चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -30 एप्रिल 2018


एप्रिल 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. खालीलपैकी कोण सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत ?

इंदू मल्होत्रा
आर. भानुमती
एम. फातिमा बिबी
वृंदा ग्रोव्हर


Click for answer

A.इंदू मल्होत्रा

न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. 1989 मध्ये 39 वर्षीय एम. फातिमा बिबी यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

2. काही महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता कोणत्या भारतीय फुटबॉल खेळाडूने सिक्कीममध्ये स्वतःचा राजकीय पक्ष स्थापना केला आहे?

महम्मद सलीम
बायच्युंग भूतिया
सुनील छेत्री
जिक्सन सिंग


Click for answer

B.बायच्युंग भूतिया

व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने 2013 मध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये बायच्युंग भूतियाने तृणमूलकडून दार्जिलिंग मतदारसंघातून लोकसभा निवडणूकसुद्धा लढवली होती. परंतू भूतियाला भाजपच्या के एस एस अहलुवालिया यांच्याकडून हार पत्करावी लागली होती.

3. अलीकडेच कोणत्या राज्यातून सैन्य दल विशेष अधिकार कायदा अर्थात AFSPA कायदा हटवण्यात आल्याची घोषणा सोमवारी केंद्र सरकारने केली आहे ?

मेघालय
अरुणाचल प्रदेश
नागालँड
जम्मू आणि काश्मीर


Click for answer

A. मेघालय

मेघालयातून पूर्णतः तर अरुणाचल प्रदेशमधून अंशतः सैन्य दल विशेष अधिकार कायदा अर्थात AFSPA कायदा हटवण्यात आल्याची घोषणा सोमवारी केंद्र सरकारने केली. सप्टेंबर 2017 पासून मेघालयातील 40 टक्के भागात तर 2017 पासून अरुणाचल प्रदेशातील 16 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अफस्पा कायदा लागू करण्यात आला होता. दरम्यान, अरुणाचलच्या 8 ठाण्यांच्या हद्दीतून अफस्पा हटवण्यात आला आहे.

4. जागतिक बँकेने जारी केलेल्या वैश्विक फाइंडेक्स अहवालानुसार भारतातील किती वयस्कर व्यक्तींचे कोणत्याच बँकेत खाते नाही ?

9 कोटी
19 कोटी
29 कोटी
39 कोटी


Click for answer

B. 19

कोटीचीनमध्ये 22.5 कोटी वयस्कर लोक बँकिंग सेवेपासून वंचित आहेत. तर भारतात हा आकडा 19 कोटी इतका आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्ये 10 कोटी आणि इंडोनेशियामध्ये 9.5 कोटी लोकसंख्या बँकिंग सेवेपासून लांब आहे.

5. देशातील प्रतिष्ठित अशा भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) 50 माजी विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढण्याच्या उद्देशाने नोकऱ्या सोडून राजकीय पक्ष स्थापन केला आहे. या गटाने स्थापलेल्या पक्षाचे नाव काय आहे ?

बहुजन समाज पार्टी
बहुजन आझाद पार्टी
बहुजन बचाव पार्टी
अखिल भारतीय बहुजन मंच


Click for answer

B. बहुजन आझाद पार्टी

6. बायच्युंग भूतिया ने स्थापलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे ?

गोरखा लँड पार्टी
गोरखा -तृणमूल कॉंग्रेस
हमरो सिक्कीम पार्टी
पुर्वाचल एकत्रीकरण पार्टी


Click for answer

C. हमरो सिक्कीम पार्टी

7. एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) भारतीय एअरपोर्ट्स पहिल्यांदाच एका महिला फायर फायटरची नियुक्ती केली आहे. ह्या महिला फायर फायटर चे नाव काय आहे ?

तानिया सचदेव
राजेश्री बाहेती
तमन्ना कौर
तानिया सन्याल


Click for answer

D. तानिया सन्याल

ती मुळची कोलकाताची असून लवकरच ती सेवेत रूजू होईल.
तानियाने वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिला एएआयच्या पूर्व क्षेत्रातील विमानतळांसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. यामध्ये कोलकाता, पाटणा, भुवनेश्वर, रायपूर, गया आणि रांचीचा समावेश आहे. कोलकाता प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यापैकी कोणत्याही एका विमानतळावर तिची नियुक्ती केली जाईल

8. प्रसिद्ध स्वीडिश डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी ओमानची राजधानी मस्कतमध्ये निधन झाले. इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी प्रसिध्द असलेल्या एविचीचे मूळ नाव काय होते ?

टिम बर्जलिंग
एवीची टेलर
जॉन एवीची
वरीलपैकी एकही नाही


Click for answer

A. टिम बर्जलिंग

एविचीला दोन एमटीव्ही पुरस्कार, एक बिलबोर्ड म्युझिक अॅवॉर्ड मिळाला आहे. ‘वेक मी अप’, ‘द डेज’ आणि ‘यू मेक मी’ ही एविचीची गाणी बरीच गाजली.
एविचीचे ‘वेक मी अप’ हे गाणे 2013 साली ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले.

9. नाबी ताजीबा या 19 व्या शतकात जन्मलेल्या जगातील सर्वात वृद्ध महिलेचं वयाच्या 117 व्या वर्षी निधन झालं आहे. त्या कोणत्या देशाच्या होत्या ?

चीन
दक्षिण कोरिया
जपान
अमेरिका


Click for answer

C. जपान

10. या वर्षीचा शाहू मोडक पुरस्‍कार कोणत्या जेष्ठ अभिनेत्याला प्रदान करण्यात आला ?

दिलीप प्रभावळकर
अशोक सराफ
नाना पाटेकर
अतुल कुलकर्णी


Click for answer

A. दिलीप प्रभावळकर