चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -12 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. रिझव्‍‌र्ह बँकेतील डेप्युटी गव्हर्नरपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. एम. के. जैन
B. चरण सिंह
C. के. पी. कृष्णन
D. यदुवेंद्र माथूर


Click for answer

A. एम. के. जैन

रिझव्‍‌र्ह बँकेतील डेप्युटी गव्हर्नरपदी आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एम. के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँक क्षेत्रातून नियुक्त करण्यात येणाऱ्या पदाकरिता जैन यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर जैन हे पुढील तीन वर्षांसाठी असतील.

डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा हे जुलै 2017 मध्ये निवृत्त झाल्यापासून चारपैकी एक डेप्युटी गव्हर्नरपद रिक्तच होते. रिझव्‍‌र्ह बँकेत सध्या विरल आचार्य, एन. एस. विश्वनाथन आणि बी. पी. कांगो हे तीन डेप्युटी गव्हर्नर आहेत.

जैन हे आयडीबीआय बँकेत मार्च 2017 पासून व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील आहेत.

2. जून 2018 मध्ये महिला आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले ?

A. बांगलादेश
B. भारत
C. इंग्लंड
D. ऑस्ट्रेलिया


Click for answer

A. बांगलादेश

बलाढय़ भारतीय संघावर सनसनाटी विजय मिळवीत बांगलादेशने अजिंक्यपद मिळविले. क्वालालंपूर येथे रविवारी झालेल्या अंतिम लढतीत बांगलादेशने ही किमयागारी केली. या संघासाठी प्रशिक्षक म्हणून अंजू जैन व देविका या दोन्ही भारतीय प्रशिक्षकांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.

बांगलादेश च्या विजयात सहायक प्रशिक्षक देविका पळशीकर या मराठमोळय़ा क्रिकेटपटूचा महत्त्वाचा वाटा आहे.

3. खालीलपैकी कोणी नुकत्याच झालेल्या जी-7 बैठकीचा जाहीरनामा फेटाळून लावला आहे ?

A. अमेरिका
B. इटली
C. कॅनडा
D. युरोपियन युनियन


Click for answer

A. अमेरिका

संयुक्‍त जाहीरनाम्यापासून दूर राहिल्याने ट्रम्प यांनी जी-7चा विश्‍वास गमावला असल्याचे जर्मनीचे परराष्ट्र मंत्री मॅको मास यांनी म्हटले आहे, तर कॅनडाचे पंतप्रधाना जस्टिन ट्रुडॉ यांनी अमेरिकेच्या पाठीत सुरा खुपसला असाल्याचा आरोप व्हाईट हाऊसचे आर्थिक सल्लागार लॅरी कुदलॉव्ह यांनी केला आहे. एकूण जी-7 परिषदेनंतर अमेरिका आणि युरोपमध्ये व्यापारयुद्ध सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

4. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांनी व गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी या 'रेलवायर' व्हाय-फाय सेवेसाठी भारतीय रेल्वे व गूगल यांच्यात करार झाल्याची घोषणा केली होती . ही सेवा 400 स्टेशनवर या वर्षी डिसेंबर पर्यंत सुरु करण्याचे कंत्राट गूगलला दिले होते. गुगलने नुकतेच कोणत्या 400 व्या रेवले स्थानकावर ही सेवा देत हे कंत्राट वेळे आधीच पूर्ण केले ?

A. दादर, मुंबई
B. दिब्रुगड, आसाम
C. भोपाळ, मध्यप्रदेश
D. हजरत निजामदुद्दिन, नवी दिल्ली


Click for answer

B. दिब्रुगड, आसाम

5. गिटहब (GitHub) ही सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी विकत घेण्याचा निर्णय कोणत्या कंपनीने घेतला आहे ?

A. गुगल
B. याहू
C. मायक्रोसॉफ्ट
D. अमेझॉन


Click for answer

C. मायक्रोसॉफ्ट

हा करार साडेसात अब्ज डॉलरचा असेल. मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरचे सोर्सकोड सहजपणे उपलब्ध नसतात, तर गिटहब ही कंपनी इतरांना याबाबतीत सहकार्य करते. त्यामुळे या दोन वेगळ्या भूमिका असलेल्या कंपन्या आता एक होत आहेत.

6. हिरो इंटरकॉन्टिनेन्टल चषक ही आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा या वर्षी कोणी जिंकली ?

A. भारत
B. केनिया
C. पोर्तुगाल
D. अर्जेन्टिना


Click for answer

A. भारत

रविवारी झालेल्या जेतेपदाच्या लढतीत यजमान भारताने केनियाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. भारताने या स्पर्धेत एकूण 11 गोल केले, त्यापैकी 8 गोल एकटय़ा छेत्रीने नोंदवले आहेत. त्याचे आता एकूण 64 आंतरराष्ट्रीय गोल झाले असून अर्जेन्टिनाच्या मेस्सीशी त्याने बरोबरी केली आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल नोंदवणाऱया विद्यमान खेळाडूंत छेत्री व मेस्सी सध्या दुसऱया स्थानावर आहेत तर 150 सामन्यांत 81 गोल नोंदवणारा पोर्तुगालचा रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे.

7. भारतातील पहिले राष्ट्रीय पोलीस संग्रहालय कोणत्या शहरात बनणार आहे ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. हैदराबाद
D. डेहराडून


Click for answer

B. दिल्ली

दिल्लीच्या लुटियन भागात हे संग्रहालय बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राजधानीतील चाणक्‍यपुरीमध्ये राष्ट्रीय पोलीस स्मारक परिसरात हे भूमिगत संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय पोलीस दल आणि राज्यांच्या पोलीस दलांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याची संधी या संग्रहालयामुंळे मिळणार आहे. पोलीसांचे गणवेश आणि पोलीसांशी संबंधित अन्य सामग्रीचा संग्रह यात करण्यात येणार आहे.

8. दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले गेले ?

A. सुरेश रैना
B. हार्दिक पंड्या
C. विराट कोहली
D. युवराज सिंग


Click for answer

C. विराट कोहली

याचसोबत विराट कोहलीला लिओनेल मेस्सी, कपिल देव आणि उसेन बोल्ट यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळाले. मेरी तुसाँ यांनी सुरू केलेल्या मादाम तुसाँ संग्रहालयांच्या साखळीतले एक संग्रहालय नवी दिल्ली मध्ये आहे.

9. कोणत्या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या हॉवर्ड डी. शल्त्झ यांनी कंपनीतील त्यांच्या पदाचा त्याग केल्याने ते चर्चेत होते ?

A. कॅफे कॉफी डे
B. पिझ्झा हट
C. स्टारबक्स
D. वॉलमार्ट


Click for answer

C. स्टारबक्स

तब्बल तीस वर्ष स्टारबक्सला एका छोट्या लोकल कॉफी शॉप पासून ते ग्लोबल जायंट आणि हळुवारपणे राजकीय विषयावर भाष्य करणारे स्टारबक्सचे कार्यकारी अध्यक्ष हॉवर्ड डी. शल्त्झ कंपनी सोडून आहेत. 1982 साली स्टारबक्सचे म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

1987 मध्ये ही शृंखला विकत घेतली. स्टारबक्सची आता जगभरात 28,000 पेक्षा जास्त स्टोअर आहेत. 2000 मध्ये, त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीनामा दिला आणि कंपनीचे अध्यक्ष बनले. नंतर ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परतले आणि त्यांनी एक दहावर्षाहून अधिक काळ व्यवसायात चालण्यास मदत केली.

10. कोणत्या कार कंपनीने जगातील पहिली फ्लाईंग कारची अलीकडेच यशस्वी चाचणी घेतली ?

A. किटी हॉक
B. गूगल
C. होंडा
D. टेस्ला


Click for answer

A. किटी हॉक

किटी हॉक फ्लाईंग कार कंपनीने जगातील पहिली फ्लाईंग कार समोर आणली आहे. ही कार सिंगल सीटर आहे. प्रथमदर्शी एका मोठ्या ड्रोनप्रमाणे दिसणारी ही फ्लाईंग कार रनवे शिवायच वर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते. नुकतीच याची चाचणी पार पडली.

पाण्याच्या पृष्ठभागावरून सुरूवातीला 3 ते 10 फूट उंच ही फ्लाईंग कार उडवण्यात आली. ही कार हवेत 10 फूटांपर्यंत सध्या उडू शकते तसेच ताशी 20 मैलांचं अंतर पार पाडू शकते. पूर्णपणे इलेक्ट्रीक असणारी ही कार तंत्रज्ञानातील मोठं यश मानलं जात आहे. किटी हॉक फ्लाईंग कार ही कंपनी अमेरिकेतील दक्षिण कॅरीलोना इथे आहे.