चालू घडामोडी
स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-8
71. 'गाव' हा शब्द शब्दसिध्दीच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
A. तत्सम
B. तद्भव
C. उपसर्गघटीत
D. अभ्यस्त
Click for answer
B. तद्भव
72. 'दारात कोण आहे रे ?' ह्या वाक्यातील कोण हा शब्द कोणते सर्वनाम आहे ?
A. संबंधी सर्वनाम
B. सामान्य सर्वनाम
C. प्रश्नार्थक सर्वनाम
D. आत्मवाचक सर्वनाम
Click for answer
C. प्रश्नार्थक सर्वनाम
73. कानडी शब्द ओळखा.
A. पीठ
B. किल्ली
C. भाई
D. यांपैकी कोणताच नाही
Click for answer
B. किल्ली
74. 'सुरेश गीत गात होता' ह्या वाक्यातील काळ ओळखा.
A. अपूर्ण वर्तमानकाळ
B. अपूर्ण भूतकाळ
C. सामान्य भूतकाळ
D. सामान्य वर्तमानकाळ
Click for answer
B. अपूर्ण भूतकाळ
75. वैकल्पिक व्दंद समासाचे उदाहरण कोणते ?
A. मीठभाकर
B. गजानन
C. पापपुण्य
D. यांपैकी कोणताच पर्याय नाही
Click for answer
C. पापपुण्य
76. 'पुरणपोळी' ह्या शब्दाचा अर्थ
A. पुरण भरलेली पोळी
B. पुरणाची पोळी
C. पुरण आणि पोळी
D. गूळ घालून केलेली पोळी
Click for answer
A. पुरण भरलेली पोळी
77. एखाद्या विचारवंताचे विधान लिहिताना जसेच्या तसे लेखन करावयाचे असल्यास त्या वाक्याच्या सुरुवातीला व शेवटी ____________ हे विरामचिन्ह वापरतात.
A. उद्गारवाचक चिन्ह (!)
B. प्रश्नार्थक चिन्ह (?)
C. संयोगचिन्ह(-)
D. दुहेरी अवतरण चिन्ह ("....")
Click for answer
D. दुहेरी अवतरण चिन्ह ("....")
78. 'आज कार्यालय बंद आहे' या वाक्याचा काळ ओळखा.
A. केवल वाक्य
B. संयुक्त वाक्य
C. मिश्र वाक्य
D. प्रश्नार्थक वाक्य
Click for answer
A. केवल वाक्य
79. 'जीव भांड्यात पडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.
A. काळजी दूर होणे
B. भीती वाटणे
C. संकटात पडणे
D. धडा शिकविणे
Click for answer
A. काळजी दूर होणे
80. 'बडा घर पोकळ वासा' या अर्थाची म्हण ओळखा.
A. वरातीमागून घोडे
B. काखेत कळसा गावाला वळसा
C. गाढवाला गुळाची चव काय ?
D. नाव मोठे लक्षण खोटे
Click for answer
D. नाव मोठे लक्षण खोटे
Newer Post
Older Post
Home