चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -11 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. व्हिडीयोकॉन उद्योगसमुहाचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत ?
A. दानिश पालीवाल
B. वेणुगोपाल धूत
C. राकेश कपूर
D. आनंद महिंद्रा
Click for answer
B. वेणुगोपाल धूत
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील भारतातली दिग्गज कंपनी व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीजला लवकरच दिवाळखोर घोषित केलं जाण्याची शक्यता आहे.
कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनलमध्ये (एनसीएलटी) याचिका दाखल करुन व्हिडीयोकॉनला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी केली होती. ही मागणी दाखल करून घेण्यात आली आहे.
2. या वर्षीच्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पुरूष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले ?
A. राफेल नदाल
B. डॉमिनिक थिएम
C. रॉजर फेडरर
D. नोवाक जोकोविच
Click for answer
A. राफेल नदाल
"क्ले कोर्ट'चा राजा असा लौकिक मिळविणारा राफेल नदाल फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विक्रमी 11वे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम लढतीत नदालने ऑस्ट्रियाच्या सातव्या मानांकित डॉमिनिक थिएमचा 6-4, 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला
.नदालने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीतील 24व्या ग्रॅंड स्लॅम अंतिम लढतीत सामना जिंकत एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत 11 विजेतेपदे जिंकण्याच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
मार्गारेट कोर्टने 1960 ते 1973 या कालावधीत हा मान मिळविला होता.
3. या वर्षी 'दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजिवीका मिशन' अंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्रातील किती बचत गटांना गौरविण्यात आले ?
A. सात
B. चार
C. दोन
D. एक
Click for answer
C. दोन
बीड जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले महिला बचत गट व चंद्रपूर जिल्ह्यातील वैष्णवी महिला बचतगटाला 'दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजिवीका मिशन' अंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
वर्ष 2017-18 साठीचे हे पुरस्कार असून एकूण 34 स्वयंसहाय्यता गटांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
4. नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात स्वच्छ भारत योजनेअंतर्गत ग्रामीण स्वच्छतेचे उद्दिष्ट किती टक्के साध्य झाले आहे ?
A. 100%
B. 85%
C. 67%
D. 23%
Click for answer
B. 85%
गावातल्या समुदायांनी एकत्र येऊन आतापर्यंत 7.4 कोटी शौचालये बांधली आहेत. तसेच 3.8 लाख गावे आणि 391 जिल्हे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहेत. या अभियानाअंतर्गत सर्व गावांमध्ये अत्यंत वेगाने काम सुरू आहे.
एका स्वतंत्र संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 6 हजार गावांमधील 90 हजार घरांमध्ये आता शौचालये वापरली जातील. प्रमाण 93.4 टक्के आहे.
हागणदारीमुक्त आणि शौचालय बांधणी अशा दोन्ही उद्दिष्टांसाठी काम करणारे स्वच्छ भारत अभियान देशातले पहिलेच अभियान आहे.
5. रेल्वे प्रवासादरम्यान पुरवण्यात येणाऱ्या खानपान सेवेची माहिती देणारे कोणते ॲप नुकतेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते जारी करण्यात आले ?
A. खाना खजाना
B. मेन्यू ऑन रेल्स
C. रेल मदद
D. पॅलेस ऑन व्हील्स
Click for answer
B. मेन्यू ऑन रेल्स
प्रवासादरम्यान पुरवण्यात येणाऱ्या खानपान सेवेची माहिती या ॲपवर आहे. सर्व रेल्वेगाड्यांमधल्या मेन्यूची माहिती या ॲपवर असेल. पदार्थांच्या किमती करासहीत असतील. ॲण्ड्राईड आणि आयओएसवर हे ॲप उपलब्ध असेल. याशिवाय प्रवाशांच्या तक्रार निवारणीची प्रक्रिया जलद गतीने आणि अधिक सुरळीत होण्यासाठी
'रेल मदद'
या ॲपचा ही शुभारंभ करण्यात आला.
6. 'नेस्ट हॅल्लो' नावाची प्रगत डोअर बेल कोणत्या कंपनीने बाजारात आणली आहे ?
A. गुगल
B. मायक्रोसॉफ्ट
C. अमेझॉन
D. फेसबुक
Click for answer
A. गुगल
याच्या फेशिअल रिकग्निशन टेक्नोलॉजीमुळे दरवाज्यावर उभ्या व्यक्तिचा व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकतो. ही डोअरबेल वायफायवर चालणाऱ्या या स्मार्ट डोअरबेलमध्ये एक वाईड अॅंगल कॅमेरा असेल. हा कॅमेरा हाय डेफिनेशन व्हिडिओदेखील रेकॉर्ड करु शकेल. गेटवर उभ्या असलेल्या व्यक्तिशी कॅमेराद्वारे संवादही साधता येणार आहे. या नाईट व्हिजन मोडमध्येही काम करु शकणार आहे.
7. देशातील सौर ऊर्जा क्षमतेमध्ये 2014 पासून आतापर्यंत किती वाढ झालेली आढळून आलेली आहे ?
A. दुप्पट
B. चौपट
C. आठपट
D. दहापट
Click for answer
C. आठपट
2014 मध्ये 2.63 गिगावॅट असणारी क्षमता सध्या 22 गिगावॅटवर पोहोचली. तसेच, गेल्या वर्षात भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात चौथे स्थान पटकावले होते आणि या प्रकारातील क्षमता गेल्या चार वर्षात 21 गिगावॅटवरून 34 गिगावॅटवर पोहोचली.
8. युनिस गेसन यांचे नुकतेच निधन झाले. त्या काय म्हणून प्रसिध्द होत्या ?
A. पहिली 'बॉण्ड गर्ल'
B. पहिली 'स्टार वॉर गर्ल'
C. हॉलीवूड मधील पहिली 'महिला ' निर्माती
D. हॉलीवूड मधील पहिली 'महिला ' दिग्दर्शक
Click for answer
A. पहिली 'बॉण्ड गर्ल'
जेम्स बॉण्ड सीरिजमधील पहिला चित्रपट 'डॉ. नो' मध्ये त्यांनी भूमिका केली होती. जेम्स बॉण्ड सीरिजची सुरुवात 1962 साली 'डॉ. नो' चित्रपटापासून झाली. त्यामध्ये शॉन कॉनरी यांनी 007 एजंटची म्हणजेच जेम्स बॉण्डची भूमिका केली होती. या चित्रपटात गेसन यांनी सिल्विया ट्रेंच हिची व्यक्तिरेखा साकारली.
दोन बॉण्ड चित्रपट करणारी गेसन ही एकमेव अभिनेत्री आहे. 'रशिया विथ लव्ह' हा त्यांचा दुसरा बॉण्डपट होता.
9. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची बीसीसीआय कडून नुकतीच कोणत्या भारतीय संघात निवड करण्यात आली ?
A. एक दिवसीय क्रिकेट संघात
B. कसोटी क्रिकेट संघात
C. U-15 क्रिकेट संघात
D. U-19 क्रिकेट संघात
Click for answer
D. U-19 क्रिकेट संघात
अर्जुन तेंडुलकर याची भारताच्या U-19 संघात निवड करण्यात आलेली आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी अर्जुनची निवड करण्यात आलेली आहे.
10. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत ?
A. प्रविण तोगडिया
B. राघव रेड्डी
C. विष्णू कोकजे
D. प्रवीण सावरकर
Click for answer
C. विष्णू कोकजे
विश्व हिंदू परिषदेच्या 52 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत प्रविण तोगडियांचे समर्थक असलेल्या राघव रेड्डी यांचा दारुण पराभव करत विष्णू कोकजे यांनी बाजी मारली.
Newer Post
Older Post
Home