स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-7


61. 'शिक्षक मुलांना शिकवितात' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

A. कर्मणी प्रयोग
B. कर्तरी प्रयोग
C. भावे प्रयोग
D. संकरीत प्रयोग


Click for answer

B. कर्तरी प्रयोग
62. 'झाडाखाली मुले बसलेली आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?

A. झाडाखाली
B. मुले
C. बस
D. खाली


Click for answer

D. खाली
63. एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रुपात बदल होतो तेव्हा त्याला ____________ म्हणतात.

A. विभक्ती
B. सामान्यरूप
C. विशेषण
D. क्रियाविशेषण


Click for answer

B. सामान्यरूप
64. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही ?

A. सुंदरपण
B. सुंदरता
C. सुंदर
D. सुंदरत्व


Click for answer

C. सुंदर
65. 'मी नोकरीतून निवृत्त झालो' या वाक्याचा प्रकार ओळखा.

A. केवल वाक्य
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. यापैकी कोणतेही नाही


Click for answer

A. केवल वाक्य
66. व्याकरणदृष्ट्या बरोबर लिहिलेला शब्द कोणता ?

A. आशिर्वाद
B. आशीर्वाद
C. आर्शिवाद
D. आर्शीवाद


Click for answer

B. आशीर्वाद
67. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?

A. साधू
B. वाघ
C. जीभ
D. यांपैकी कोणताच पर्याय ग्राह्य नाही


Click for answer

A. साधू
68. 'भगवती' या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते ?

A. देव
B. दैवत
C. भगीरथ
D. भगवान


Click for answer

D. भगवान
69. पिता, पुरुष हे संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे वापरले जाणारे शब्द आहेत, त्यांना __________ शब्द म्हणतात.

A. तद्‌भव
B. देशी
C. परभाषीय
D. तत्सम


Click for answer

D. तत्सम
70. 'ने,ए,शी' हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ?

A. प्रथमा
B. द्वितीया
C. तृतीया
D. चतुर्थी


Click for answer

C. तृतीया