चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -20 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. फेमिना मिस इंडिया 2018 विजेतेपदाचा मान कोणी पटकावला आहे ?
A. अनुकृती वास
B. श्रेया राव
C. गायत्री भारद्वाज
D. स्टेफी पटेल
Click for answer
A. अनुकृती वास
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया 2018 ची अंतिम फेरी मुंबईतील एनएसईआय, वरळी येथे संपन्न झाली. या कार्यक्रमात हरियाणातील मीनाक्षी चौधरी फर्स्ट रनर अप तर सेकंड रनर अप आंध्रप्रदेशची श्रेया राव ठरली.
2. कोणत्या राज्यात आजपासून राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे ?
A. कर्नाटक
B. दिल्ली
C. गोवा
D. जम्मू आणि काश्मीर
Click for answer
D. जम्मू आणि काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे काश्मीरमध्ये आता राज्यपाल राजवटीचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार होते. मात्र, भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले.
भारतातील इतर राज्यांमध्ये राज्य सरकार अपयशी ठरल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, पण जम्मू काश्मीरमध्ये असं होत नाही येथे राज्यपाल लागवट लागू केली जाते.
जम्मू-काश्मिरच्या संविधानातील कलम 92 नुसार राज्यात सहा महिन्यांसाठी राज्यपाल लागवट लागू करता येते, पण राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरच राज्यपाल लागवट लागू करता येते.
भारताच्या संविधानाने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला आहे, आणि वेगळं संविधान व नियम असणारं हे देशातील एकमेव राज्य आहे. तर देशातील इतर सर्व राज्यांमध्ये संविधानाच्या कलम 356 नुसार राष्य़्रपती लागवट लागू केली जाते.
राज्यपाल लागवटीअंतर्गत राज्यातील विधानसभा निलंबीत असते किंवा भंग केली जाते. जर सहा महिन्यांमध्ये राज्यात सामान्य परिस्थिती झाली नाही तर राज्यपाल लागवटीमध्ये वाढ करता येते.
3. जम्मू-काश्मीरचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?
A. पद्मनाभ बालकृष्ण आचार्य
B. एन.एन.वोहरा
C. वजूभाई वाला
D. एस.सी. जमीर
Click for answer
B. एन.एन.वोहरा
जून 2008 मध्ये त्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती, त्यानंतर 2013 मध्ये त्यांना पुन्हा राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं.
देशातील निवडक राज्यपालांमध्ये वोहरा यांची गणना होते, कारण त्यांची नियुक्ती युपीए सरकारने केली होती, पण भाजपाच्या सरकारमध्येही ते आपल्या पदावर कायम आहेत.
4. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून कोणता देश नुकताच बाहेर पडला ?
A. इस्त्राईल
B. अमेरिका
C. कांगो
D. रशिया
Click for answer
B. अमेरिका
अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेओ आणि संयुक्त राष्ट्रातल्या अमेरिकेच्या राजदूत निकी हॅली यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
UNHRCची स्थापना 2006मध्ये झाली. मानवी हक्क उल्लंघनाचे आरोप असलेल्या देशांनाही या परिषदेचं सदस्यत्व दिलं गेलं, त्यामुळे परिषदेवर टीकाही झाली आहे. UNHRCची स्थापना झाल्यावर अमेरिकेनं त्यात सहभागी होण्यास नकार दिला होता.
ओबामा प्रशासनानं ही भूमिका बदलून 2009मध्ये सदस्यत्व स्वीकारलं होतं. या परिषदेवर दर तीन वर्षांनी एकूण 47 देशांची निवड केली जाते.ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य होता. यापूर्वी अमेरिकेने माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळातही तीन वर्षांसाठी मानवाधिकार परिषदेवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले आणि अमेरिका पुन्हा या परिषदेत सहभागी झाला होता. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा अमेरिकेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
5. संयुक्त राष्ट्रातल्या अमेरिकेच्या राजदूत कोण आहेत ?
A. निकी हॅली
B. सुनेत्रा गुप्ता
C. जेनेट येलेन
D. कॅथलीन रुबिन्स
Click for answer
A. निकी हॅली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी निकी हॅली भारतीय वंशाच्या निकी हॅली यांची अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांमधल्या दूत म्हणून निवड केली. आपल्या प्रचारमोहिमेमध्ये त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. त्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या शर्यतीतही होत्या.
निक्की हॅली या नॉर्थ कॅरॉलिना राज्याच्या दोनदा गव्हर्नर राहिल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतल्या सर्वात तरुण गर्व्हर्नर होण्याचा मान त्यांना मिळालाय.
त्यांचे मूळ नाव :निम्रत रंधावा.
अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा घेतलेल्या पत्रकार परिषदेत निकी हॅली म्हणाल्या, "व्हेनेझुएला आणि इराण या देशांत होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल मानवाधिकार परिषद काहीही करू शकत नाही. तसंच, काँगोसारख्या देशाचं नवीन सदस्य म्हणून स्वागत केलं जात असेल तर मानवाधिकार परिषदेच्या अस्तित्वाला काय अर्थ उरतो?"
6. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम 19 जून 2018 रोजी कोणत्या संघाने केला ?
A. ऑस्ट्रेलिया
B. इंग्लंड
C. दक्षिण आफ्रिका
D. पाकिस्तान
Click for answer
B. इंग्लंड
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 50 षटकांत 481 धावांचा डोंगर उभारला. हे करताना त्यांनी त्यांचाच दोन वर्ष जूना 444 धावांचा विक्रम मोडला.
7. कोणत्या संघाने 19 जून 2018 रोजी प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली ?
A. लीसेस्टरशायर
B. भारतीय क्रिकेट संघ
C. भारत-अ
D. नॉटिंगहॅमशायर
Click for answer
C. भारत-अ
प्रथम श्रेणी सामन्यात भारत अ संघाने लीसेस्टरशायर संघाविरुद्ध 50 षटकांत 4 बाद 458 धावा केल्या. या अ दर्जाच्या सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या धावा होत्या. काल या यादीत भारत अ (458) दुसऱ्या स्थानी आला होता. परंतु त्यानंतर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने 481 धावा करत केवळ 3 तासांत हा विक्रम आपल्या नावे केला.
अ दर्जाच्या सामन्यांत संघाने केलेल्या सर्वोच्च धावा-
496 सरे विरुद्ध ग्लॉस्टरशायर, 2007
481- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2018 (काल)
458- भारत अ विरुद्ध लीसेस्टरशायर, 2018 (काल)
445- नॉटिंगहॅमशायर विरुद्ध नॉर्थॅमटनशायर, 2016
443- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, 2016
8. अर्जुन सिंह हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ?
A. उत्तरप्रदेश
B. मध्यप्रदेश
C. दिल्ली
D. पंजाब
Click for answer
B. मध्यप्रदेश
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अर्जुन सिंह यांच्या पत्नी राजमाता सरोज कुमारी यांना त्यांच्याच मुलांनी बेघर केले आहे. सरोज कुमारी यांनी मुलांविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी भोपाळ येथील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.
9. कोणत्या राजघराण्यात पहिल्यांदाच समलैंगिक विवाह अधिकृतपणे होत आहे ?
A. ब्रिटन
B. स्पेन
C. भूतान
D. सौदी अरेबिया
Click for answer
A. ब्रिटन
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ व्दितीयचे चुलत भाऊ लॉर्ड इवार माऊंटबॅटन आपला समलैंगिक साथीदार जेम्स कोयलसोबत लग्न करणार आहे
10. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यत्वासाठी झालेल्या निवडणुकीत आशिया-पॅसिफिक विभागातून कोणत्या देशाची निवड झाली ?
A. इंडोनेशिया
B. मालदिव
C. भारत
D. पाकिस्तान
Click for answer
A. इंडोनेशिया
8 जूनला झालेल्या या निवडणुकीत इंडोनेशियाच्या बाजूने 144 देशांनी मतदान केले. तर मालदिवला केवळ 46 देशांनी पाठिंबा दिला.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाच कायम सदस्य राष्ट्रे आहेत - अमेरिका, रशिया, चीन , ब्रिटन आणि फ्रान्स . अन्य 10 सदस्य हे अस्थायी असून ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात.
इंडोनेशिया चौथ्यांदा या सदस्यत्वासाठी निवडला गेला आहे.
1965 ला या सदस्यत्वासाठी झालेल्या वादानंतर इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतून बाहेर पडून संयुक्त राष्ट्रांना समांतर CONEFO (Conference of the New Emerging Forces )या संघटनेची निर्मिती केली होती.
Newer Post
Older Post
Home