भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-4


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.

1. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

A. डॉ .बी.आर.आंबेडकर
B. डॉ. राजेंद्रप्रसाद
C. जवाहरलाल नेहरू
D. बी.एन. राव


Click for answer

D. बी.एन. राव

2. भारतीय " नागरिकत्व कायदा " केव्हा बनविण्यात आला ?

A. 1935
B. 1955
C. 1956
D. 1951


Click for answer

B. 1955

3. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली ?

A. 26 नोव्हेंबर 1949
B. 25 जानेवारी 1950
C. 26 जानेवारी 1950
D. 15 ऑगस्ट 1947


Click for answer

A. 26 नोव्हेंबर 1949

4. कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

A. अनुच्छेद 32
B. अनुच्छेद 25
C. अनुच्छेद 14
D. अनुच्छेद 30


Click for answer

अनुच्छेद 32

5. भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकांच्या मुलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या आहेत ?

A. पहिल्या
B. दुसऱ्या
C. तिसऱ्या
D. चौथ्या


Click for answer

C. तिसऱ्या

6. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट नाही ?

A. गो हत्या थांबविणे
B. कुटिरोद्योगांची स्थापना करणे
C. आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे
D. देहांताची शिक्षा रद्द करणे


Click for answer

D. देहांताची शिक्षा रद्द करणे

7. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे __________ होय.

A. राज्य विधी मंडळ
B. कार्यकारी मंडळ
C. संसद
D. न्यायमंडळ


Click for answer

C. संसद

8. राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये किती अँग्लो इंडीयन सदस्य नेमले जातात ?

A. दोन
B. तीन
C. चार
D. पाच


Click for answer

A. दोन

9. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे ?

A. 288
B. 19
C. 48
D. 25


Click for answer

C. 48

10. भारतीय न्यायपालीकेचे वैशिष्टय कोणते ?

A. न्यायपालिकेस विधीमंडळ नियंत्रित करते.
B. एकेरी व एकात्म न्यायपालिका
C. न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते
D. वरील सर्व


Click for answer

B. एकेरी व एकात्म न्यायपालिका