राज्यात पिंपरी- चिंचवड, मीरा-भाईंदर आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्यात येणार आहेत
गृह राज्यमंत्री दीपक केसरकर
जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येणार आहे.
प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले
तिलोत्तमा या पौराणिक कथेतील अप्सरेचे चित्र येथील लिलावात 5.17 कोटी रुपयांना विकले गेले आहे. न्यूयॉर्क येथे मॉडर्न अँड कॉंटेम्पररी साउथ एशियन आर्ट या प्रदर्शनात हा लिलाव करण्यात आला.
मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात 45 दिवसांपासून लागू असलेली आणीबाणी उठवली.
24 मार्च 2018 ला जगभरात ‘अर्थ अवर’ साजरा केला जाणार आहे
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगभरात ‘अर्थ अवर’ ही चळवळ सुरु करण्यात आली असून त्या दरम्यान दीवे बंद करण्याचे आवाहन ही मोहिम चालवणारी संस्था WWF करत असते.
178 देश या मोहिमेत सामिल झाले आहेत.
चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्यतेचा अभ्यास इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून करण्यात येणार आहे.
चंद्राच्या कक्षेत (ऑर्बिट) 2020 पर्यंत अवकाश स्थानक बांधण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत.
याशिवाय पृथ्वीवरुन प्रक्षेपित करण्यात असलेले रेडिओ सिग्नल चंद्राच्या ज्या भागांमध्ये पोहोचू शकत नाहीत, अशा भागांविषयी चीनही संशोधन करणार आहे.
जगातील सर्वाधिक वेगवान समजल्या जाणाऱ्या आणि आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असलेल्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली.
राजस्थानातील पोखरण येथील तळावरुन 22 मार्च 2018 ला पहाटे ही चाचणी पार पडली.
कमी उंचीवर वेगाने उड्डाण घेणारे आणि रडारच्या टप्प्यातही ने येणारे क्षेपणास्त्र अशी ब्रह्मोसची ओळख आहे.
साडेसात अब्जांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या जगामधील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या चार अब्जांहून अधिक झाली आहे. म्हणजेच जगातील जवळपास साठ टक्के जनता "ऑनलाइन' असते. 2017 या एकाच वर्षात तीस ते पस्तीस लाख लोकांनी प्रथमच इंटरनेटचा वापर सुरू केल्याचे "वुई आर सोशल' आणि "हूटसूट' या संस्थांनी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
इंटरनेटवर व्यतित होणारा वेळ
9.38 तास : थायलंड
9.14 तास : ब्राझील
8.32 तास : दक्षिण आफ्रिका
7.25 तास : भारत
6.30 तास : चीन
6.30 तास : अमेरिका
5.51 तास : ब्रिटन
4.12 तास : जपान
वातावरणातील बदल आणि त्याच्यावर होणारा परिणाम याबाबत सातत्याने व्यापक संशोधन करणे आणि पर्यावरण सक्षमीकरण सजग अशी नवीन यंत्रणा निर्माण करुन वातावरणीय बदलासाठी अनुकूल धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची संयुक्त तदर्थ समिती गठित करण्यात आली असून यात पर्यावरणमंत्री, पर्यावरण राज्यमंत्री यांच्यासह विधानसभेचे अकरा सदस्य व विधानपरिषदेचे चार सदस्य असे एकूण पंधरा सदस्य आहेत.
इस्राईलमधून उड्डाण करणाऱ्या विमानांना सौदी अरेबियाच्या हवाई सीमेत प्रवेश करण्यासाठी असलेला प्रतिबंध हा अनेक दशके जुना आहे. मात्र भारताच्या या विमानासाठी यामधून सूट देण्यात आली.
तेल अवीववरुन निघालेले एअर इंडियाचे विमान सौदी अरेबियाच्या हवाई सीमेमधून भारतात नवी दिल्ली येथे पोहोचले.