चालू घडामोडी 17 मार्च 2018

  • सरकारच्या उच्चस्तरीय समितीने वाहन स्क्रॅप धोरणास तत्त्वत: मंजुरी दिली. त्यानुसार आता 1 एप्रिल 2020 पासून 20 वर्षांपेक्षा जुनी ट्रक, बस, टॅक्सीसारखी व्यावसायिक वाहने (कमर्शियल व्हेइकल्स) चालवता येणार नाहीत. देशात सध्या 2 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त व्यावसायिक वाहने 20 वर्षांपेक्षा जुनी आहेत.
  • वर्ल्ड बँकेच्या 14 मार्चच्या 'इंडिया डेव्हलपमेंट अपडेट'च्या सहामाही अहवालानुसार, भारताचा जीएसटी रेट जगातील दुसरा सर्वात जास्त रेट आहे. रिपोर्टमध्ये 115 देशांच्या जीएसटीची तुलना भारताशी करण्यात आली होती. दुसरीकडे, वर्ल्ड बँकेचे असेही म्हणणे आहे की, भारतीय व्यवस्थेने याला आणखी जटील बनवले आहे.,असे सांगण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मणिपूर विद्यापीठात 105 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन झाले.
  • महाराष्ट्र, बिहार, गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिसा, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून सर्व उमेदवार राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आहेत.
  • संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील 58 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे येत्या 23 मार्च रोजी या रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जे. पी. नड्डा आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह अन्य सात केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. देशातील 16 राज्यांतील 58 जागांसाठी निवडणुका होत आहेत.
  • केंद्र सरकारने आता आंध्रची स्वतंत्र रेल्वे मार्गाची मागणी फेटाळली आहे.
  • 17Marchमानवी तस्करी केस : सिंगर दलेर मेहंदी दोषी, 2 वर्ष कैदेची शिक्षा,
  • दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेरवर आरोप होता की त्यांनी काही लोकांना आपल्या टीममध्ये असल्याचे सांगून बेकायदेशीररित्या विदेशात घेऊन गेले होते. यासाठी ते मोठी रक्कम घेत होते. हे प्रकरण 1998 ते 2003 दरम्यानचे आहे.