इतिहास प्रश्नसंच-9


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.

1. सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे सोलापुरातील खालीलपैकी कोणाला फाशी देण्यात आले ?

A. श्रीकृष्ण सारडा, मल्लप्पा धनशेट्टी
B. कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे
C. शिरीषकुमार, बाबू गेनू
D. A आणि B मधील सर्व


Click for answer

D. A आणि B मधील सर्व
श्रीकृष्ण सारडा, मल्लप्पा धनशेट्टी,कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना ब्रिटीश सरकारने फाशी दिल्याने हौताम्य प्राप्त झाले.

2. भारताशी संबंधित घटना प्रश्नांचा विचार करण्यासाठी सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद कोठे बोलवण्यात आली होती ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. लंडन
D. कोलकाता


Click for answer

C. लंडन

3. पहिल्या गोलमेज परिषदेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे खालीलपैकी कोण हजर होते ?

A. महात्मा गांधी
B. बाबासाहेब आंबेडकर
C. पंडित मदनमोहन मालवीय
D. कोणीही हजर नव्हते


Click for answer

D. कोणीही हजर नव्हते

4. गांधी-आयर्विन करार हा महात्मा गांधी आणि ___________आयर्विन यांच्यात झाला. या करारानुसार राष्ट्रीय सभेच्या सहकार्याच्या बदलात सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीची स्वीकार करण्याची हमी दिली

A. ब्रिटनचे पंतप्रधान
B. व्हाईसरॉय
C. भारतमंत्री
D. परराष्ट्र व्यवहार मंत्री


Click for answer

B. व्हाईसरॉय

5. गांधी-आयर्विन कराराची फलनिष्पत्ती म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेस राष्ट्रीय सभेने हजेरी लावली. दुसरी गोलमेज परिषद कधी पार पडली?

A. 1931
B. 1932
C. 1933
D. 1934


Click for answer

A.1931

6. 1931 च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेस भारतीय राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण हजर होते ?

A. महात्मा गांधी
B. पंडित जवाहरलाल नेहरू
C. सी. राजगोपालचारी
D. कोणीही हजर नव्हते


Click for answer

A. महात्मा गांधी

7. तिसरी गोलमेज परिषद कधी भरली होती ?

A. 1932
B. 1933
C. 1934
D. 1935


Click for answer

A. 1932

नोव्हेंबर 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद भरली होती.

8. भारतीय राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी कोणत्या गोलमेज परिषदेस परिषदांना हजर होते ?

A. सर्व
B. एकाही परिषदेला नाही
C. दुसर्‍या व तिसर्‍या
D. फक्त दुसऱ्या


Click for answer

D. फक्त दुसऱ्या

9. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कोणत्या वर्षी झाला ?

A. 1931
B. 1932
C. 1933
D. 1934


Click for answer

B. 1932

10. पुणे करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी विधिमंडळात किती राखीव जागा द्याव्यात असे ठरले ?

A. 48
B. 96
C. 148
D. 196


Click for answer

C. 148