कोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय बदलून तलवार दाम्पत्याची सुटका केली.
रशियामध्ये अध्यक्ष निवडीसाठी मतदान पार पडले. यांत रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. पुतिन यांच्याशिवाय अन्य सात उमेदवार या निवडणुकीत सहभागी होते. परंतु गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी तब्बल 73.9 टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे आता आणखी सहा वर्षांचा कार्यकाल त्यांना मिळणार आहे.
आगामी निवडणुकांमध्ये "ईव्हीएम'ऐवजी पारंपरिक मतपत्रिकांचा वापर करण्याची विनंती करणारा ठराव काँग्रेस पक्षाच्या 84 व्या महाअधिवेशनात करण्यात आला. "ईव्हीएम'चा गैरवापर होत असल्याबद्दल काँग्रेसकडून चिंता व्यक्त करण्यात आली.