चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -21 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. चांद्रयान - 2 मोहिमेचा एकूण किती खर्च नुकताच मंजूर करण्यात आला आहे?
A. 603 कोटी रुपये
B. 6000 कोटी रुपये
C. 10000 कोटी रुपये
D. 20000 कोटी रुपये
Click for answer
A. 603 कोटी रुपये
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो, चांद्रयान - 2 मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर बसवण्याचा विचार करत आहे. रोव्हरवरील यंत्रे चंद्राच्या पृष्ठभागावरील सोडिअम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम इत्यादी मूलद्रव्यांचा अभ्यास करणार आहे.
सुधारित निदेशांनुसार हेलियम - 3 च्या साठ्याचे खणन आणि शोध विचाराधीन नाही.
2. खालीलपैकी कोणाच्या 150व्या जयंतीनिमित्त कैद्यांना विशेष सवलती द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे ?
A. जयप्रकाश नारायण
B. महात्मा गांधी
C. श्यामाप्रसाद मुखर्जी
D. वि.दा.सावरकर
Click for answer
B. महात्मा गांधी
महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करण्याचा एक भाग म्हणून पुढील गटातील कैद्यांचा विशेष सवतीसाठी विचार केला जाईल आणि तीन टप्प्यांमध्ये त्यांची सुटका केली जाईल.
पहिल्या टप्प्यात 2 ऑक्टोबर 2018 रोजी (महात्मा गांधी जयंती) कैद्यांची सुटका केली जाईल.
दुसऱ्या टप्प्यात 10 एप्रिल 2019 रोजी (चंपारण सत्याग्रहाचा वर्धापन दिन) तर तिसऱ्या टप्प्यात 2 ऑक्टोबर 2019 रोजी (महात्मा गांधी जयंती) कैद्यांची सुटका केली जाईल.
55 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या महिला ज्यांनी त्यांच्या एकूण शिक्षेच्या 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.
55 किंवा त्याहून अधिक वय असलेले
तृतीयपंथीय ज्यांनी एकूण शिक्षेपैकी 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.
60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे पुरूष कैदी, ज्यांनी एकूण शिक्षेपैकी 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.
70 टक्के अपंगत्व असलेले अपंग कैदी ज्यांनी एकूण शिक्षेपैकी 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.
दुर्धर आजार असलेले कैदी.
दोषी कैदी ज्यांनी एकूण शिक्षेच्या दोन-तृतीयांश (66 टक्के) शिक्षा भोगली आहे.
ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे किंवा त्याचे रुपांतर आजन्म तुरुंगवासात झाले आहे अशा कैद्यांना या सवलती मिळणार नाहीत.
तसेच हुंडाबळी, बलात्कार, मानवी तस्करी आणि पोटा, टाडा, पॉक्सो कायद्याअंतर्गत दोषी यांना ही सवलत मिळणार नाही.
3. 2022 पर्यंत अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता किती करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे ?
A. 100 गिगावॅट
B. 175 गिगावॅट
C. 225 गिगावॅट
D. 500 गिगावॅट
Click for answer
B. 175 गिगावॅट
सरकारने 2022 पर्यंत देशभर 100 गिगावॅट सौर ऊर्जानिर्मिती क्षमता उभी करण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे.
2022 पर्यंत 175 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे, यात 100 गिगावॅट सौर ऊर्जा, 60 गिगावॅट पवनऊर्जा, 10 गिगावॅट जैव-ऊर्जा आणि 5 गिगावॅट लहान हायड्रो-पावरनिर्मित जलऊर्जा यांचा समावेश आहे.
केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने 2014 मध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती केली आहे की, सर्व शासकीय खात्यांनी आपल्या इमारतींच्या छतावर रुफ टॉप सिस्टीम्स बसवण्याची सक्ती करावी, जेणेकरुन सौर ऊर्जा निर्माण होईल. तसेच मंत्रालयाने 2016 मध्ये उपनियमांमध्ये बदल करुन आदर्श इमारत बांधणी नियमावली जाहीर केली आहे.
हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी विविध इमारतींच्या बांधकामासाठी सौर ऊर्जा पॅनल बंधनकारक केले आहे.
4. देशात किती स्वदेशी अणुऊर्जा रिॲक्टर बसवण्यासाठी सरकारने शासकीय आणि वित्तीय मंजुरी जून 2017 मध्ये दिली आहे ?
A. 2
B. 5
C. 10
D. 20
Click for answer
C. 10
या रिॲक्टरची प्रत्येकी क्षमता 700 मेगावॅट आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवण्यात येणारे हे रिॲक्टरर्स भारतीय अणुऊर्जा निगम लिमिटेड यांच्या मार्फत बसवले जातील.
मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा या राज्यांमध्ये प्रत्येकी 700 मेगावॅटचे दोन तर राजस्थानमध्ये प्रत्येकी 700 मेगावॅटचे 4 रिॲक्टर असणार आहेत.
5. न विकले गेलेले तब्बल 256 कोटींचे कपडे, अॅक्सेसरीज् आणि परफ्युम्स जाळून टाकल्याने चर्चेत आलेला जगप्रसिद्ध ब्रिटीश लक्झरी ब्रँड कोणता ?
A. नाईके
B. रोलेक्स
C. गुक्की
D. बर्बरी
Click for answer
D. बर्बरी
काळ्या बाजारात बर्बरी ब्रँडच्या न विकल्या गेलेल्या मालाला मोठ्या प्रमाणात मागणी असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही मागणी 50% नीं वाढली आहे.
चुकीच्या व्यक्तींच्या हाती हा माल पडू नये किंवा याचा गैरवापर करून कोणीही नफा कमवू नये यासाठी बर्बरीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. असे करणारी बर्बरी ही पहिलीच कंपनी नाही.
6. लोकसभेत अविश्वास ठरावादरम्यान राफेल विमानांच्या करारावर गंभीर आरोप झाले. भारताने ही विमाने कोणत्या देशाकडून घेण्यासाठी करार केला आहे ?
A. फ्रान्स
B. रशिया
C. अमेरिका
D. जपान
Click for answer
A. फ्रान्स
7. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
A. मंजूळा चेल्लूर
B. विजया कापसे-तहिलरामानी
C. नरेश पाटील
D. अनिरुद्ध बोस
Click for answer
B. विजया कापसे-तहिलरामानी
मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरामानी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्याकडे त्यांचा पदभार देण्यात येणार आहे.
तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजूळा चेल्लूर या नोव्हेबर 2017मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्ती म्हणून पदभार सोपविण्यात आला होता.
8. नरेंद्र मोदी सरकार विरूध्दचा अविश्वास प्रस्ताव किती मतांनी फेटाळला गेला ?
A. 255 विरुद्ध 196
B. 325 विरुद्ध 126
C. 355 विरुद्ध 96
D. 405 विरुद्ध 46
Click for answer
B. 325 विरुद्ध 126
एकूण 451 खासदारांनी आपल्या मतदानाचा हक्का बजावला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात 325 आणि अविश्वास प्रस्तावाच्या बाजून 126 मते पडली. मतदानावेळी एकूण 84 खासदार अनुपस्थित राहिले. टीडीपीने हा प्रस्ताव संसदेत मांडला होता.
9. 14,400 वर्षांपूर्वीच्या पावाचे तुकडे कोणत्या देशात सापडले आहेत ?
A. अफगाणिस्तान
B. जॉर्डन
C. सुदान
D. इजिप्त
Click for answer
B. जॉर्डन
जॉर्डनच्या ईशान्येस असणाऱ्या वाळवंटातील शुबाय्का या जागेवर 14,400 वर्षांपूर्वीचे अन्नाचे जळालेले नमुने सापडले आहेत. शेतीचा शोध किंवा शेतीची सुरुवात होण्यापूर्वी 4000 वर्षे आधी मानवाने पाव तयार केला होता असा कयास शास्त्रज्ञांनी लावला आहे.
"सायन्स' या नियतकालिकात याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
10. अमेरिकेतील ओकला (Ookla) या कंपनीच्या इंटरनेट स्पीडच्या केलेल्या अभ्यासानुसार भारताचा इंटरनेटच्या स्पीड बाबत जगात कितवा क्रमांक लागतो ?
A. 19
B. 39
C. 79
D. 109
Click for answer
D. 109
भारतातील याच 4जी नेटवर्कचा स्पीड शेजारील श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांच्या तुलनेत कमी आहे.
Newer Post
Older Post
Home