2018 मधील परीक्षांकरिता तयार केलेले-
2017 आणि 2018 मधील चालू घडामोडींवर आधारीत विशेष प्रश्नसंच.
1.कोणत्या संघाला हरवत भारत चौथ्यांदा क्रिकेटच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेचा विजेता ठरला ?
उत्तर: ऑस्ट्रेलिया
2. 2018 मधील क्रिकेटच्या 19 वर्षांखालील भारतीय विश्वविजेत्या विश्वकरंडक संघाचा कर्णधार कोण होता ?
उत्तर: पृथ्वी शॉ
3. 2018 मधील क्रिकेटच्या 19 वर्षांखालील भारतीय विश्वविजेत्या विश्वकरंडक संघाचा प्रशिक्षक कोण होता ?
उत्तर: राहुल द्रविड
4. 2018 च्या प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते ?
उत्तर: आसियान संघटनेतील दहाही दिशांचे प्रमुख उपस्थित राहिले होते.-इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया, म्यानमार, फिलिपाईन्स, लाओस, ब्रुनेई
5. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची विरुद्ध चार वरिष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद कधी घेतली ?
उत्तर:12 जानेवारी 2018
6.सरन्यायाधीशांनी विरुद्ध पत्रकार परिषद घेणारे न्यायाधीश कोण होते ?
उत्तर: न्या.जे.चेलमेश्वर, न्या. कुरियन जोसेफ, न्या. एम. बी. लोकूर, न्या. रंजन गोगोई
7. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत ?
उत्तर: न्यायमूर्ती दीपक मिश्रा
8. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्याचा दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर राज्यात कोणता दिवस म्हणून साजरा होतो ?
उत्तर: 'शाळा प्रवेश दिवस'
9.डॉ आंबेडकरांचा जन्मदिवस 14 एप्रिल राज्यात कोणता दिवस म्हणून साजरा होतो ?
उत्तर: ज्ञान दिवस
10. 2018 नवी दिल्लीतील राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या चित्ररथाला कितवा क्रमांक मिळाला ?
उत्तर: प्रथम क्रमांक