चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -24 ते 26 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. राज्य सरकारच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2017-18 चा 'ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?
A. डॉ.किसन महाराज साखरे
B. बालकिर्तनकार पांडूरंग महाराज
C. श्री मारोती महाराज कुऱ्हेकर
D. ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते
Click for answer
A. डॉ.किसन महाराज साखरे
डॉ.किसन महाराज साखरे हे संत वाड्.मयावर अध्यापन करतात. गेली 57 वर्षापासून विविध मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासून ते संत वाड्.मयावर लेखन करीत आहेत.
संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे अध्यक्ष व त्या समितीव्दारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती केलेली आहे. आकाशवाणीवर त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे देखील कार्य केलेले आहे.
यापूर्वी श्री. रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
5 लाख रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.
2. पंतप्रधान मोदी कोणत्या देशाला आपल्या भेटी दरम्यान 200 गायी भेट म्हणून देणार आहेत ?
A. डेन्मार्क
B. केनिया
C. रवांडा
D. नेपाळ
Click for answer
C. रवांडा
'गिरिंका' उपक्रमाअंतर्गत देशातील पूर्वेकडील भागातून या गायी खरेदी करण्यात येणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला एक गाय भेट म्हणून देण्यात येईल. त्यानंतर गोवंश प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाने आपल्या आसपासच्या कुटुंबाला ते गोवंश द्यायचं आणि त्या कुटुंबाने त्याचा सांभाळ करायचा असा हा उपक्रम आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाला उदरभरणाचे एक साधन मिळेल.
3. एड्स या विषयावरील संयुक्त राष्ट्राची संयुक्त संस्था असलेल्या यूएनएड्स हिने 'माईल्स टू गो - क्लोजिंग गॅप्स , ब्रेकिंग बॅरियर्स, रायटिंग इन्जस्टिसेज' नावाचा नवीन अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार भारतात वर्ष 2010 ते 2017 या दरम्यान एचआयव्ही लागणीची संख्या ______________________ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आलेले आहे .
A. कमी
B. वाढ झाल्याचे
C. आधी कमी नंतर वाढ झाल्याचे
D. कोणताही बदल नसल्याचे
Click for answer
A. कमी
या अहवालातील माहितीनुसार, भारतात वर्ष 2010 मध्ये एचआयव्ही लागणीची संख्या 1,20,000 एवढी होती. ती वर्ष 2017 मध्ये 88,000 एवढी झाली.या काळात एड्समुळे होणारे मृत्यू 1,60,000 वरून 69,000 एवढे कमी झाले.तर एचआयव्ही लागण झालेल्यांची संख्या 23,00,000 वरून 21,00,000 एवढी कमी झाली.
व्यापक लोकसंख्येमध्ये सतत आणि केंद्रित प्रयत्न केल्यामुळे कम्बोडिया, भारत, म्यानमार आणि व्हिएतनाम या देशांमध्ये वर्ष 2010 ते 2017 या दरम्यान एचआयव्ही लागणीची संख्या कमी झाल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे
. त्याच वेळेस जागतिक पातळीवर एचआयव्ही लागण एवढ्या झपाट्याने कमी झालेले नाही.
पाकिस्तान आणि फिलिपाईन्स या देशांमध्येही ही लागण वाढत आहे, असे त्यात म्हटले आहे.
4. भारताचा धावपटू ______________याने झेक रिपब्लिकमधील स्पर्धेत 400 मीटरचे अंतर 45.24 सेकंदात पार करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसह त्याने नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला.
A. नीरज चोप्रा
B. मुहम्मद अनास
C. मनीष कुमार
D. पी. अश्विन
Click for answer
B. मुहम्मद अनास
5. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुढाकारातून घेण्यात येणारे बालकुमार साहित्य संमेलन यंदा कोठे होणार आहे ?
A. भिलार
B. डोंबिवली
C. यवतमाळ
D. अमरावती
Click for answer
A. भिलार
6. स्टार फुटबॉलपटू मेसूट ओझील याने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतल्यानंतर टीका करण्यात आल्यानंतर वर्णव्देषाचा आरोप कोणत्या देशाचा फुटबॉल संघ सोडला ?
A. पोर्तुगाल
B. इंग्लंड
C. जर्मनी
D. इटली
Click for answer
C. जर्मनी
जर्मनीचे फुटबॉल प्रमुख ऑलिव्हर बाइरहॉफ यांनी त्याच्या या भेटीवर ओझीलला जर्मनीबद्दल अभिमान नसल्याची टीका केली होती. जर्मनीच्या अंडर 19 आणि अंडर 21 संघाकडूनही ओझील खेळला असून जर्मनी सीनिअर संघाकडून खेळताना त्याने 92 सामन्यांत 23 गोल केले आहेत. जर्मनीकडून खेळताना त्याने अनेक सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला होता.
7. 25 जुलै 2018 पासून कोणत्या मराठी संगीतकाराचे जन्मशताब्दी वर्षसाजरे होत आहे ?
A. राम कदम
B. सुधीर फडके
C. श्रीनिवास खळे
D. केशवराव भोळे
Click for answer
B. सुधीर फडके
8. भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार कोण होते ?
A. इफ्तिखार अली खान पतौडी
B. कर्नल सी.के. नायडू
C. लाला अमरनाथ
D. विजय हजारे
Click for answer
B. कर्नल सी.के. नायडू
भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार होते. त्यांनी भारताचे सात सामन्याचे नेतृत्व कले आहे. यामध्ये सी.के. नायडूंनी 25 च्या सरासरीने 350 धावा केल्या आहेत. तसेच सी.के. नायडू 207 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
अलिकडेच त्यांच्या पुतळ्याचे आंध्र प्रदेशच्या मच्चलीपट्टनम येथे माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित कोणत्या लघुपटाची राष्ट्रपती भवन येथे नुकतीच स्क्रिनिंग झाली ?
A. एक प्रवास
B. चलो जीते है
C. गाथा एक संघर्ष की
D. नई मंजिल
Click for answer
B.चलो जीते है
10. भारता शेजारील कोणत्या देशात 25 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली ?
A. नेपाळ
B. श्रीलंका
C. बांगलादेश
D. पाकिस्तान
Click for answer
D. पाकिस्तान
Newer Post
Older Post
Home