चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -18 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. मंडेला दिन कधी साजरा केला गेला ?
A. 18 जुलै
B. 17 जुलै
C. 15 जुलै
D. 14 जुलै
Click for answer
A. 18 जुलै
नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन अथवा मंडेला दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या सन्मानार्थ सन 2010 पासून साजरा केला जातो.
ह्या वर्षी त्यांची जन्मशताब्दी असून त्या निमित्ताने झालेल्या सोहळ्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित होते.
2. चौदा प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या घटनेला 19 जुलै रोजी किती वर्षे पूर्ण होत आहेत ?
A. 51
B. 50
C. 49
D. 25
Click for answer
C. 49
इंदिरा गांधींनी 19 जुलै 1969 रोजी 14 प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करून एक मोठे धाडसी पाऊल टाकलेल्या घटनेला आज 49 वर्ष झाली. पुढील प्रमाणे 14 बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाले बॅंक ऑफ महाराष्ट्र, देना बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, सिंडिकेट बॅंक, कॅनरा बॅंक, इंडियन बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक, बॅंक ऑफ बरोडा, युनियन बॅंक, अलाहाबाद बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, युको बॅंक आणि बॅंक ऑफ इंडिया. तत्कालीन हंगामी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी 19 जुलै रोजी राष्ट्रीयीकरणाचा अध्यादेश काढला
3. कोणत्या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्रादोर यांनी माजी राष्ट्रपतींच्या वेतनापेक्षा 40 टक्के कमी वेतन घेणार असल्याचे जाहीर केले आहे ?
A. अर्जेन्टिना
B. व्हेनेझुएला
C. चिली
D. मेक्सिको
Click for answer
D. मेक्सिको
इतकेच नाही, तर राष्ट्रपती म्हणून आपल्या सहा वर्षांच्या कार्यकालात कोणाही सरकारी अधिकाऱ्याला राष्ट्रपतींपेक्षा जास्त वेतन घेता येणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
4. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने नुकत्याच जाहिर केलेल्या विश्वक्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघ कितव्या स्थानी आहे ?
A. तिसऱ्या
B. पाचव्या
C. प्रथम
D. सातव्या
Click for answer
B. पाचव्या
या क्रमवारीत 1906 गुणांसह ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर आहे, तर त्यापाठोपाठ अर्जेंटिना,बेल्जियम, हॉलंड ह्या देशांचे संघ आहेत.
5. मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या कोणत्या स्थानकाचे नाव बुधवारी मध्यरात्रीपासून प्रभादेवी स्थानक करण्यात येणार आहे ?
A. एल्फिन्स्टन रोड
B. चर्नी रोड
C. मरीन लाईन्स
D. सँडहर्स्ट रोड
Click for answer
A. एल्फिन्स्टन रोड
मुंबई प्रेसिडन्सीचे 1853 ते 1860 दरम्यान गर्व्हनर असलेल्या लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून या स्थानकाचे नाव एल्फिन्स्टन रोड ठेवण्यात आले होते.
प्रभादेवी या पुरातन देवीच्या मंदिरावरून या परिसरास प्रभादेवी म्हटले जाते.
6. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कोणाचे नाव देण्याबाबतच्या विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली ?
A. कवी सोपानदेव चौधरी
B. बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे
C. कवयित्री बहिणाबाई चौधरी
D. मधुकरराव चौधरी
Click for answer
C. कवयित्री बहिणाबाई चौधरी
11 ऑगस्ट रोजी बहिणाबाईंची जयंती असते. त्या दिवशी विद्यापीठाचा नामविस्तार कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला जाईल.
7. लष्करी विधि महाविद्यालय कोठे सुरू करण्यात आले आहे ?
A. कान्हे (पुणे)
B. नागपूर
C. कोल्हापूर
D. सांगली
Click for answer
A. कान्हे (पुणे)
लोणावळा जवळील कान्हे जवळ हे सुरू करण्यात आले आहे. लष्करी विधि महाविद्यालयात सध्या फक्त लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. गुणवत्तेच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे. मात्र, आगामी काळात संस्थेचा विस्तार करण्यात येणार आहे.
8. भारताला जागतिक अजिंक्यपद ( 20 वर्षांखालील ) स्पर्धेत ट्रॅक प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देणा-या हिमा दास ला कोणत्या राज्याने राज्याची 'स्पोर्ट्स अॅम्बेसेडर' करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे ?
A. मेघालय
B. पश्चिम बंगाल
C. ओडिशा
D. आसाम
Click for answer
D. आसाम
आसामच्या हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक नावावर केले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले.
9. कोणत्या राज्याने राज्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱ्यास दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. सिक्कीम
B. महाराष्ट्र
C. उत्तराखंड
D. गोवा
Click for answer
D. गोवा
पुढील महिन्यापासून गोव्यामध्ये कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना अथवा घाण करताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे.
10. अन्य मासळी राज्यांमधून आयात केलेल्या मासळीत फॉर्मेलिन या घातक रसायनाचा अंश सापडल्याने खळबळ उडाल्यानंतर, कोणत्या राज्य सरकारने पुढील पंधरा दिवसांसाठी इतर राज्यांमधून होणाऱ्या मासळी आयातीवर बंदी घातली आहे ?
A. कर्नाटक
B. गोवा
C. महाराष्ट्र
D. गुजरात
Click for answer
B. गोवा
गोव्यातील लोकांनी मासळी खरेदीची एवढी धास्ती घेतली होती की गेले आठ दिवस मासे बाजार ओस पडले होते.
Newer Post
Older Post
Home