चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -27 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा कधी केला होता ?
A. 4 फेब्रुवारी 1918
B. 26 जुलै 1917
C. 27 जून 1917
D. 1 ऑक्टोबर 1919
Click for answer
A. 4 फेब्रुवारी 1918
काल 26 जून रोजी या लोककल्याणकारी राज्याची जयंती होती. 26 जून हा दिवस महाराष्ट्रात 'सामाजिक न्याय दिन ' म्हणून साजरा केला जातो. (जागतिक सामाजिक न्याय दिवस - 20 फेब्रुवारी ).
1917 मध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा मांडला होता. अनेक सनातनी मंडळींनी या कायद्याला जोरदार विरोध दर्शविला.
शाहू महाराजांनी मात्र या कायद्यास जाहीर पाठिंबा दर्शविला. आंतरजातीय विवाह घडवून आणले, तसा कायदाही संस्थानात 4 फेब्रुवारी 1918 रोजी केला. या कायद्याला या वर्षी 100 वर्षे पूर्ण झाली.
ह्याशिवाय, शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात 26 जुलै 1917रोजी विधवा पुनर्विवाह कायदा केला. हा विवाह विधीपूर्वक करावा, अशीही योजना केली. या कायद्याला पुढील महिन्यात 101 वर्षे पूर्ण होत आहेत.
2. लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात कोणत्या भारतीय योगगुरूंचा पुतळा लवकरच बसविला जाणार आहे ?
A. बाबा रामदेव
B. आचार्य रजनीश
C. जग्गी वासुदेव
D. श्री श्री रविशंकर
Click for answer
A. बाबा रामदेव
बाबा रामदेव लंडनला जात असून तेथे त्यांच्या शरीराची, चेहऱ्याची मापे घेण्याचे काम केले जाणार आहे. बाबांचा पुतळा त्यानंतर तयार करून सहा महिन्यात संग्रहालयात बसविला जाणार आहे.
अलीकडील काळात अन्य काही क्रिकेट खेळाडू आणि अभिनेत्री यांचे ही मेणाचे पुतळे मादाम तुसाद संग्रहालयातठेवले गेले , परंतु ते दिल्ली किंवा अन्य ठिकाणच्या मादाम तुसाद संग्रहालयात ठेवले गेले. फारच मोजक्या भारतीय व्यक्तिमत्वाना लंडनच्या मादाम तुसाद संग्रहालयात स्थान मिळाले आहे.
3. योगगुरू आणि पतंजली योगपीठाचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांचा लंडनच्या जगप्रसिद्ध मॅडम तुसाद संग्रहालयात कोणत्या आसन मुदेत मेणाचा पुतळा तयार करण्यात येत आहे ?
A. धनुरासन
B. वृक्षासन
C. शवासन
D. पद्मासन
Click for answer
B. वृक्षासन
या संग्रहालयात यापूर्वी सलमान खान, राज कपूर, रणबीर कपूर. मेरा कोम, मिल्खा सिंग ,कपिल देव, सचिन तेंडुलकर,महात्मा गांधी, भगत सिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, एपीजे अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या भारतीयांचे पुतळे तयार करण्यात आलेले आहेत.
4. 21 व्या शतकातले सर्वात अधिक काळ दिसणारे खग्रास चंद्रग्रहण येत्या 27 जुलैला होणार आहे, ह्या चंद्रग्रहणाला संशोधकांनी कोणते नाव दिले आहे ?
A. रेड मून
B. ब्लड मून
C. बिग मून
D. लॉस्ट मून
Click for answer
B. ब्लड मून
31 जानेवारी 2018 ला सुपर ब्लड मून चंद्रग्रहण झाले होते त्यापेक्षा हे ग्रहण 40 मिनिटे अधिक दिसणार आहे. हे ग्रहण तब्बल 1 तास 43 मिनिटे आहे. ते भारताबरोबरच युरोप, ऑस्ट्रेलिया, द.अमेरिका, आफ्रिका आणि प.आशियात दिसणार आहे.
सामान्यपणे चंद्र्ग्रहणात पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि तिची सावली चंद्रावर पडते परंतु, ब्लड मून मध्ये पृथ्वी चंद्र सूर्याच्या मध्ये आल्यावरही वातावरणातून काही प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचतो चंद्र लालसर दिसतो. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या मागे लपतो तेव्हा तो गडद लालसर होतो.
5. झी समुहाची मालकी असलेल्या एस्सल समुहाने अमेरिकेच्या कोणत्या शहरात 'यो-वन'नावाचे योग केंद्र उभारले आहे ?
A. वॉशिंग्टन दि.सी.
B. कॅलिफोर्निया
C. न्यूयॉर्क
D. शिकागो
Click for answer
C.न्यूयॉर्क
कैटसकिल्स पर्वत रांगात हे भव्य केंद्र असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमाने केंद्राचे उद्घाटन केले .
6. कोणत्या राज्याने सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा एक हजार रूपये पेन्शन देण्याची योजना जाहीर केली आहे ?
A. अरुणाचल प्रदेश
B. हिमाचल प्रदेश
C. कर्नाटक
D. सिक्कीम
Click for answer
D. सिक्कीम
अशी योजना जाहीर करणारे सिक्कीम पहिलेच राज्य ठरले आहे.
7. थॉमसन रॉयटर्स फांउडेशन या संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार कोणता देश महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक देश आहे ?
A. भारत
B. सोमालिया
C. अफगानिस्तान
D. सीरीया
Click for answer
A. भारत
या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा बलात्कार, महिलांवर अत्याचार, महिलांचे शोषण यामध्ये अग्रस्थानी आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी युद्धग्रस्त सीरीया आणि अफगानिस्तानपेक्षाही असुरक्षित देश आहे.
2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार अफगानिस्तान, कॉन्गो, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया हे देश सर्वांत असुरक्षित मानले गेले होते. परंतु, यावर्षी भारतातील महिलांचे वाढलेले प्रश्न पाहून यावेळी भारताला सर्वांत असुरक्षित देश असल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
8. सेशल्सच्या या देशाला सागरी सुरक्षेची क्षमता वाढवण्यासाठी भारताकडून किती डॉलर्सचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे ?
A. 10 कोटी डॉलर्स
B. 20 कोटी डॉलर्स
C. 50 कोटी डॉलर्स
D. 100 कोटी डॉलर्स
Click for answer
A. 10 कोटी डॉलर्स
सेशल्स देशाच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉर यांची द्विपक्षीय बैठक सोमवारी पार पडली. त्यानंतर 6 विविध करारांवर दोघांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांपूर्वी सेशल्सकडून लष्करी तळ निर्माण करण्याबाबतचा भारताबरोबरचा करार तोडल्याने हा भारतासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात होते. तथापि आता , भारत आणि सेशल्सदरम्यान नाविक तळ निर्माण करण्याबाबत सोमवारी करार करण्यात आला.
याशिवाय, भारताने हिंदी महासागरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या जागी असणाऱ्या सेशेल्सला दुसरे डॉर्नियर विमान भेट म्हणून दिले आहे. सागरी संकटांपासून वाचण्यासाठी या विमानाचा आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी सेशेल्सला या विमानाची मदत होणार आहे. यापूर्वी मार्च 2015मध्ये एक डॉर्नियर विमान भेट दिले होते
9. रियाल हे कोत्या देशाचे चलन आहे ?
A. जपान
B. इराण
C. इंडोनेशिया
D. दक्षिण सुदान
Click for answer
B. इराण
इराणचं चलन रियालच्या मूल्यात खूप घसरण झाली आहे. एका डॉलरची किंमत 90 हजार रियाल इतकी खाली उतरली आहे.
अमेरिकेने अलिकडेच इराण बरोबरच्या आण्विक करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी 1 डॉलरची किंमत 65 हजार रियाल इतकी होती. इराणची राजधानी तेहरानमधील ग्रँड बझारमधल्या व्यापाऱ्यांनी वाढत्या किंमती आणि इराणचं चलन असलेल्या रियालच्या ढासळणाऱ्या मूल्याविरोधात निदर्शनं केली.
2012नंतर तेहरानमध्ये झालेलं हे सर्वांत मोठं आंदोलन आहे. 2012ला आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती.
इराणवरील निर्बंध 2016मध्ये उठवण्यात आले होते.
10. आयुष मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देण्यात आलेले दोनही पंतप्रधान योग पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले. हे पुरस्कार ____________ आणि मुंबईतील योग इन्स्टिट्यूटला योगविद्येच्या प्रसार व विकासासात भरीव कामगिरीबाबत मिळाले.
A. विश्वास मंडलिक
B. गीतांजली बोथे
C. एस.पी.सिंग
D. एच.के.गुरुदत्त
Click for answer
A. विश्वास मंडलिक
मानचिन्ह, मानपत्र व प्रत्येकी 25 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर योग विद्येचा प्रचार आणि प्रसाराच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आयुष मंत्रालयातर्फे पंतप्रधान योग पुरस्कार देण्यात.
प्राचीन ग्रंथांचे अध्ययन करुन विश्वास मंडलिक यांनी पतंजली व हटयोगाचे उत्तम ज्ञान मिळवले. 1978 साली योग धाम विद्या या संस्थेची पहिली शाखा त्यांनी सुरु केली. आता या संस्थेच्या देशात 160 शाखा आहेत. त्यानंतर योगविद्या शिकविण्यासाठी मंडलिक यांनी 1983 साली योग विद्या गुरुकुल नावाची संस्था स्थापन केली. योगविद्येवर त्यांनी 42 पुस्तके लिहिली असून, या विषयाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या 300 सीडी त्यांनी तयार केल्या आहेत.
तर मुंबईतील योग इन्स्टिट्युट ही 1918 मध्ये योगेंद्रजी यांनी स्थापन केली. यंदा या संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाली. या संस्थेने आजवर 50 हजारपेक्षा अधिक योगविद्या शिक्षक तयार केले आहेत तसेच योगविद्येबद्दल 500 हून अधिक पुस्तके योग इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केली आहेत.
Newer Post
Older Post
Home