चालू घडामोडी 27 मार्च 2018

  • जागतिक रंगभूमी दिन= 27 मार्च
  • पहिल्‍या मराठी विश्‍व साहित्‍य संमेलनांचे अध्‍यक्ष व ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
  • 27Marchसाहित्‍यातील भरीव योगदानाबद्दल त्‍यांना यावर्षी पद्मश्री पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले होते.
  • कर्नाटकमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. त्यानुसार कर्नाटक विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.
  • भारतीय कुस्ती महासंघ आणि हरियाना राज्य सरकारने आयोजित केलेल्या शहीद भगतसिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या अंकिता गुंडला 62 किलो वजनी गटात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
  • ऊनं, वारा, पाऊस, बर्फ, वादळ आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मोटार सायकलस्वार देबाशिष घोष यांनी ‘वन वर्ल्ड वन राईड 2017’ मोहिमे अंतर्गत पाच खंड, 35 देश, 270 दिवस, 68 हजार किलोमीटरचा चित्त थरारक प्रवास यशस्वीरित्या पुर्ण केला. त्यांच्या ‘पृथ्वी प्रदक्षिणे’चा शेवट सोमवारी मुंबईतल्या गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये झाला.