चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -29 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्या राजधानीच्या शहरात आलेले अमेरिकन सैन्य आता अधिकृतरित्या बाहेर पडणार आहे ?

A. बगदाद
B. काबूल
C. टोकियो
D. सेऊल


Click for answer

D. सेऊल

दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये आलेले अमेरिकन सैन्य आता अधिकृतरित्या बाहेर पडणार आहे.

आता या तुकडीचे मुख्यालय दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्या सीमेजवळ नेण्यात य़ेणार आहे. जपानशी लढण्यासाठी अमेरिका 1945 मध्ये सेऊलमध्ये सैन्य आणले होते. त्यानंतर सलग सात दशके ते येथच ठेवण्यात आले.

2. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भ्रष्टाचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने कोणते ॲप तयार केले आहे ?

A. हॅलो क्रिकेट ॲप
B. क्लिन क्रिकेट ॲप
C. इंटेग्रीटी ॲप
D. जंटलमन गेम ॲप


Click for answer

B. इंटेग्रीटी ॲप

हे ॲप खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफ यांच्यासाठी असणार आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आणि उत्तेजक प्रतिबंधक विरोधी कायद्यांची सर्व माहिती या ॲपवर उपलब्ध असणार आहे.

त्याशिवाय भ्रष्टाचार आणि उत्तेजक यांच्यासदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाली झाल्यास त्याची तक्रार ॲपवरून करता येणार आहे.

3. न्यूयॉर्कच्या इंटरनॅशनल कन्सल्टिंग फर्म मर्सरच्या, कॉस्ट ऑफ लिव्हिंगने २०१८ मध्ये या संदर्भात केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार शहर हे भारतातले सर्वात महागडे शहर ठरले आहे ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. चेन्नई
D. कोलकाता


Click for answer

A. मुंबई

जगातील एकूण 209 प्रमुख शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे.

संपूर्ण जगात हाँगकाँग हे शहर सर्वात महागडे शहर ठरले आहे.

दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि मुंबई या भारतीय शहरांचा या यादीत समावेश आहे. मुंबईचा जगातील यादीत 55 वा क्रमांक आहे. तर दिल्ली 103, चेन्नई 144, बंगळुरूचा 170 तर कोलकाता 182 व्या स्थानावर आहे.

4. महाराष्ट्र शासनाच्या वन, सामाजिक वनीकरण तसेच इतर विभागांच्या प्रयत्नांतुन कोणत्या कालावधीत वृक्षलागवड मोहीम राबविली जाणार आहे ?

A. 1 ते 15 जुलै
B. 16 ते 31 जुलै
C. 1 ते 15 ऑगस्ट
D. 16 ते 31 ऑगस्ट


Click for answer

A. 1 ते 15 जुलै

5. 'जय हिंद -1 एस' हा कृत्रिम नॅनो उपग्रह कोणत्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केला आहे ?

A. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे
B. हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, चेन्नई
C. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई
D. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कोइम्बतुर


Click for answer

B. हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, चेन्नई

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी स्वयंम हा उपग्रह तयार केला होता.

आता चेन्नईच्या हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या एरोस्पेस विभागातील विद्यार्थ्यांनी 'जय हिंद 1 एस' हा आजवरचा सर्वात कमी वजनाचा उपग्रह तयार केला आहे .

6. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान नजीब रज्जाक यांच्यावर केलेल्या कारवाईत 273 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती जप्त आल्याची माहिती तेथील पोलीसांनी दिली आहे ?

A. मालदीव
B. फिलिपाईन्स
C. मलेशिया
D. इंडोनेशिया


Click for answer

C. मलेशिया

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदभ्रष्ट झालेले मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रज्जाक यांच्या सहा ठिकाणच्या निवासस्थानांवर घातलेल्या छाप्यांमध्ये पोलीसांनी 273 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती जप्त केली आहे.

7. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची शिखर परिषद येत्या 16 जुलै रोजी कोठे होणे नियोजित आहे ?

A. सेऊल
B. पॅरीस
C. हेलसिंकी
D. न्यूयॉर्क


Click for answer

C. हेलसिंकी

8. केंद्र सरकारने देशातील उच्च शिक्षण संस्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे अस्तित्व संपुष्टात आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्याऐवजी कोणती संस्था/आयोग स्थापन होणार आहे ?

A. नीती आयोग
B. भारतीय शिक्षण पध्दती आयोग
C. भारतीय उच्च शिक्षण आयोग
D. विश्व विद्यालय अनुदान आयोग (सुधारित)


Click for answer

C. भारतीय उच्च शिक्षण आयोग

'हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया'ची (एचईसीआय) स्थापना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यासाठी अधिनियमाचा मसुदा तयार केला आहे. येत्या 7 जुलैपर्यंत नव्या अधिनियमाच्या मसुद्यावर मते मागविण्यात आली आहेत.

या दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी युजीसी मध्ये बदल करून एचईसीआय करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

9. स्विस नॅशनल बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये भारतीयांच्या स्विस बँकेतील ठेवींमध्ये किती टक्के वाढ होऊन ठेवींचा आकडा 7 हजार कोटींवर पोहोचल्याचे नमूद केले आहे ?

A. 10 टक्के
B. 25 टक्के
C. 50 टक्के
D. 100 टक्के


Click for answer

C. 50 टक्के

10. कोणते राज्य सरकार कामगारांना स्वस्तात म्हणजे दहा रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी उपहारगृहे सुरु करणार आहे ?

A. कर्नाटक
B. दिल्ली
C. तामिळनाडू
D. हरियाणा


Click for answer

D. हरियाणा

नोंदणीकृत कामगारांना सरकारद्वारे मिळणा-या योजनांचा लाभ घेता येणार आहे.