इतिहास प्रश्नसंच-7


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.

1. सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी निवडलेले दांडी हे गाव कोणत्या राज्यात आहे ?

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. गोवा
D. कर्नाटक


Click for answer

गुजरात

2. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत प्रसिद्ध असलेल्या दांडी यात्रेसाठी गांधीजी आपल्या 78 सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून कोणत्या दिवशी निघाले ?

A. 6 मार्च 1930
B. 12 मार्च 1930
C. 6 एप्रिल 1930
D. 12 एप्रिल 1930


Click for answer

B. 12 मार्च 1930

3. दांडी यात्रेत गांधीजींनी पायी क्रमलेले साबरमती आश्रम ते दांडी हे अंतर किती किलोमीटर आहे ?

A. 78 किलोमीटर
B. 189 किलोमीटर
C. 276 किलोमीटर
D. 385 किलोमीटर


Click for answer

D. 385 किलोमीटर

4. दांडी यात्रेत कोणत्या दिवशी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला व देशभर कायदेभंगाची चळवळ सुरू झाली?

A. 6 मार्च 1930
B. 12 मार्च 1930
C. 6 एप्रिल 1930
D. 12 एप्रिल 1930


Click for answer

C. 6 एप्रिल 1930

5. ब्रिटीशकालीन भारतात वायव्य सरहद्द प्रांतात कार्यरत असणाऱ्या खान अब्दुल गफार खान या गांधीजींच्या निष्ठावान अनुयायांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?

A. छोटे गांधी
B. सरहद्द गांधी
C. पठाण
D. शेरखान


Click for answer

B. सरहद्द गांधी

6. खान अब्दुल गफार खान अर्थात सरहद गांधी यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती ?

A. खुदा-इ-खिदमतगार
B. सरहद्द-ए-वतन
C. मुहम्मदन एंग्लो-ओरिएण्टल कॉलेज
D. सरहद्द कॉंग्रेस


Click for answer

A. खुदा-इ-खिदमतगार(परमेश्वराचे सेवक)

7. सरहद्द गांधींनी 23 एप्रिल 1920 रोजी कोणत्या ठिकाणी सत्याग्रह सुरू केला ?

A. लाहोर
B. पेशावर
C. इस्लामाबाद
D. रावळपिंडी


Click for answer

B. पेशावर

8. सरहद्द गांधींनी पेशावर येथे सुरू केलेल्या सत्याग्रहाच्या वेळी आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहींच्या ताब्यात होते. सरकारने दिलेला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा हुकूम पाळण्यास कोणत्या पलटणीने नकार दिला होता ?

A. गोरखा
B. गढवाल
C. आसाम राईफल्स
D. बंगाल इंफेन्ट्री


Click for answer

B. गढवाल

9. सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान कोणत्या दिवशी ब्रिटीश सरकारने गांधीजींना अटक केली ?

A. 23 एप्रिल 1930
B. 4 मे 1930
C. 13 मे 1930
D. 30 मे 1930


Click for answer

B. 4 मे 1930

10. सविनय कायदेभंग चळवळीत कोणत्या ठिकाणी गिरणी कामगारांनी सत्याग्रह करीत हरताळ पाळला होता ?

A. सोलापूर
B. चंद्रपुर
C. औरंगाबाद
D. भुसावळ


Click for answer

A. सोलापूर