चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -26 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. आयफा 2018 च्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून गौरविण्यात आले ?
A. इरफान खान आणि श्रीदेवी
B. शाहरूख खान आणि श्रीदेवी
C. राजकुमार राव आणि विद्या बालन
D. राजकुमार राव आणि आलिया भट्ट
Click for answer
A. इरफान खान आणि श्रीदेवी
आयफा 2018 च्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अभिनेता इरफान खानला "हिंदी मिडीयम'साठी आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला "मॉम'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून गौरवण्यात आले आहे.
बॅंकॉकमधील सियाम मिरानित थिएटरमध्ये झालेल्या समारंभामध्ये "तुम्हारी सुलू'ला सर्वोत्कृष्ठ सिनेमा म्हणून गौरवण्यात आले आहे. तर "हिंदी मिडीयम'च्या डायरेक्शनसाठी साकेत चौधरीला सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले.
2. रेसेप तय्यिप इर्डोगन यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूकीत पुन्हा एकदा विजय मिळविला आहे ?
A. नॉर्वे
B. स्पेन
C. रिपब्लिक ऑफ तर्की(तुर्कस्तान)
D. कझाकस्तान
Click for answer
C. रिपब्लिक ऑफ तर्की(तुर्कस्तान)
या विजयामुळे इर्डोगन यांना अध्यक्षपदासाठी आणखीन पाच वर्षांची मुदत मिळणार आहे. त्यांच्या पक्षाला निवडणूकीमध्ये 52.5 टक्के मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टीच्या मुहर्रेम इन्स यांना 30.7 टक्के मते मिळाली.
एर्डोगन गेली 16 वर्षं तुर्कस्तानमध्ये सत्तेवर आहेत. 2002मध्ये त्यांच्या AK या पक्षाला संसदेत भक्कम बहुमत मिळालं. तेव्हापासून ते सलग 11 वर्षं देशाचे पंतप्रधान होते. ऑगस्ट 2014 मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले. थेट लोकांमधून निवडून आलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष.
एप्रिल 2017मध्ये त्यांनी आपल्या अस्वस्थ प्रजेला ताब्यात ठेवण्यासाठी सार्वमत घेऊन देशाचे सर्वाधिकार स्वत:कडे घेतले. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत 2019 मध्ये संपणार होती, पण त्याआधीच त्यांनी निवडणुका जाहीर केल्या होत्या.
3. 2018 च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने देशात कितवा क्रमांक मिळविला ?
A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा
Click for answer
B. दुसरा
स्वच्छ राज्यांमध्ये झारखंड प्रथम, महाराष्ट्र द्वितीय आणि छत्तीसगड तृतीय क्रमांकावर आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली होती. या अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
4 जानेवारी 2018 ते 10 मार्च 2018 या कालावधीत देशातील 4203 शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील 43 अमृत शहरांनी तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 217 शहरांनी सहभाग घेतला होता.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत राज्यातील 28 शहरांनी पहिल्या 100 क्रमांकामध्ये स्थान मिळविले असून एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील 58 शहरांनी स्थान मिळविले आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा यंदा राज्यातील सर्वात जास्त शहरांनी क्रमांक पटकविला आहे.
4. देशभरातील राज्यांमध्ये 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' अंतर्गत दूध उत्पादनात सर्वाधिक प्रगती करणारे राज्य कोणते ठरले ?
A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. हरियाणा
D. मध्यप्रदेश
Click for answer
B. महाराष्ट्र
इंडिया टूडेने केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्याने केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' अंतर्गत महाराष्ट्राने सर्वाधिक चांगले कार्य केल्याचे निदर्शनात आले. 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' अंतर्गत महाराष्ट्राने मागील तीन वर्षात सरासरी दूध उत्पादनात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
वर्ष 2013-14 मध्ये राज्यात90.8 लाख मेट्रिक टन दूध उत्पादन व्हायचे तर यात वाढ होऊन वर्ष 2016-17 मध्ये 104 लाख मेट्रिक टन इतके झाले आहे.
केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग
5. कोणत्या देशाने काही दिवसांपूर्वीच आपल्या असम्शन बेटांवर होऊ घातलेल्या भारताच्या नाविक तळाबाबतचा करार रद्द करण्याची घोषणा केली होती , तथापि आता या कराराबाबतच्या शंका दूर झाल्यानंतर त्या राष्ट्राने भूमिकेत बदल केल्याने भारताचा येथे नाविक तळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ?
A. मालदीव
B. सेशल्स
C. इंडोनेशिया
D. मॉरीशस
Click for answer
B. सेशल्स
हिंदी महासागरात या नाविक तळामुळे भारताचे बळ वाढणार आहे.
सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉरे
6. आर. प्रज्ञानंदा हा भारतातला सर्वात कमी वयाचा बुद्धिबळातला ग्रँडमास्टर बनला आहे. हा पराक्रम करणारा तो जगातला कितवा कमी वयाचा खेळाडू ठरला आहे ?
A. सर्वात लहान
B. दुसरा सर्वात लहान
C. सर्वात लहान दहावा
D. सर्वात लहान तेरावा
Click for answer
B. दुसरा
सर्वात लहान इटलीतल्या ऑस्टिसी शहरात ग्रेडाईन ओपन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या फायनल पूर्वीच प्रज्ञानंदा आवश्यक ते एलो गुण मिळवले आणि ग्रँडमास्टर किताब आपल्या नावावर केला.
जगभरात हा मान पटकावण्याची त्याची संधी फक्त तीन महिन्यांनी हुकली. 12 वर्षं, 10 महिने आणि 12 दिवसांचा असताना त्याने हा किताब जिंकला.
सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर युक्रेनचा सर्जेई कारजकिन झाला होता 2002 साली 12 वर्षं आणि 7 महिन्यांचा असताना ग्रँडमास्टर झाला होता.
7. अमेरिकेचे संरक्षण मंत्री (United States Secretary of Defense) कोण आहेत ?
A. ॲश्टन कार्टर
B. लिऑन पेनेटा
C. रॉबर्ट गेट्स
D. जेम्स मॅटीस
Click for answer
D. जेम्स मॅटीस
दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या आक्षेपार्ह हालचाली आणि तैवानला शस्त्रे विकण्याचा चीनचा निर्णय यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस हे याच आठवड्यात चीनच्या भेटीवर जात आहेत.
मॅटीस यांची संरक्षण मंत्री म्हणून ही पहिली चीन भेट आहे. मॅटीस हे चीन बरोबरच दक्षिण कोरिया आणि जपानच्याही दौऱ्यावर जाणार आहेत.
8. केंद्र सरकारच्या पुढाकाराने तयार झालेल्या राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधीला (एनआयआयएफ) 10 कोटी डॉलर्सचे (650 कोटी रुपये) अर्थसाहाय्य कोण देणार आहे ?
A. जागतिक बँक
B. आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी)
C. बँक ऑफ जपान
D. युरोपियन युनियन बँक
Click for answer
B. आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी)
9. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 485 शहरांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात शेवटच्या दहा शहरांत सर्वाधिक शहरे कोणत्या राज्याची आहेत ?
A. बिहार
B. ओडिशा
C. पश्चिम बंगाल
D. मेघालय
Click for answer
C. पश्चिम बंगाल
अस्वच्छ 10 शहरांमध्ये पश्चिम बंगालमधील 8 शहरे आहेत. बाकी दोन शहरे बिहारमधील आहेत. या यादीतील शेवटून दहा शहरे पुढीलप्रमाणे भद्रेश्वर, बांकुरा, बैरकपूर, सिमरे बख्तियारपूर (बिहार), चंपदनी, बन्सबेरिया, चांदबाली(बिहार), खर्दाह, बैधवती, पानीहाटी.
तर या यादीत सर्वात स्वच्छ शहरांत अनुक्रमे इंदूर, भोपाळ, चंदीगड, नवी दिल्ली नगर निगम, विजयवाडा, तिरुपती, ग्रेटर विशाखापट्टणम, मैसूर, नवी मुंबई आणि पुणे यांचे क्रमांक लागतात.
10. स्मशानातील गैरसमज आणि अंधश्रद्धा, त्यातच स्मशानाच्या नूतनीकरणाचं काम करण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने कोणत्या राज्यातील आमदारांनी चक्क एक रात्र स्मशानात घालवल्याने ते चर्चेत होते ?
A. आंध्रप्रदेश
B. तामिळनाडू
C. कर्नाटक
D. ओडिशा
Click for answer
A. आंध्रप्रदेश
स्मशानातील गैरसमज आणि अंधश्रद्धा, त्यातच स्मशानाच्या नूतनीकरणाचं काम करण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे आमदार निम्माला रामा नायडू यांनी चक्क एक रात्र स्मशानात घालवली. कामगारांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी नायडू यांनी अंथरुण-पांघरुण घेऊन थेट स्मशानाची वाट धरली.
Newer Post
Older Post
Home