चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -20 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. स्त्री शिक्षणाचे उगमस्थळ असलेला कोणता वाडा राष्ट्रीय स्मारक होणार असल्याची घोषणा अलिकडेच करण्यात आली ?

A. चाफेकर वाडा
B. शनिवार वाडा
C. भिडे वाडा
D. ढापे वाडा


Click for answer

C. भिडे वाडा

2. इस्रायलची संसद क्नेसेटने इस्रायलला कोणत्या धर्माच्या लोकांचे राष्ट्र म्हणून विधेयक नुकतेच संमत केले ?

A. मुस्लिम
B. ज्यू
C. ख्रिश्चन
D. धर्मनिरपेक्ष


Click for answer

B. ज्यू

या विधेयकामुळे अरबी भाषेचा अधिकृत दर्जा हिरावून घेण्यात आला असून त्यास विशेष दर्जा अशी श्रेणी देण्यात आली आहे. तसेच अविभाजित जेरुसलेम शहराला देशाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कायद्यानुसार आता हिब्रू ही इस्रायलची राष्ट्रभाषा झाली असून ज्यू धर्मिय हे 'राष्ट्रहिताचा विषय' घोषित करण्यात आले आहे.

इस्रायलचा राष्ट्रध्वज, धार्मिक प्रतिक मेनोराह ( ज्यू धर्मियांच्या हनुक्का सणाच्यावेळेस वापरला जाणारा मेणबत्त्यांचा स्टँड), हकित्वा हे राष्ट्रगीत, हिब्रू कॅलेंडर, इस्रायलचा स्वातंत्र्यदिन या सर्वांचा समावेश विधेयकात केला आहे.

या विधेयकामुळे अरबी भाषेचा अधिकृत दर्जा हिरावून घेण्यात आला असून त्यास विशेष दर्जा अशी श्रेणी देण्यात आली आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

3. एअरसेल-मॅक्सीस खटल्याच्या नव्या आरोपपत्रात सीबीआयने कोणत्या माजी केंद्रीय मंत्र्यांच्या नावाचा समावेश केला आहे ?

A. दयानिधी मारन
B. पी. चिदम्बरम
C. वायलर रवी
D. संतोष मोहन देव


Click for answer

B. पी. चिदम्बरम

पतियाळा हाऊस कोर्टामध्ये सीबीआयने दाखल केलेल्या या आरोपपत्रात पी. चिदम्बरम, त्यांचा मुलगा कार्ती व इतर 16 जणांचे नाव आरोपींच्या यादीमध्ये आहे

4. गोपाल दास नीरज यांचे गुरुवारी निधन झाले. ते काय म्हणून सुपरिचित होते ?

A. समाजसेवक
B. राजकीय विश्लेषक
C. मानववंश शास्त्रातील अग्रणी संशोधक
D. हिंदीचे प्रसिद्ध कवी आणि गीतकार


Click for answer

D. हिंदीचे प्रसिद्ध कवी आणि गीतकार

गोपाल दास नीरज यांना 1991 मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2007 मध्ये त्यांचा 'पद्मभूषण'ने सन्मान करण्यात आला होता. तसेच उत्तर प्रदेश सरकारने त्यांना 'यशभारती' हा सन्मान दिला होता.

1970,1971 आणि 1972 मध्ये त्यांना 'फिल्म फेयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हिंदी चित्रपटासाठी लिहिलेले काही प्रसिद्ध गीतं - बस यही अपराध मैं हर बार करता हूं', 'ए भाई! ज़रा देख के चलो', शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, लिखे जो खत तुझे, ऐ भाई.. जरा देखकर चलो, दिल आज शायर है, खिलते हैं गुल यहां, फूलों के रंग से, रंगीला रे! तेरे रंग में और आदमी हूं- आदमी से प्यार करता हूं यांचा समावेश आहे.

5. कोणत्या देशातील नागरिकांनी 15 जुलै रोजी 'डे विदाऊट सेल फोन' मोहिमेत सहभाग घेत मोबाईल फोनपासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे ?

A. पोलंड
B. जपान
C. जर्मनी
D. कॅनडा


Click for answer

A. पोलंड

6. जर एखाद्या खेळाडूने वय लपवलं तर त्याच्यावर किती वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआय(भारतीय क्रिकेट नियामक मंडळ)ने घेतला आहे ?

A. एक
B. दोन
C. पाच
D. आजन्म


Click for answer

A. दोन

7. आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या) एकदिवसीय क्रमवारीत प्रथम स्थानावर कोणता खेळाडू आहे ?

A. डेव्हिड वॉर्नर
B. विराट कोहली
C. जो रुट
D. रॉस टेलर


Click for answer

B. विराट कोहली

8. कोणत्या तारखेपासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) डीमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर आणि बॅंकेने काढलेल्या धनादेशावर देणारा व घेणारा अशा दोन्ही व्यक्तींची नावे नोंदविणे बंधनकारक केले आहे ?

A. 16 ऑगस्ट 2018
B. 1 सप्टेंबर 2018
C. 15 सप्टेंबर 2018
D. 1 जानेवारी 2018


Click for answer

C. 15 सप्टेंबर 2018

9. सर्च इंजिनला मजबूत ठेवण्यासाठी अ‍ॅन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टम च्या वापराबाबत कोणत्या कंपनीला युरोपियन संघाने 4.3 अब्ज युरो म्हणजेच 34 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठाववला आहे ?

A. मायक्रोसॉफ्ट
B. याहू
C. गुगल
D. अॅपल


Click for answer

C. गुगल

10. महाराष्ट्रातील नव्याने निवडून आलेल्या कोणत्या दोन खासदारांनी नुकतीच लोकसभेच्या सदस्यपदाची शपथ घेतली ?

A. दामू शिंगडा आणि हेमंत पटले
B. राजेंद्र गावीत आणि मधुकरराव कुकडे
C. दिलीप दुमाडा आणि प्रफुल्ल पटेल
D. अमित घोडा आणि जमसिंघभाऊ बघेले


Click for answer

B. राजेंद्र गावीत आणि मधुकरराव कुकडे

पालघर लोकसभा मतदार संघातून नव्याने निवडून आलेले खासदार राजेंद्र गावीत आणि भंडारा व गोंदिया लोकसभा मतदासंघातून निवडून आलेले खासदार मधुकरराव कुकडे यांचा समावेश आहे.

पालघरचे माजी खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर येथील जागा रिक्त झाली होती, तर माजी खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे पद रिक्त होते. रिक्त जागा भरण्यासाठी या दोन्ही मतदार संघात नुकत्याच पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या.