8 मार्च - जागतिक महिला दिन
या वर्षीची Theme आहे- Press for progress to help accelerate gender parity
अमरावतीमध्ये भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) कंपनी लष्करासाठीच्या विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना तेथे उभारणार आहे.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर
कंपनीने तेलंगणातील इब्राहिमपट्टणम् व अमरावतीमध्ये दोन कारखाने उभारण्याचा निर्णय घेतला आहे
कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अनेक अन्यायाला बळी पडणा-या आणि त्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या महिलांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने 'सुहिता' या नावाची समुपदेशन हेल्पलाइन कार्यान्वित केली.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर
कार्यालयीन वेळेत असणाऱ्या या हेल्पलाइनचा 74777 22424 हा क्रमांक आहे. पहिला कॉल हा यवतमाळ जिल्ह्यातील महिलेने केला होता.
आरुषी-हेमराज हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या तलवार दाम्पत्याची पुरेशा पुराव्यां अभावी अलाहाबाद हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, सीबीआयने हायकोर्टाच्या या निकालाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांची पाकिस्तान हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक करण्यात आलेली आहे.
विभाजनानंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरुन केंद्र सरकार आणि आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये तणावाचे वातावरण होते. दरम्यान, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही. मात्र, राज्यासाठी विशेष पॅकेज देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
मात्र, यावर समाधान न झाल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील आपले मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले.
भारताच्या मनू भाकेरने मेक्सिकोत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. भारताच्या रवी कुमारने कांस्यपदक जिंकले.
भारताची नेमबाजपटू अंजुम मुद्गीलने 50 मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात रौप्यपदक पटकावलं आहे.
भारताच्या शहझार रिझवीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रमासह विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. या स्पर्धेत जितू राय व मेहुली घोष या भारतीय खेळाडूंनी कांस्यपदकाची कमाई केली.
आयपीएलच्या अकराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक याच्याकडे संघाचं नेतृत्व सोपवलेलं आहे.
अकराव्या हंगामात कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीर पुन्हा एकदा आपल्या घरच्या संघाचं म्हणजेच दिल्ली डेअरडेविल्सचं प्रतिनिधीत्व करणार आहे.