चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -28 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. कोणता दिवस जीएसटी दिवस म्हणून देशभरात साजरा केला जाणार आहे ?
A. 1 जुलै
B. 15 जुलै
C. 1 ऑगस्ट
D. 15 ऑगस्ट
Click for answer
A. 1 जुलै
1 जुलैला भारतात जीएसटी लागू झाल्याला वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने केंद्र सरकार 1 जुलै हा दिवस जीएसटी दिवस म्हणून देशभरात साजरा करणार आहे.
स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर सुधारणा झालेली प्रणाली म्हणून जीएसटीकडे पाहिले जात आहे.
2. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांची यादी 2011 मधील जनगणनेच्या आधारे तयार करण्यात आली असून त्यात देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी कितव्या स्थानी आहे ?
A. दुसऱ्या
B. तिसऱ्या
C. चौथ्या
D. सातव्या
Click for answer
B. तिसऱ्या
हिंदी देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिल्या स्थानावर असून हिंदी मातृभाषा असलेल्या नागरिकांचा टक्का 41.03 वरून वाढून 43.63 एवढा झाला आहे.
तर, 8.3 टक्क्यासह बंगाली दुसऱ्या स्थानावर आहे.
मराठीचा टक्का वाढून 2011 मध्ये 7.09 एवढा झाला आहे.
चौथ्या स्थानी तेलगु आहे .राष्ट्रीय भाषा सूचीतील 22 भाषांपैकी संस्कृत ही सर्वात कमी बोलली जाणारी भाषा ठरली आहे.
3. देशातील मेट्रो रेल प्रणालीसाठी मानके निश्चित करण्याकरिता स्थापना करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. अरुण काकोडकर
B. नंदन निलकेणी
C. डॉ. ई. श्रीधरन
D. के. सिवान
Click for answer
D. डॉ. ई. श्रीधरन
मेट्रो संदर्भात अनेक क्षेत्रात स्वदेशी मानके निश्चित करण्याची गरज आहे. यामुळे नव्या मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी विहित नमुन्यात करता येईल. दीर्घकालीन गुंतवणुकीला यामुळे चालना मिळणार असून मेट्रो रेल उभारणी आणि कार्यान्वयाचा खर्च देखील कमी होईल.
सध्या देशातल्या विविध 10 शहरांमध्ये 490 किमीच्या मेट्रो कार्यान्वित आहेत.
4. देशातील हे पहिले बांबू संशोधन केंद्र कोठे उभारण्यात येत आहे ?
A. चिचपल्ली (चंद्रपूर)
B. अंबिकानगर (गुजरात)
C. फैजाबाद (उत्तरप्रदेश)
D. कर्नाल (हरियाणा)
Click for answer
A. चिचपल्ली (चंद्रपूर)
हे बांबू केंद्र चंद्रपूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचपल्ली येथे आकार घेत आहे. ह्या केंद्राची इमारत देखील बांबूपासून बनवली जाणार आहे. अशाप्रकारे बांधली जात असलेली ही आशिया खंडातील पहिली इमारत असेल.
बांधकामासाठी जो बांबू वापरण्यात आला, तो बालकुवा आणि माणगा प्रजातीचा असून त्याचा परिघ सुमारे चार ते पाच इंच आहे. एवढ्या मोठ्या परिघाचा बांबू राज्यात नसल्यामुळे तो आसाम आणि सिलिगुडी येथून मागवण्यात आला. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या केंद्राच्या ज्या भिंती बांधल्या जात आहेत, त्या लाल माती आणि सिमेंटमिश्रित आहेत. वाळू आणि विटांचा कुठेही वापर करण्यात आलेला नाही.
5. मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या कोणत्या योजनेला मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे ?
A. सुकन्या समृध्दी योजना
B. कन्या वनसमृद्धी योजना
C. माझी कन्या भाग्यश्री योजना
D. लाडली लक्ष्मी योजना
Click for answer
B. कन्या वनसमृद्धी योजना
या योजनेचा दरवर्षी दोन लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होईल, असा अंदाज आहे.
मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला सरकारकडून 10 रोपे विनामूल्य देण्यात येणार आहेत. त्यात 5 रोपे सागाची, 2 रोपे आंब्याची आणि फणस, जांभुळ व चिंचेच्या प्रत्येकी एका रोपाचा समावेश आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल.
6. अमेरिकेच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह 'हाउस ऑफ रिप्रझेंटेटिव्हसाठी मेरीलँड मतदारसंघातून भारतीय वंशाच्या कोणी उमेदवारी अर्ज भरला आहे ?
A. अरुणा मिलर
B. कमला हारिस
C. निकी हॅले
D. नम्रता रंधवा
Click for answer
A. अरुणा मिलर
प्राथमिक निवडणुकीत अरुणा यांनी विजय मिळविल्यास मेरीलँड मतदारसंघात त्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी त्या डेमोक्रेटिक उमेदवार ठरणार आहेत.
खासदार म्हणून अरुणा निवडून आल्यास प्रमिला जयपाल यांच्यानंतर अमेरिकेच्या संसदेत प्रवेश करणाऱया त्या दुसऱया भारतीय वंशाच्या महिला ठरतील. 2016 मध्ये प्रमिला यांना युएस हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सदस्या म्हणून निवडण्यात आले होते.
याशिवाय भारतीय वंशाच्या अमेरिकन सेनेटर कमला हारिस यांनी 2020 मध्ये होणाऱ्या अमेरिकी अध्यक्षपदाचा उमेदवार होण्यात रस दाखवला आहे. जमैका व भारत येथून आलेल्या स्थलांतरित दाम्पत्याची कन्या असलेल्या कमला या डेमोक्रॅटिक पक्षाच्या वजनदार नेत्या आहेत.
7. गोवा पर्यटन विकास महामंडळाव्दारे कोणते टॅक्सी अॅप पुढील महिन्यात सुरू होत आहे ?
A. गोवामिल्स
B. गोवाव्हिल्स
C. गो गोवा गो
D. गोटॅक्सी
Click for answer
A. गोवामिल्स
गोव्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांवर ही सुविधा पुढच्या महिन्यापासून उपलब्ध होणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या 'गोवामिल्स' या मोबाईल ऍप वर जवळजवळ 2800 परवानाधारक टॅक्सी चालकांनी सहभाग नोंदवला आहे,
8. निर्वासितांना आणि 5 मुस्लिमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करणारा ट्रम्प यांचा आदेश योग्य असल्याचा निर्णय अमेरिकच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हे देश कोणते आहेत ?
A. इराण, लीबिया, सोमालिया, सीरिया, येमेन
B. अफगाणिस्तान, इराण, इराक, सीरिया, येमेन
C. इराण, लीबिया, इराक, सीरिया, येमेन
D. अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक, सीरिया
Click for answer
A. इराण, लीबिया, सोमालिया, सीरिया, येमेन
9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 5 विरुद्ध 4 अशा मताने ट्रम्प यांचा आदेश वैध ठरवला आहे. आणि तो अंशत: लागू करण्याला संमती दिली आहे.
ट्रम्प प्रशासनाने 7 देशावर हे निर्बंध आणले होते. मात्र उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला ह्या देशाच्या नागरिकांना केलेल्या प्रवेशबंदीला आव्हान देण्यात आलेले नव्हते. स्थलांतरितांवर नियंत्रण ठेवण्याचे पुरेसे अधिकार अध्यक्षांना आहेत असे मुख्य न्यायाधीश जॉन डी रॉबर्टस यांनी निकालात म्हटले आहे.
9. 2014 चा फुटबॉलचा फिफा चषक कोणत्या देशाने जिंकला होता ?
A. जर्मनी
B. अर्जेन्टिना
C. ब्राझील
D. स्पेन
Click for answer
A. जर्मनी
तथापि, शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियाने जर्मनीला 2-0 असे हरवले आणि त्यांचे या वि श्वचषकातले आव्हान संपुष्टात आले आहे .
10. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या पुढील चांद्रमोहिमाचा एक उद्देश हा कोणत्या अणुइंधनाचा शोध घेणे हाआहे ?
A. पॅलाडीयम
B. हेलियम-3
C. ड्यूटेरीयम
D. ट्रीटीयम
Click for answer
B.हेलियम-3
'चांद्रयान-2' मोहिमेत शक्तिशाली अग्निबाणाने 'ऑर्बिटर', 'लॅण्डर' व 'रोव्हर' अशा तीन गोष्टी चंद्रावर पाठविल्या जातील. यापैकी 'ऑर्बिटर' चंद्राला प्रदक्षिणा करत राहील, तर 'लॅण्डर' 'रोव्हर'सह चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
'रोव्हर' ही सौरऊर्जेवर चालणारी सहाचाकी गाडी असेल. ऑक्टोबरमध्ये 'चांद्रयान-2' मोहिमेत सोडले जाणारे 'रोव्हर' चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून पाणी व 'हेलियम-3'चे लवलेश सापडतात का, हे शोधण्यासाठी मृदावरणाचे (क्रेस्ट) विश्लेषण करेल.
'हेलियम-3' हे द्रव्य पृथ्वीवर अतिदुर्मीळ असले, तरी चंद्रावर ते मुबलक प्रमाणात असावे, असे वैज्ञानिकांना वाटते.
अमेरिकेच्या 'अपोलो'नेही चंद्रावर 'हेलियम-3' असण्याच्या संभाव्यतेस दुजोरा मिळाला होता.
चंद्रावर एक दशलक्ष मेट्रिक टन 'हेलियम-3' असावे, असा अंदाज आहे. 'हेलियम-३' अन्य अणुइंधनांप्रमाणे किरणोत्सारी नाही. त्यापासून आण्विक कचरा निर्माण होत नाही.
तथापि जरी हे इधन प्राप्त झाले तरी ते वापरण्यासाठी अजूनही खूप संशोधन करावे लागेल. हे इंधन वापरण्याकरिता अणू संमिलन (अॅटॉमिक फ्युजन) तंत्रज्ञान वापरावे लागेल, आज चालणाऱ्या अणुभट्ट्यांमध्ये अणु विखंडन' (अॅटॉमिक फिजन) प्रक्रिया वापरली जाते.
इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान
Newer Post
Older Post
Home