चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -7 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांच्या 12 जून रोजी होणाऱ्या नियोजित भेटीचे ठिकाण कोणते आहे ?

A. वॉशिंग्टन डी.सी.
B. प्योंगयांग
C. सेऊल
D. सेंटोसा बेट


Click for answer

D. सेंटोसा बेट

सिंगापूरजवळील सेंटोसा बेटावर कॅपेला हॉटेलमध्ये हे दोन नेते भेटणार आहेत. व्हाईट हाऊसच्या माध्यमसचिव सारा हकाबी सँडर्स यांनी ट्वीटरवरून ही माहिती जाहीर केली.

ही बैठक केवळ एकच दिवस चालणार आहे.

2. फोर्ब्स या मॅगझिनने अलीकडे प्रसिध्द केलेल्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण ठरला आहे ?

A. महेंद्रसिंग धोणी
B. विराट कोहली
C. ख्रिस गेल
D. स्टीव्ह स्मिथ


Click for answer

B.विराट कोहली

या यादीमध्ये कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आणि भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटने 161 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये सर्वात जास्त हिस्सा हा जाहीरातींमधून येणाऱ्या मिळकतीचा आहे.

कारण बीसीसीआय आणि सामना जिंकल्यानंतर मिळणाऱ्या राशीमधून कोहलीने 27 कोटी रुपये कमावले आहेत, तर जाहीरातींमधून कोहलीने 134 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

फोर्ब्सने जाहिर केलेल्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत कोहली 83व्या स्थानावर आहे.

या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉयड मेवेदर आहे, त्याने 1913.3 कोटी रुपये कमावले आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे, तर पोर्तुगालचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो तिसऱ्या स्थानावर आहे.

3. भारतातला सर्वात लहान लेखक कोण ठरला आहे ?

A. अंजली जोसेफ
B. अयान गोगोई गोहेन
C. ओमर अहमद
D. रणजित लाल


Click for answer

B. अयान गोगोई गोहेन

आसामच्या लखीमपूर जिह्यातील अयान गोगोई गोहेन हा चिमुरडा हिंदुस्थानचा सर्वात लहान लेखक ठरला आहे.

आसाममधील दक्षिण लखीमपूर येथील सेंट मेरीज स्कूलमध्ये अयान जातो.

त्याचे 'हनीकॉम्ब' हे पुस्तक जानेवारी 2018 मध्ये प्रकाशित झाले. पुस्तकाची किंमत 250 रुपये असून त्यामध्ये 30 इल्युस्ट्रेटेड कथा आहेत. एवढय़ा लहान वयात लेखक आणि चित्रकार ठरलेल्या अयानची कीर्ती अल्पावधीतच जगभरात पोचली आहे. त्याला हिंदुस्थानातील सर्वात लहान वयाचा लेखक असे बिरूद मिळाले आहे.

त्याने एक वर्षाचा असताना चित्र काढायला आणि तिसऱया वर्षी कथा लिहायला सुरुवात केली.

अवघ्या चार वर्षांत तो स्पष्टपणे आसामी आणि इंग्रजी भाषेत स्वतŠला व्यक्त करू लागला. एवढेच नव्हे तर 'हनीकॉम्ब' पुस्तकाचे मुखपपृष्ठही त्यानेच डिझाईन केलेले आहे.

4. अलीकडेच मलेशियाच्या अॅटर्नी जनरलपदी नियुक्ती करण्यात आलेली भारतीय वंशाची व्यक्ती कोण ?

A. टॉमी थॉमस
B. मुकुल रोहतगी
C. प्रीता बंसल
D. निपुण मेहता


Click for answer

A. टॉमी थॉमस

तब्बल 55 वर्षांनंतर मलेशिया देशात अल्पसंख्याक व्यक्तीला हे पद देण्यात आलेले आहे. गेल्या 42 वर्षांपासून टॉमी थॉमस हे मलेशियात वकील आहेत. त्यांचा जन्म कौलालंपूर शहरात झाला.

त्यांनी थॉमस व्हिक्टोरिया इन्स्टिटय़ुशन, युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केले आहे.

5. 2 ऑक्टोबर 2019 रोजी म. गांधी यांची कितवी जयंती वर्ष साजरे केलं जाईल ?

A. 100 वी जयंती
B. 125 वी जयंती
C. 150 वी जयंती
D. 200 वी जयंती


Click for answer

C. 150 वी जयंती

त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं 21-22 फेब्रुवारी 2017 पासून 'गांधी 150 जयंती अभियान' सुरू केलं आहे. (22 फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.)

6. 14 जूनपासून मुंबईतल्या मुलुंडमध्ये भरणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे आहे ?

A. गंगाराम गवाणकर
B. जयंत सावरकर
C. कीर्ती शिलेदार
D. जयमाला शिलेदार


Click for answer

C. कीर्ती शिलेदार

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार ह्या जयमाला आणि जयराम शिलेदार यांच्या कन्या असणार्‍या कीर्ती यांनी आपल्या बहारदार आवाज आणि अभिनयाच्या बळावर संगीत रंगभूमी गाजवली आहे. 'लाजविले वैर्‍यांना', 'हरीची ऐकताच मुरली', 'प्रभू आजी गमला', 'खरा तो प्रेमा ना धरी', 'मम सुखाची ठेव' यांसारख्या कीर्ती यांनी गायलेल्या बर्‍याच संगीतरचना गाजल्या आहेत.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.खासदार किरीट सोमय्या यांना नाट्य संमेलनाचं उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.

7. नरेंद्र मोदी यांच्या येवू घातलेल्या बायोपिकमध्ये पंतप्रधान मोदी यांची भूमिका कोण साकारणार आहे ?

A. अमिताभ बच्चन
B. परेश रावल
C. ऋषी कपूर
D. जॉन अब्राहम


Click for answer

B. परेश रावल

8. पटना पायरेट्स, बंगाल वॉरीअर, बंगलोर बुल्स, दबंग दिल्ली हे कोणत्या स्पर्धेतील संघ आहेत ?

A. प्रिमियर बॅडमिंटन लीग
B. इंडियन प्रीमियर लीग
C. प्रो कब्बडी लीग
D. नॅशनल फुटबॉल लीग


Click for answer

C. प्रो कब्बडी लीग

प्रो कब्बडी लीगचा सहावा सिझन सुरु होत असून त्यासाठीचे खेळाडूंचे लिलाव अलीकडेच संपले. या सामन्याना गतवर्षी स्पोर्ट्स इवेन्ट मध्ये आयपीएल नंतर 2 नंबरची व्ह्यूअरशिप मिळाली होती.

प्रो कब्बडी लीग 6 मध्ये पटना पायरेट्स, बंगाल वॉरीअर, बंगलोर बुल्स, दबंग दिल्ली, जयपूर पिंक पलटण, पुणेरी पलटण, तेलगु टायटन, यु मुंब, गुजराथ फोर्च्युन जायंट्स, युपी योद्धा, तमिळ थलावियास, हरियाना स्टीलर्स असे संघ आहेत.

यात 6 खेळाडूना 1 कोटी पेक्षा अधिक किंमत मिळाली असून हरियाना स्टीलर्स च्या मोनू गोयल याला सर्वाधिक 1.51 कोटी रूपये इतकी किंमत मिळाली आहे.

हे सामने 19 आक्टोबर 2018 ते 11 जानेवारी 2019 या काळात होणार आहेत. यात 12 संघ सामील होणार असून 13 आठवड्यात 138 सामने खेळले जाणार आहेत.

9. पंतप्रधान मोदी यांनी ग्रामीण महिलांपर्यंत एलपीजी गॅस पोहचविण्यासाठी सुरू केलेल्या 'उज्ज्वला योजने' मागे प्रेरणा ‘ईदगाह’ ह्या कथेतील हमीद ह्या मुलापासून मिळाली असे सांगितले आहे. 'ईदगाह' ही प्रसिध्द कथा खालीलपैकी कोणी लिहिली आहे ?

A. रवींद्रनाथ टागोर
B. मुन्शी प्रेमचंद
C. भीष्म सहानी
D. महादेवी वर्मा


Click for answer

B. मुन्शी प्रेमचंद

मोदींनी सांगितलं की, “ईदगाहमध्ये हमीद नावाचा एक मुलगा असतो. तो जत्रेत मिळाई खरेदी करण्याऐवजी आपल्या आजीसाठी चिमटा खरेदी करतो. स्वयंपाक करताना आजीला चटका लागू नये यासाठी त्याने तो चिमटा खरेदी केलेला असतो. मुन्शी प्रेमचंद यांची ही कथा आजही मला प्रेरित करते. माझं म्हणणं आहे की, जर हमीद असं काही करु शकतो तर मग देशाचा प्रधानमंत्री का करु शकत नाही ?”

10. ललित कला अकादमीचे नियमित अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणाची नियुक्ती केली आहे ?

A. उत्तम पाचरणे
B. चंद्रशेखर काम्बरा
C. रतन थीयम
D. वामन केंद्रे


Click for answer

A. उत्तम पाचरणे

ललित कला अकादमीचे नियमित अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी प्रसिद्ध शिल्पकार उत्तम पाचरणे यांची नियुक्ती केली आहे.सध्या ते गोवा कला अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य, पु.ल.देशपांडे राज्य ललित कला अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि जन सेवा सहकारी बँक, बोरीवलीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

पाचरणे यांना 1985 मध्ये राष्ट्रीय ललित कला पुरस्कार, 1985 मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार, 1986 मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय पुरस्कार आणि 2017 मध्ये प्रफुल्ला डहाणुकर फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पाचरणे कार्यभार स्वीकारल्यापासून तीन वर्ष अकादमीच्या अध्यक्षपदी राहतील.